AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips: झोपेवर नवे संशोधन, अपुऱ्या झोपेमुळे वाढू शकतो ‘या’ आजाराचा धोका

अपुऱ्या झोपेमुळे अनेक समस्यांना समोर जावे लागू शकते. नवीन संशोधनात समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.

Health Tips: झोपेवर नवे संशोधन, अपुऱ्या झोपेमुळे वाढू शकतो 'या' आजाराचा धोका
अनिद्रा Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 03, 2022 | 7:52 PM
Share

मुंबई, तुम्ही जर पुरेशी झोप (Quality Sleep) घेत नसाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला अनेक समस्यांना समोर जावे लागू शकते. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण पुरेशी झोप न घेतल्याने मोठ्या आजारांचा धोका असतो. एका नवीन संशोधनानुसार, माणसाच्या झोपेची गरज वाढलेली आहे. जर तुम्ही पूर्ण झोप घेत नसाल तर भविष्यात अनेक समस्यांना समोर जावे लागू शकते.  चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. झोपेच्या कमतरतेमुळे तुम्ही अनेक आजारांना बळी पडू शकता. एका नव्या संशोधनातही ही बाब समोर आली आहे. संशोधनानुसार, पुरेशी झोप न घेतल्याने मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

अभ्यासात समोर आला हा धोका

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांना एका अभ्यासात असे आढळून आले की ज्या लोकांची झोप कमी होती त्यांना कोलेस्टेरॉल आणि जास्त वजनाची समस्या देखील होते, ज्यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. ऑस्ट्रेलियातील सुमारे दहा लाख प्रौढांना टाइप 2 मधुमेह आहे. संशोधक डॉ.लिसा मॅट्रीसियानी सांगतात की, झोपेच्या विविध पैलूंचा मधुमेहाच्या जोखमीशी संबंध असतो.

या अभ्यासात, आम्ही मधुमेहाच्या जोखीम घटकांसह झोपेच्या विविध पैलूंचा संबंध तपासला. आम्हाला असे आढळून आले की, ज्यांना झोपेची समस्या होती त्यांना देखील टाइप 2 मधुमेहाचा धोका असतो. अभ्यासामध्ये 1,000 पेक्षा जास्त ऑस्ट्रेलियन प्रौढांचे सरासरी वय 44.8 वर्षे आहे. टाइप 2 मधुमेह हा प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित आहे आणि कालांतराने विकसित होतो.

तणावामुळे होतोय झोपेवर परिणाम

व्यस्त आणि स्पर्धात्मक युगात माणूस तणावात जगत आहे. तणावाचा परिणाम झोपेवर होत असल्याने अनेकांना अनिद्रेच्या समस्येला समोर जावे लागत आहे. तणाव दूर करण्यासाठी व्यसनांचा पर्याय निवडणे हे त्याहून धोकादायक आहे.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....