AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरदेवाचा तो आजार समजला अन् नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; भर लग्नमंडपातच… समोर आलेलं गुपित काय?

Wedding Drama : लग्नाच्या विधीदरम्यान वर खुर्चीवर बसलेला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर नवरीने भर मंडपातच मोठा निर्णय घेतला आहे.

नवरदेवाचा तो आजार समजला अन् नवरीच्या पायाखालची जमीन सरकली; भर लग्नमंडपातच... समोर आलेलं गुपित काय?
Wedding DramaImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 11, 2026 | 6:41 PM
Share

संपूर्ण भारतात सध्या लगीनसराई सुरू आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात दररोज विवाहसोहळे पार पडत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातून एक बातमी समोर आली आहे. एटा जिल्ह्यात एका नवरीने भर मंडपात राडा घातला. नवरीचा आरोप होता की, वराच्या वैद्यकीय स्थितीबाबतची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी लपवली होती. त्यामुळे नवरीच्या कुटुंबाने लग्नाच्या पुढील विधींना नकार देत वराची हेल्थ रिपोर्ट दाखवण्याची मागणी केली. ही घटना साकीत परिसरात घडली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं?

समोर आलेल्या माहितीनुसार, नवरदेव हा काटोली गावचा रहिवासी असून रविवारी संध्याकाळी तो वऱ्हाडी मंडळींसह साकितमधील एका गेस्ट हाऊसमध्ये पोहोचला होता. त्याचे लग्न नागला फुले गावातील विजय सिंह यांच्या मुलीसोबत होणार होता. लग्नाच्या विधाला सुरुवात झाली. मात्र लग्नाच्या विधीदरम्यान वर खुर्चीवर बसलेला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. काहींनी त्याला पाणी पाजले, तर काहींनी डॉक्टरांकडे धाव घेतली. सुरुवातीला वराच्या कुटुंबीयांनी ही घटना घाबरल्यामुळे झाली असे सांगत दुर्लक्ष केले. मात्र नंतर नवरीच्या कुटुंबीयांनी वराच्या तब्येतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.

मेडिकल रिपोर्ट दाखवा

नवरीच्या कुटुंबाने आरोप केला की, लग्न ठरवण्यापूर्वी वराच्या नातेवाईकांनी त्याच्या आजाराची माहिती त्यांच्यापासून लपवली होती. या घटनेनंतर हा वाद वाढला आणि शाब्दिक चकमकीत बदलला. स्थानिक ज्येष्ठ नागरिक आणि नातेवाईकांनी दोन्ही बाजूंना समजवण्याचा प्रयत्न केला. चर्चा सुरू असताना नवरीने स्पष्ट सांगितले की, वराचe हेल्थ रिपोर्ट दाखवला तरच लग्न होईल.

पोलिसांची एन्ट्री

वादानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी सांगितले की, वादादरम्यान दोन्ही कुटुंबांतील सदस्यांमध्ये जोरदार भांडण झाल्यानंतर नवरीच्या बाजूच्या दोन जणांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. अनेक लोकांनी हे लग्न लावण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरी आणि तिचे कुटुंब लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. नवरीने भरमंडपात लग्न मोडण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे नवरदेवाला वधूशिवायच वरात परत न्यावी लागली.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?