Health Tips : हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्यास महिलांना होऊ शकतो त्रास, अशी घ्या काळजी

मानसी मांडे,  Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 12:51 PM

हिवाळ्यात महिला अनेकदा पाणी पिण्याचे प्रमाण कमी करतात. त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी घेताना त्यांचे अनेकदा त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते.

Health Tips : हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्यास महिलांना होऊ शकतो त्रास, अशी घ्या काळजी
Image Credit source: Freepik

नवी दिल्ली – हिवाळा हा आपल्या आयुष्यात अनेक बदल घडवून आणतो. या ऋतूत आपली जीवनशैली अन्नापासून ते राहणीमानापर्यंत पूर्णपणे बदलते. थंडी पडताच तहान कमी लागत (less water) असल्याने अनेकजण पाण्याचे सेवन कमी करतात. पण असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. वास्तविक, उन्हाळ्यात ज्याप्रमाणे शरीराला पाण्याची गरज असते, त्याचप्रमाणे हिवाळ्यातही (winter care) शरीरासाठी पाणी तेवढेच आवश्यक असते. विशेषत: महिलांना थंडीत पाणी न (women should drink enough water) मिळाल्याने त्रास होऊ शकतो. हिवाळ्यात महिलांनी आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करावेत हे जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, या ऋतूत महिलांनी थंड पाणी पिण्याऐवजी कोमट पाणी प्यावे. थोड्या-थोड्या वेळाने पुरेसे पाणी प्यावे. अन्यथा डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसेच हिवाळ्यात फास्ट फूड खाणे टाळावे. जास्त तळलेले अन्नदेखील नुकसान करते. त्यामुळे ते खाणे टाळणेच योग्य ठरते. तसेच व्हिटॅमिन सी मध्ये अँटी-ऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे हिवाळ्यात त्याचे सेवन करावे. यासोबतच ड्रायफ्रुट्स खाणे देखील फायदेशी ठरते.

गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी

थंडीच्या ऋतूमध्ये गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, त्यांच्या सर्व चाचण्या नियमितपणे करून घ्याव्यात आणि डॉक्टरांच्या सतत संपर्कात राहावे, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. यासोबतच थंडीत येणारी फळं आणि भाजीपाला यांचे सेवन पुरेशा प्रमाणात करावे, जेणेकरून त्या निरोगी राहू शकतील. कुटुंबाची काळजी घेण्यात व्यस्त असलेल्या महिला आपल्या आरोग्याबाबत बेफिकीर होतात, त्या स्वतःच्या खाण्याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे महिलांनी स्वत:साठीही वेळ काढणे फार महत्त्वाचे आहे.

नियमितपणे करावा व्यायाम

डॉक्टरांच्या मते महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत, त्यांनी नियमितपणे हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे हा देखील चांगला व्यायाम आहे. म्हणूनच दररोज किमान 30 मिनिटे चालावे. हवामानातील सततच्या बदलामुळे, दिवसा अनेकदा थंड आणि गरम असा बदल जाणवू लागतो. अशा परिस्थितीत या ऋतूमध्ये व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण लक्षणीय वाढते. त्यामुळे अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

काही वेळ उन्हात बसावे

हे सुद्धा वाचा

थंड हवामानात जास्त गार वातावरणात जावे टाळावे. अशा वेळी सकाळी लवकर घराबाहेर पडणे टाळण्याचा प्रयत्न करा. तसेच, घराबाहेर जाताना पुरेसे उबदार कपडे घालावेत. फिरायला जात असाल तर थंडी कमी झाल्यावरच बाहेर जा. यासोबतच शरीरात व्हिटॅमिन डीचा पुरवठा करण्यासाठी रोज सकाळी काही वेळ उन्हात बसा. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा नैसर्गिक स्रोत आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI