AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Heart Attack : अचानक कसा येतो हार्ट अटॅक? अटॅक आल्यानंतर इतक्या वेळात होतो मृत्यू

. गुजरातमध्ये नवरात्रीदरम्यान गरबा नृत्यादरम्यान अनेक तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत, हृदयविकाराच्या झटक्याची (Heart Attack Reason) कारणे आणि लक्षणे याबद्दल जागरूक असणे खूप महत्वाचे आहे.

Heart Attack : अचानक कसा येतो हार्ट अटॅक? अटॅक आल्यानंतर इतक्या वेळात होतो मृत्यू
हार्ट अटॅक Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 23, 2023 | 3:38 PM
Share

मुंबई : हल्ली हृदयविकाराच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे कारण आता हृदयविकाराचा झटका फक्त वृद्धांपुरता मर्यादित नाही तर तरुणही त्याला बळी पडू लागले आहेत. गुजरातमध्ये नवरात्रीदरम्यान गरबा नृत्यादरम्यान अनेक तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत, हृदयविकाराच्या झटक्याची (Heart Attack Reason) कारणे आणि लक्षणे याबद्दल जागरूक असणे खूप महत्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका येतो जेव्हा हृदयाच्या धमन्यांमध्ये अचानक अडथळा येतो आणि पुरेसे रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही किंवा रक्ताची गुठळी तुटून धमनीमध्ये जाते आणि मार्ग अवरोधित होतो. त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन मिळत नाही आणि व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो.

हे सर्व इतक्या वेगाने घडते की शरीराला कोणताही संकेत किंवा इशारा मिळत नाही. एका क्षणी ती व्यक्ती बरी असते आणि दुसऱ्याच क्षणी त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. वेळेवर उपचार न मिळाल्यास हृदयविकाराचा झटका आल्यानंतर 2-3 तासांत मृत्यूची शक्यता वाढते. म्हणून, वेळेत वैद्यकीय मदत घेणे फार महत्वाचे आहे.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी काय करावे

तुमच्या आजूबाजूला कोणी अचानक बेशुद्ध झाले तर सर्वप्रथम त्या व्यक्तीची नाडी तपासा. जर नाडी अजिबात जाणवत नसेल तर समजून घ्या की त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला आहे. कारण हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयाचे ठोके बंद होतात, त्यामुळे नाडी सापडत नाही.

त्याचे हृदय दोन ते तीन मिनिटांत पुनरुज्जीवित करणे आवश्यक असते, अन्यथा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्याचा मेंदू खराब होऊ शकतो. अशा स्थितीत हृदयविकाराचा झटका आल्यास ताबडतोब छातीवर जोरात ठोसा द्या. तो शुद्धीवर येईपर्यंत त्याच्या हृदयाला पंप करा करा. यामुळे त्याचे हृदय पुन्हा काम करण्यास सुरवात करेल आणि त्याने ताबडतोब आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संपर्क साधावा आणि बेशुद्ध व्यक्तीला सीपीआर द्यावा. त्याला त्वरीत जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, कारण हृदयविकाराच्या झटक्यावर वेळीच उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच