यकृत प्रत्यारोपणाबाबत ‘या’ महत्वाच्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात

यकृत निकामी झाल्यावर अनेकदा त्याचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यामुळे खराब झालेले यकृत प्रत्यारोपण करुन त्याजागी निरोगी यकृत लावण्यात येते. हे सर्व करीत असताना काही महत्वाच्या बाबी रुग्णांनी जाणून घेणे आवश्‍यक आहे. या लेखात याच बाबींवर प्रकाश टाकणार आहोत.

यकृत प्रत्यारोपणाबाबत ‘या’ महत्वाच्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात
liver
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 12:43 PM

मुंबई : आजकाल अनेक लोकांना पोटाशी संबंधित आजारांनी पछाडलेले आहे. चुकीची जीवनपध्दती, (Lifestyle) सकस आहाराचा अभाव, व्यसन, व्यायामाचा अभाव, फास्ट फूडचा अतिरेक आदी विविध कारणांमुळे पोटाच्या विकारांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्याच सोबत चुकीच्या सवयींमुळे यकृतावर ताण निर्माण होउन ते अकार्यक्षम होण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत. अनेक लोक फॅटी लिव्हरच्या आजारांनी त्रस्त असतात. परंतु अशात जर यकृतामध्ये इन्फेक्शन आढळल्यास त्यावर उपचार करणे अत्यंत कठीण असते. अशा वेळी यकृत प्रत्यारोपणाशिवाय (liver transplants) पर्याय नसतो. लिव्हर इन्फेक्शनमुळे पोटाचा कर्करोग (Stomach cancer) होण्याची शक्यताही वाढू शकते. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक ठरते. शिवाय आपल्या जीवनपध्दतीमध्ये बदल करणेही आवश्‍यक असते.

दरम्यान, यकृत प्रत्यारोपण करीत असताना अनेक बाबींची माहिती असणे आवश्‍यक असते. यकृत निकामी झाल्यावर ते बदलण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो. अशा वेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेव्दारे ते बदलले जाते. यासाठी यकृतदाता शोधने आवश्‍यक असते. यकृत देनारा जीवंतच असला पाहिजे असे नाही. अनेकदा मृत्यूनंतर देहदान केले जातात. अशा वेळी यकृताची आवश्‍यकता असलेल्यांना यकृत दान केले जात असते.

प्रत्यारोपण होउ शकते ‘फेल’

यकृत निकामी झाल्यावर त्याचे प्रत्यारोपण करण्याचा सल्ला रुग्णाला दिला जात असतो. अशा वेळी रुग्ण यकृत प्रत्यारोपणाला तयारही होतो. एखादा दाता (डोनर) मिळाल्यास यकृताचे प्रत्यारोपण केले जाते. परंतु अनेकदा शरीर दुसऱ्या यकृताचा स्वीकार करत नाही. यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ‘फेल’ होण्याचीही शक्यता असते. अशा वेळी रुग्णाच्या जीवावरदेखील ही गोष्ट बेतू शकते. त्यामुळे यकृत प्रत्यारोपण करताना तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आवश्‍यक त्या सर्व चाचण्या करणे गरजेचे ठरते.

या रुग्णांनी प्रत्यारोपण टाळावं

यकृताचे प्रत्यारोपण करताना काही खास बाबी लक्षात घेणे आवश्‍यक असते. यकृत प्रत्यारोपण करीत असताना ह्रदयविकार, कर्करोग, छातीचे वा पोटाचे आजार असलेल्या रुग्णांनी या शस्त्रक्रियेपासून लांब राहिले पाहिजे. अनेकदा यकृतामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन झालेले असल्याने शस्त्रक्रिया करुनदेखील यकृत पूर्णपणे काम करु शकत नाही.

शरीराला पुरेपर वेळ द्या

यकृत प्रत्यारोपण यशस्वी झाल्यावरदेखील रुग्णांनी काही काळ काळजी घेणे आवश्‍यक असते. शस्त्रक्रियेनंतर निदान आठवडाभर रुग्णालयातच तज्ज्ञांच्या देखरेखीत राहणे आवश्‍यक असते. त्याच प्रमाणे घरी आल्यावरही साधारणत: तीस दिवस आपल्या शरीराला या आजारातून बाहेर पडण्यासाठी वेळ देणे आवश्‍यक असते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य आहार ठेवणे आवश्‍यक असते.

इतर बातम्या  

लहान मुलांना तुम्ही जर मारहाण करत असाल तर याकडे लक्ष द्या; तुम्ही त्यांचा आत्मविश्वास हिरावून घेत आहात…

Healthy Foods : उष्णतेवर मात करण्यासाठी या 5 आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश करा!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.