AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहान मुलांना तुम्ही जर मारहाण करत असाल तर याकडे लक्ष द्या; तुम्ही त्यांचा आत्मविश्वास हिरावून घेत आहात…

मुलांना तुम्ही जर शिस्तबद्धतेने ठेऊ पाहात असाल आणि त्यासाठी मारहाण होत असेल तर लहान मुलांच्या आत्मविश्वासाला तडे जाऊ शकतात. मुलांना केलेल्या मारहाणीचा इतका वाईट परिणाम पडू शकतो की, त्यांचा आत्मविश्वास त्यात गमावला जाऊ शकतो, त्यामुळे ते जर कोणती गोष्ट सांगू पाहत असतील तर ते पूर्ण विश्वासाने नाही सांगू शकत.

लहान मुलांना तुम्ही जर मारहाण करत असाल तर याकडे लक्ष द्या; तुम्ही त्यांचा आत्मविश्वास हिरावून घेत आहात...
Parenting Mistake
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 6:58 PM
Share

मुंबईः लहान मुलांबाबत असं म्हटलं जातं की, ज्या प्रकारे आपण लहान मुलांना आपलेपणा देत असता त्याचा परिणाम लहान मुलांवर पडत असतो. काही पालक लहान मुलांवर एवढं रागवतात की, त्यांच्या वयाचे भान न ठेवता त्यांना मारपीठपण करतात. लहान मुलांवर हा केलेला हिंसात्मक प्रकार त्यांच्या मानसिक आरोग्यावर (Childs Mental Health) पडत असतो. त्यामुळे त्यांच्या मनावर आई वडिलांविषयी नकारात्मकतेच्या (Parenting Mistake) भावना निर्माण होत असतात. त्यांना जर मारपीठ झाली तर त्यांच्या मनात नंतर आपसुकच आई वडिलांविषयी नाराजीचे सूर दिसून येतात. मारपीठ केल्यामुळे नकारात्मकता (Negativity) मनात येऊन परिस्थिती आणखी बिकट होते. तुमच्या मुलांसाठी तुम्ही कडक नीतिनियम आखत असालही पण त्यासाठी तुम्ही लहान मुलांवर हात उचलणे, त्यांना मारहाण करणे चुकीचे आहे.

मुलांना जर तुम्ही मारहाण करत असाल तर नकारात्मकतेच्या अनेक गोष्टी समोर येतात. मुलांवर नेहमीच हिंसात्मक घटना घडत असतील, त्यांना नेहमीच मारहाण होत असेल तर त्याचा राग लहान मुलं दुसऱ्या ठिकाणी काढू शकतात. त्यामुळे लहान मुलांचे समवयस्क असू शकतात, त्यांना ते मारहाण करु शकतात, त्याचा वाईट परिणाम म्हणजे इतर लहान मुलांना ती जखमीही करु शकतात.

बालकांच्या शालेय जीवनावर परिणाम

लहान मुलांना तुम्ही जर मारझोड करत असाल तर याकडे लक्ष द्या, कारण लहान मुलां मारहाण झाली तर मुलं मानसिक आणि शारीरिकरित्या ती असुरक्षित होतात. त्याचा परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. हा परिणाम झाला तर आपसुकच त्यांना त्यांच्या शालेय जीवनातही अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कौटुबीक हिंसाचाराचा परिणाम बालकांच्या शालेय जीवनावर होतो.

आत्मविश्वासाला तडे

मुलांना तुम्ही जर शिस्तबद्धतेने ठेऊ पाहात असाल आणि त्यासाठी मारहाण होत असेल तर लहान मुलांच्या आत्मविश्वासाला तडे जाऊ शकतात. मुलांना केलेल्या मारहाणीचा इतका वाईट परिणाम पडू शकतो की, त्यांचा आत्मविश्वास त्यात गमावला जाऊ शकतो, त्यामुळे ते जर कोणती गोष्ट सांगू पाहत असतील तर ते पूर्ण विश्वासाने नाही सांगू शकत. कौटुंबीक मारहाणीचा परिणाम त्याच्या शालेय जीवनावर होऊन त्याचा त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होऊ शकतो. काही गोष्टी शिकताना त्याला अडचणी जाणवू लागता, आणि मग शाळेत अशा अभ्यास न करणाऱ्या मुलांमुध्ये अशांना गणले जाऊ शकते.

पालकांविषयी प्रचंड नकारात्मकता

लहान मुलांना मारहाण करणाऱ्या पालकांविषयी त्यांच्या मनात पालकांविषयी प्रचंड नकारात्मकतेची भावना निर्माण होते. त्यामुळे आपल्या पाल्यांना मारहाण करणाऱ्या पालकांविषयी मुलांच्या मनात कोणतीही किंमत ठेवली जात नाही. त्यांच्या मनात पालकांविषयी तिरस्काराची भावना उत्पन्न होते. सततच्या मारहाणीमुळे मुले पालकांपासून दूर दूर जातात. कधी जर त्याच्या नजरेत दुसऱ्याच मुलाला त्याचे पालक मारहाण करत असतील तर त्यालाही रडू कोसळते. त्यामुळे पालकांनी लहान मुलांच्या आयुष्यात जितके त्यांना प्रेम देता येईल तितके ते दिले पाहिजे, आणि त्यांच्या आयुष्यासाठी तेच गरजेचेच असते.

संबंधित बातम्या

महागाईविरोधात चूल मांडून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Thane MNS Protest : ठाण्यातील बहुचर्चित आर्ट गॅलरीसाठी मनसे आक्रमक, पालिका प्रशासनाला इशारा

‘हसगत’ आणि ‘पत्रापत्री’सोबत दिलीप प्रभावळकरांची ‘नवी गुगली’, नवी कथा ऐका स्टोरीटेलवर…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.