वयानुसार रोज किती मखाने खावे? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
मखाना हा शरीरासाठी उत्तम आणि पौष्टिक आहार आहे, पण त्याचे सेवन योग्य प्रमाणात केले पाहिजे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वयानुसार किती मखाने खावे हे बहुतेक लोकांना माहित नसते. हे मर्यादित प्रमाणात खावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मखान्याला फॉक्स नट किंवा लोटस सीड असेही म्हणतात. मखाना अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक स्नॅक मानला जातो. मखान्यात प्रथिने, फायबर, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच पचनसंस्थाही निरोगी राहते. मखाना दिसायला हलका असाल तरी पोषक तत्वांनी भरलेला आहे. त्यामुळे मखाना हा लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी चांगले मानले जाते. तसेच मखान्याचे दररोजचे सेवन शारीरिक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. पण वयानुसार मखाना किती खावा हे तुम्हाला माहित आहे का?
न्यूट्रिशनिस्ट नमामि अग्रवाल म्हणतात की, अनेकजण हलके स्नॅक्स म्हणून मखान्याचे सेवन करतात, परंतु मखान्याचे जास्त सेवन देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवतात. अशावेळी वयानुसार किती मखाने खावेत हे जाणून घेणं गरजेचं आहे.
3 वर्षाखालील मुलांनी इतक्या प्रमाणात मखाने खावे
3 वर्षापेक्षा लहान वयोगटातील मुलांना कमी प्रमाणात मखाना खायला हवा, असे पोषणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांना दररोज ५ मखाने खायला द्यावे. योग्य प्रमाणात मखाने खायला दिल्याने मुलांच्या पचनसंस्थेचा विकास चांगला होतो. तर जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनसंस्थेत समस्या उद्भवू शकतात.
10 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी
तुमच्या घरातील १० वर्षांपर्यंतच्या मुलांना तुम्ही दरारोज १५ मखाने खायला देऊ शकता. या वयात मुलांना दररोज १५ मखाने खायला दिल्याने मुलांची पचनसंस्था थोडी मजबूत होते. हे मुलास पोषक द्रव्ये शोषून घेण्यास देखील मदत करतात.
प्रौढांसाठी
तुमच्या घरातील प्रौढांना तुम्ही दररोज १५ ते २० ग्रॅम मखाने खायला देऊ शकतात. मात्र वेगवेगळ्या शरीराच्या स्थितीनुसार त्याचे प्रमाण कमी-अधिक करून द्यावे. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मखाने कसे खावे
तुम्ही मखाने थेट असेही खाऊ शकतात. मात्र मखान्याचा जास्तीत जास्त फायदा शरीराला होण्यासाठी तुम्ही दुधात मखाना उकळून खाऊ शकता. तसेच मध आणि फळांसह देखील मखाने खाल्ले जाऊ शकतात. यामुळे चव आणि पोषण दोन्ही मिळेल.
मखाना खाण्याचे फायदे
मखान्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
मखान्यात कमी कॅलरीज असल्याने व फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे याच्या सेवनाने पोट जास्त काळ भरलेलं राहतं.
मखान्यात असलेले फायबर पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेसाठीही हे फायदेशीर मानले जाते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
