साधारण चेस्ट पेन आणि हार्ट अ‍ॅटॅकच्या वेदनेत फरक काय?, अ‍लर्टनेसमुळे वाचू शकतो जीव

व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्यामध्ये होत असलेली हेळसांड यामुळे हृदयविकाराशी संबंधित आजार वाढत आहे. या रुग्णांची संख्या संपूर्ण जगभरात वाढली आहे. (how to distinguish between cardiac and noncardiac causes)

साधारण चेस्ट पेन आणि हार्ट अ‍ॅटॅकच्या वेदनेत फरक काय?, अ‍लर्टनेसमुळे वाचू शकतो जीव
Chest pain

नवी दिल्ली: व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्यामध्ये होत असलेली हेळसांड यामुळे हृदयविकाराशी संबंधित आजार वाढत आहे. या रुग्णांची संख्या संपूर्ण जगभरात वाढली आहे. अशावेळी सतर्क राहणे आवश्यक आहे. त्यातच अत्यंत कमी वयातील लोकांनाही हार्ट अ‍ॅटॅकने मृत्यू होत असल्याच्या बातम्याही येत आहेत. हृदयविकाराचा झटका आल्याचं अनेकांना तर कळतही नाही. जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे या संभ्रमातून बाहेर पडण्यासाठी साधारण हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका यातील फरक समजून घेतला पाहिजे. त्यामुळे योग्यवेळी योग्य खबरदारी घेणं सोपं जाईल.

अ‍ॅलर्टनेस वाचवू शकतो जीव

हृदयविकाराचा झटका आल्यावर योग्यवेळी उपचार केल्यास रुग्णांचा जीव वाचू शकतो. त्यामुळे छातीत होणाऱ्या वेदना हा अ‍ॅटॅक आहे की नाही हे कसं ओळखणार? ‘हिंदुस्तान’ या वृत्तसंस्थेशी बोलताना दिल्लीचे कन्स्ल्टंट फिजीशियन इंटेन्सिव्हिस्ट डॉ. अमरेंद्र झा यांनी हार्ट अ‍ॅटॅक आणि छातीत होणाऱ्या वेदना यातील फरक सांगितला.

वेदनेतील फरक असा ओळखा

डॉक्टर झा यांनी सहा मुद्द्यांमध्ये साधारण वेदना आणि हृदयविकार यातील फरक सांगितला. तुमच्या हाताच्या दोन्ही पंजातील बोटं एकमेकांमध्ये घुसवून छातीच्या मध्यभागी ठेवा. तेवढ्याच जागी जर वेदना होत असतील तर हार्ट अ‍ॅटॅक असू शकतो. तुमची छाती कोणी तरी फाडून टाकतंय असं तुम्हाला वाटू लागेल. छाती भरलेली वाटेल. छातीवर काही भार ठेवलाय असं वाटू लागेल. तर, साधारण वेदना असेल तर नेमक्या कोणत्या ठिकाणी वेदना होतात हे तुम्ही बोटानेही सांगू शकता. छातीत सर्वत्र या वेदना जाणवत नाहीत.

गळ्यापर्यंत वेदना वाढू शकतात

हृदयविकाराच्या वेदना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. छातीमधून जबडा, गळा आणि डाव्याबाजूपर्यंत या वेदना जाणवू लागतात. साधारण वेदना या गळ्यापर्यंत जात नाहीत. मोठं वजन उचलल्याने किंवा इतर कामामुळे हार्ट अ‍ॅटॅकवाल्या वेदना होत असतात. तर साधारण वेदना कोणत्याही वजनामुळे वाढत नाहीत. कार्डिअॅक चेस्ट पेन अधिक काळ असतो. अशा प्रकारची लक्षणे तुमच्यात किंवा इतरांमध्ये दिसून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जा. रुग्णालय दूर असेल तर एखाद्या डॉक्टराला फोन करून त्यांचा सल्ला घ्या. Tablet ecospirin 300mg stat किंवा डिस्प्रिन गोळी चावून किंवा पाण्यात घुसळून प्या.

 

संबंधित बातम्या:

Healthy Breakfast | वजन कमी करण्यासाठी नाश्त्यामध्ये करा ‘या’ गोष्टींचा समावेश

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता; राजेश टोपेंनी दिली धोक्याची सूचना

गुडघ्यातून येणाऱ्या कट- कट आवाजाकडे दुर्लक्ष करताय? होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार!

(how to distinguish between cardiac and noncardiac causes)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI