Sexuality: लहान मुलांना लैंगिक शिक्षण कसे आणि केव्हा दिले पाहिजे?

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लहान वयापासूनच मुलांना हळूहळू लैंगिक गोष्टींबद्दल सांगायला सुरुवात केली पाहिजे. | Sexuality children

Sexuality: लहान मुलांना लैंगिक शिक्षण कसे आणि केव्हा दिले पाहिजे?
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:09 AM

मुंबई: लैंगिक शिक्षण हा आपल्याकडे दुर्लक्षित राहिलेल्या विषयांपैकी एक आहे. लहान मुलांना लैंगिक गोष्टींविषयी (Sexuality) माहिती देणे तर दूरच सोडा पण या गोष्टींचा उल्लेखही अनेक कुटुंबांमध्ये निषिद्ध मानला जातो. मात्र, अलीकडच्या काळात ही परिस्थिती हळूहळू बदलू लागली आहे. मात्र, तरीही मुलांना लैंगिक शिक्षण किंवा जाणिवा याबद्दल त्यांना कळेल अशा भाषेत कसे सांगायचे, हा प्रश्न अनेक पालकांना पडतो. (Sexuality What children should learn and when)

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लहान वयापासूनच मुलांना हळूहळू लैंगिक गोष्टींबद्दल सांगायला सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून मुलगा किंवा मुलगी एकदम पौंगाडावस्थेत पोहोचल्यानंतर एकदमच त्यांच्यावर गंभीरपणे बोलण्याची वेळ येणार नाही. कारण, या वयापर्यंत मुलांनी आपल्या मित्रांकडून किंवा इतर माध्यमातून लैंगिकतेबद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यामुळे मुलं पालकांकडून काही नवीन ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लहान मुलांशी लैंगिकता किंवा शरीरसंबंध या गोष्टींबाबत बोलाल तेव्हा त्यांना समजेल आणि झेपेले अशा भाषेत बोलणे गरजेचे असते. मात्र, प्रत्येक मुलगा किंवा मुलीची समज ही वेगवेगळी असते, ही गोष्ट पालकांनी कायम ध्यानात ठेवला पाहिजे.

13 ते 24 महिन्यांच्या मुलांना कसे हाताळाल?

13 ते 24 या बाल्यावस्थेतील काळात मुलांना त्यांच्या शरीराचे अवयव, अगदी गुप्तांगाची माहिती हवी. या सगळ्याला काय म्हणतात हे माहिती असल्यास लहान मुले लैंगिक शोषण किंवा एखादी इजा झाल्यास तुमच्याशी योग्यप्रकारे संवाद साधू शकतात. इतर सगळ्यांप्रमाणेच आपल्या शरीराची रचना आहे, ही बाब मुलांना वारंवार समजावून सांगितली पाहिजे. जेणेकरून एखाद्या गोष्टीवरून त्यांच्या मनात न्यूनगंड किंवा गैरसमज राहणार नाही.

दोन वर्षाचे होईस्तोवर लहान मुलांना स्त्री आणि पुरुष हा भेद कळायला लागतो. आणखी पुढचा विचार करायचा झाल्यास लैंगिक ओळख ही फक्त गुप्तांगांवरून ठरत नाही, त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात, याची शक्य तितकी जाणीव लहान मुलांना करुन द्यावी. आपले शरीर हे खासगी बाब आहे, हे लहान मुलांना सांगितले पाहिजे. आपल्या शरीराविषयी कुतूहल असणे योग्य असले तरी आपल्या गुप्तांगांना कधी आणि कुठे स्पर्श करायचा, हे पथ्य आपल्या मुलांना शिकवणे गरजेचे असते.

2 ते 4 वर्षांच्या मुलांना कसे हाताळाल?

या वयात मुलं साधारण बालवाडी किंवा सिनियर-ज्युनिअर केजीत असतात. या काळात मुलांना मानवी प्रजननाबद्दल प्राथमिक माहिती असणे अपेक्षित आहे. पुरुष शुक्राणू आणि स्त्रीच्या बिजांडाचे मिलन होऊन गर्भ तयार होतोत, ही गोष्ट या वयातील मुलांना माहिती असावी. प्रत्येक मुलाची समज आणि कुतूहल या दोन घटकांनुसार काही गोष्टी बदलू शकतात.

अनेकदा आपल्याकडे लहान मुलांना त्यांच्या जन्माबद्दल काल्पनिक गोष्टी सांगितल्या जातात. मात्र, तुम्ही अशाप्रकारे विषय टाळून सर्व काही लपवू शकत नाहीत. 2 ते 4 वयातील मुलांना नवीन बाळ जन्माला कसे येते, या गोष्टीचे कुतूहल असू शकते. या वयात त्यांच्या मनात इतर लैंगिक भावना नसतात.

तसेच आपल्या शरीराला परवानगीशिवाय कोणालाही हात लावून देऊ नये, ही गोष्ट लहान मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजे. लोक तुम्हाला स्पर्श करु शकतात, पण नकोशा स्पर्शाला नकार देण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. तसेच या वयात मुलांना मस्ती करताना इतर कोणाच्याही शरीराला अयोग्यप्रकारे स्पर्श करु नये, हे शिकवले पाहिजे. शारिरीक भान ठेवणे गरजेचे असते, हे आपल्या पाल्याला शिकवले पाहिजे.

5 ते 8 वर्षांच्या मुलांना कसे हाताळाल?

या वयात येईपर्यंत मुलांना आपल्याला कोणाविषयी आकर्षण वाटते याची जाणीव असली पाहिजे. समलैंगिकता आणि इतर प्रकारांविषयी त्यांना मुलभूत माहिती हवी. लैंगिक ओळख ही फक्त गुप्तांगांवरून ठरत नाही, त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात, याची शक्य तितकी जाणीव लहान मुलांना करुन द्यावी. तसेच नात्यांमधील लैंगिकतेविषयीही त्यांना समजावून सांगितले पाहिजे. लैंगिकतेविषयी असलेले सामाजिक शिष्टाचार आणि दुसऱ्यांच्या नात्याचा आदर करणे या गोष्टी त्यांना शिकवल्या गेल्या पाहिजेत. या वयात मुलांना आपल्या शरीराची संपूर्णपणे माहिती असते.

या वयात मुलांना आपल्या खासगी गोष्टी किंवा छायाचित्रे मोबाईल किंवा इंटरनेटवर टाकू नयेत, याची जाणीव असली पाहिजे. अनोळखी लोकांशी बोलताना काय करावे, ऑनलाईन फोटो शेअर करताना कशाप्रकारे सजग राहावे किंवा एखादा नकोसा प्रसंग उद्भवल्यास काय करावे, याविषयी मुलांना माहिती देणे गरजेचे आहे.

9 ते 12 वर्षांच्या मुलांना कसे हाताळाल?

या कालखंडात तरुण-तरुणी पौंगाडावस्थेत असतात. हल्लीच्या जीवनशैलीचा विचार करता या वयापासूनच मुलांना सुरक्षित संभोग किंवा गर्भनिरोधक गोष्टींची ओळख करुन दिली पाहिजे. तसेच गर्भधारणा कशी होते, याचे ज्ञान त्यांना असले पाहिजे. मात्र, आपण तरुण झालो म्हणजे सेक्सुअली सक्रिय झालेच पाहिजे, असे काही नसते, ही गोष्ट त्यांना पटवून द्यायला पाहिजे.

तारुण्याच्या उंबरठ्यावरच्या या काळात मुलांना चांगल्या किंवा वाईट नातेसंबंधाबद्दल जाणीव असायला पाहिजे. तसेच लैंगिक गोष्टींच्या बाबतीत एखादे नसते धाडस महागात पडू शकते, याची जाणीव या वयातील मुलांना करुन दिली पाहिजे.

13 ते 18 वर्षांच्या मुलांना कसे हाताळाल?

या वयात मुलांना लैंगिक गोष्टींविषयी अधिक सखोल ज्ञान मिळणे गरजेचे असते. मासिक पाळी किंवा कामुक स्वप्नांमुळे झोपेत होणारे वीर्यपतन या गोष्टींची माहिती मुलांना असायला हवी. या गोष्टींमध्ये काहीही चूक नाही, त्या सामान्य आहे, याची जाणीव मुलांना करुन द्यावी. तसेच मुलांना सुरक्षित संभोग किंवा गर्भनिरोधक गोष्टींची ओळख करुन दिली पाहिजे. तसेच गर्भधारणा कशी होते, याचे ज्ञान त्यांना असले पाहिजे. तसेच एखादे नाते कसे हाताळायचे, याबाबत पालकांनी मुलांशी बोलले पाहिजे. समोरून नकार आला तर तो पचवायचा कसा आणि एखादे नाते संपले तर यामधून बाहेर कसे पडावे, याविषयीही मुलांना माहिती असली पाहिजे.

(Sexuality What children should learn and when)

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.