Natural Remedies for Constipation: प्रसूतीनंतर वाढतो बद्धकोष्ठतेचा त्रास! अशी घ्या काळजी

प्रसूतीनंतर महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास होणे ही सामान्य समस्या झाली आहे, मात्र त्यामुळे महिलांना बराच त्रास सहन करावा लागू शकतो.

Natural Remedies for Constipation: प्रसूतीनंतर वाढतो बद्धकोष्ठतेचा त्रास! अशी घ्या काळजी
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 11:20 AM

नवी दिल्ली – महिलांमध्ये बद्धकोष्ठतेचा (constipation) त्रास हा साधारणत: गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर (after delivery) सुरू होतो. प्रसूतीनंतर महिलांमध्ये हा त्रास एक सामान्य समस्या मानला जातो. प्रसूतीनंतर सुरू झालेली बद्धकोष्ठतेची समस्या सहसा गंभीर नसते, मात्र कधीकधी हा त्रास इतर आजारांकडे निर्देश करतो. खरंतर, यादरम्यान शरीरात प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स वेगाने वाढतात, ज्यामुळे गर्भाशयाचे अस्तर जाड असते, त्यामुळे महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास सहन करावा लागू शकतो. मात्र हा त्रास दीर्घकाळापर्यंत सुरू राहिल्यास पोटात गॅस तयार होणे, अस्वस्थ वाटणे, उलटी होणे, पोटदुखी अशा अनेक समस्या (health problems) उद्भवू शकतात.

बद्धकोष्ठतेचा हा त्रास दूर करायचा असेल तर आपण विविध प्रकारचे उपाय अवलंबू शकता. ही समस्या टाळण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊयात.

हे सुद्धा वाचा

खूप पाणी प्यावे

व्हेरी वेल डॉट कॉम नुसार, बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करायचा असेल तर तुम्ही खूप पाणी पिणे आणि हायड्रेटेड राहणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसभरात कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे आणि फायबर युक्त पदार्थांचे सेवन करावे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल.

ओट्स खावे

ओट्समध्ये इनसॉल्यूबल फायबर असते, ज्यामुळे हा त्रास कमी होण्यास मदत मिळते. संपूर्ण धान्य, ब्राऊन राइस, बीन्स आणि ताज्या भाज्या व फळ खाल्याने आपल्या पचनसंस्थेचे कार्य चांगले. चालते. ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

हलका व्यायाम करावा

आपल्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीतपणे चालावे यासाठी आपल्याला दिवसभरात 30 मिनिटे चालले पाहिजे. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी व्हावा यासाठी तुम्ही पवन मुक्तासन, मार्जरी आसन, उत्ततानासन आणि त्रिकोणासन करू शकता. मात्र तुमचे सिझेरियन झाले असेल तर कोणताही व्यायाम सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रेशर थांबवू नका

तुम्हाला जेव्हा शौचाला जाण्याची भावना होईल, तेव्हा ते थांबवू नका. शरीरातील टाकाऊ पदार्थ वेळच्या वेळी बाहेर पडण्यापासून थांबवल्यास नंतर त्रास होऊ शकतो. तसेच डिलीव्हरीच्या वेळीस घालण्यात आलेल्या टाक्यांवरही दाब पडू शकतो.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.