AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : आहारात समाविष्ट करा बडीशेप, होतील बरेच फायदे, जाणून घ्या कोणते ते

बडीशेपच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. हे चयापचयाला देखील चालना देण्यास मदत करते. यात व्हिटॅमिन ए असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.

Health Tips : आहारात समाविष्ट करा बडीशेप, होतील बरेच फायदे, जाणून घ्या कोणते ते
आहारात समाविष्ट करा बडीशेपची, होतील बरेच फायदे
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 20, 2021 | 9:31 AM
Share

मुंबई : बडीशेपच्या पानांना सोया, बडीशेप आणि साव म्हणतात. डाळी, लोणचे आणि भाज्या बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो. डाळ बनवतानाही याचा उपयोग केला जाऊ शकतो. बटाट्यांमध्ये बडीशेपची पाने मिसळून आपण भाजी बनवू शकता. याशिवाय तुम्ही आपल्या नियमित चहामध्येही याचा वापर करू शकता. बडीशेपची पाने व्हिटॅमिन सी, ए, लोह, कॅल्शियम आणि मॅंगनीज समृद्ध असतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. (Include dill in the diet, there will be many benefits, know which ones)

पोषक तत्वांनी समृद्ध असतात

बडीशेपच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. हे चयापचयाला देखील चालना देण्यास मदत करते. यात व्हिटॅमिन ए असते जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. या व्यतिरिक्त कॅल्शियम असते जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. मॅंगनीजचे प्रमाण कमी असते परंतु मेंदूसाठी चांगले असते.

पचनासाठी फायदेशीर

बडीशेपची पाने पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. कारण त्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे गॅस, अपचन यामुळे आराम मिळतो. हे फायबरने समृद्ध आहे जे बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करते. बडीशेप गॅस, पोटफुगी आदि समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते. हे आपल्या पाचक प्रणालीला बळकट करण्यासाठी कार्य करते.

निद्रानाश

निद्रानाश ही एक व्याधी आहे ज्यामध्ये एखाद्याला झोपायला त्रास होतो. हा आजार कधीही होऊ शकतो. व्यस्त जीवनशैलीमुळे बरेच लोक झोपत नाहीत. झोपेच्या कमतरतेमुळे ते आळशी आणि चिडचिडे होतात. बडीशेपमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन बी असते, जे निद्रानाशाच्या आजारावर विजय मिळविण्यास मदत करते. हे आपल्या शरीरातील कोर्टिसोलची पातळी कमी करण्यास मदत करते. यामुळे ताण कमी होतो.

वजन कमी करण्यास मदत करते

बडीशेपची पाने अँन्टी-ऑक्सिडेंटने समृद्ध असतात आणि त्यामध्ये कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. हे शरीरातील बेड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. आपण सकाळचा चहा किंवा ग्रीन टी मध्ये बडीशेपची पाने घालून सेवन करु शकता. हे फॅट बर्नरप्रमाणे कार्य करते. आपण थोडी बडीशेप पाण्यात उकळवून आणि गाळून हे पाणी पिऊ शकता. हे आपल्या चयापचयला चालना देईल आणि पचन सुधारेल. (Include dill in the diet, there will be many benefits, know which ones)

इतर बातम्या

अश्लील फिल्म; यूकेचा सर्व्हर ते ओटीटी प्लॅटफॉर्म, राज कुंद्रा अटकेत, नेमकं प्रकरण काय?

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का?, मोदी सरकार म्हणतं…

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....