या बियांचा रोजच्या आहारात समावेश करा, शरीराला मिळेल भरपूर पोषण
आपल्या रोजच्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश केल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच या धावपळीच्या जीवनात तुम्ही जर या खास आरोग्यदायी बियांचा आहारात समावेश केल्याने तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या बिया फायदेशीर आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल बरेच लोकं आरोग्यदायी आहार घेण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगल्या आरोग्यासाठी केवळ पोट भरणे पुरेसे नाही. तर शरीराला आवश्यक पोषक तत्वांचीही गरज असते. यासाठी आहारात तुम्ही या लहान बियांचा समावेश करणे फायदेशीर ठरतील. या बियांमध्ये शरीराचे पोषण करण्यास मदत करणारी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. म्हणूनच त्यांना सुपरफूड मानले जाते आणि बरेच लोकं त्यांना आपल्या रोजच्या आहारात समावेश करतात.
विविध बियांमध्ये प्रथिने , फायबर, आरोग्यदायी फॅट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. त्यांचे सेवन दही, सॅलड, ओट्स, स्मूदी किंवा इतर पदार्थांसोबत सहजपणे करता येते. आपल्या आहारात संतुलित प्रमाणात बियांचा समावेश करणे फायदेशीर मानले जाते. चला तर मग आपल्या रोजच्या आहारात कोणत्या आरोग्यदायी बियांचा समावेश करता येईल त्यांचे फायदे तसेच ते खाण्याची योग्य पद्धत याबद्दल जाणून घेऊयात.
आहारात या 5 आरोग्यदायी बियांचा समावेश करा.
चिया बिया
हेल्थलाइननुसार चिया बियांमध्ये फायबर, प्रथिने, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्या तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि हृदयाच्या आरोग्यास मदत करू शकतात. तर या चिया बिया पाण्यात भिजवून, दही, ओट्स किंवा स्मूदीमध्ये मिक्स करून सेवन करू शकता.
अळशीच्या बिया
अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, फायबर आणि लिग्नॅन्स यांसारखी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य, पचनक्रिया आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकतात. तर तुमच्या रोजच्या आहारात या बियांचा समावेश करण्यासाठी अळशी हलके भाजून दळून घ्या आणि दही, सॅलडमध्ये मिक्स करून खा.
भोपळ्याच्या बिया
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम, झिंक, लोह आणि आरोग्यदायी फॅट्स असते. या बियांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने हाडे, स्नायू आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करू शकतात. भोपळ्याच्या बिया भाजून त्याचे सेवन करा. तसेच नाश्ता किंवा सॅलड आणि दह्यासोबत मिक्स करून देखील खाल्ल्या जाऊ शकतात.
सूर्यफुलाच्या बिया
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम, आरोग्यदायी फॅट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्याने पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात, हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात असे मानले जाते. त्या सॅलडमध्ये, ओट्समध्ये किंवा नाश्त्यात मिक्स करून खाऊ शकता.
तीळ
तिळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स असते. तीळामधील हे घटक हाडे मजबूत करण्यास, ऊर्जा देण्यास आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. चटण्या, सॅलड, लाडू किंवा इतर पदार्थांमध्ये मिक्स करून तिळाचे सेवन सहज करता येते.
या आरोग्यदायी बियांचे सेवन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
एकाच प्रकारच्या बियांचे प्रकार सेवन करण्याऐवजी, शरीराला विविध पोषक तत्वे पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचे सेवन करणे उत्तम आहे. बिया फायदेशीर असतात, परंतु त्यांचे अतिसेवन करू नये. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांचे सेवन कराल, तेव्हा थोड्या प्रमाणात सुरुवात करा आणि त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो ते पहा.
जर तुम्हाला कोणतीही ॲलर्जी किंवा आरोग्याच्या समस्या असतील, तर डॉक्टर किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच त्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. बियांना संतुलित आहाराचा भाग बनवा आणि केवळ त्यांच्यावरच अवलंबून राहू नका. भरपूर पाणी पिणे देखील महत्त्वाचे आहे, विशेषतः फायबरयुक्त बिया खाताना.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
