कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा लहान मुलांसाठी ओमिक्रॉन अधिक घातक?, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनबाधित रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचा धोका हा कोविडच्या इतर व्हेरिएंटपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनचा धोका हा लहान मुलांना सर्वाधिक असल्याची चर्चा आहे.

कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा लहान मुलांसाठी ओमिक्रॉन अधिक घातक?, जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
प्रातिनिधीक फोटो

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. ओमिक्रॉनबाधित रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यूचा धोका हा कोविडच्या इतर व्हेरिएंटपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे तज्ज्ञांनी कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा ओमिक्रॉनचा धोका हा लहान मुलांना सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. ओमिक्रॉनचा विषाणू हा श्वसनमार्गावर परिणाम करतो, लहान मुलांचा श्वासोच्छवासाचा वेग हा प्रौढांपेक्षा जास्त असतो. त्यामुळे ओमिक्रॉन हा लहान मुलांमध्ये कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

…म्हणून ओमिक्रॉन अधिक घातक

दिल्लीमधील श्री बालाजी ऍक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे वरिष्ट श्वसन विकार तज्ज्ञ अनिमेश आर्या यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, ओमिक्रॉन हा मुलांच्या श्वसनमार्गावर परिणाम करतो, त्यामुळे कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेमध्ये लहान मुलांना ओमिक्रॉनचा अधिक धोका आहे. तर गुरुग्राममधील नारायणा सुपर स्पेशॉलिटी रुग्णालयातील डॉक्टर तुषार तायल यांनी म्हटले आहे की, ओमिक्रॉनचे प्रमाण हे मुलांमध्ये अधिक आहे. ओमिक्रॉनची लागण झालल्यानंतर जी लक्षणे वयस्क व्यक्तीमध्ये दिसतात, तीच लक्षणे लहान मुलांमध्ये देखील आढळू येत आहोत. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग पाहता पालकांनी आपल्या पाल्याची योग्य ती काळजी घ्यावी.

देशातही ओमिक्रॉनचा धोका वाढला

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात दररोज सरासरी 672 कोविड 19 संक्रमित मुलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आतापर्यंत सर्वात मोठी आकडेवारी आहे. योग्य काळजी न घेतली गेल्यास कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो. देशात देखील कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनचा प्रसार अधिक वेगाने होत असून, आतापर्यंत तीन हजारांहून अधिक जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. दरम्यान ओमिक्रॉनच्या टेस्टचा खर्च हा अधिक असल्याने अनेक जण लक्षणं दिसल्यानंतर देखील टेस्ट टाळत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ओमिक्रॉन प्रसाराचा धोका आणखी वाढला आहे.

संबंधित बातम्या

Turmeric side effects : या कारणांमुळे हळदीचे अति सेवन ठरू शकते धोकादायक

होम आयसोलेटेड रुग्णांना हेल्थ किट देणार, कॉलही करणार, आरोग्यमंत्री काय म्हणाले? वाचा सविस्तर

गरोदर महिलांना विज्ञानाचे वरदान, रक्त तपासणीतून उलगडेल आई-बाळाची स्थिती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI