5

Health in winter | गुळाचे हे पदार्थ ट्राय करा… आणि हिवाळ्यात शरीर ठेवा उबदार…

हिवाळ्यात थंडीमुळे गरम पदार्थांचं सेवन करा असं म्हणतात. त्यामुळे हिवाळ्यात गुळाचं सेवन करणे हे आरोग्यासाठी खूप फायद्याचं आहे. त्यामुळे अनेक घरात गुळापासून तयार केले पदार्थ खाल्ले जातात.

Health in winter | गुळाचे हे पदार्थ ट्राय करा... आणि हिवाळ्यात शरीर ठेवा उबदार...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:41 AM

हिवाळ्यात (winter) शरीर उबदार ठेवण्यासाठी जेवणातील पदार्थ हे महत्त्वाची भूमिका निभवतात. या दिवसांमध्ये जेवण्यात ज्या पदार्थांनी शरीराला उब मिळते असे पदार्थ खाले जातात. त्यातील एक पदार्थ आहे गूळ (jaggery). हिवाळ्यात गूळ खाणे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. गुळामध्ये मॅग्नेशियम, व्हिटामिन बी1, बी6, आणि सी ही पोषकतत्त्वे असतात. त्यामुळे गुळाचं सेवन केल्यास तुमचं पचनक्रिया मजबूत राहते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. आज आपण गुळापासून तयार होणाऱ्या रेसिपी (jiggery recipes)पाहुयात. ज्यामुळे तुमच्या जेवण्याची रंगत वाढेल.

गुळापासून तयार होणारी रेसिपी

1. गुळाची पोळी – यासाठी एका भांड्यात दूध गरम करा. मग त्यात गूळ घाला आणि ते छान विरघळू द्या. मग हे मिश्रण थंड करुन घ्या. आता एका भांड्या गव्हाचे पीठ घ्या, त्यात सोडा आणि मीठ घाला आता हे पीठ तयार केलेल्या मिश्रणाने एक जीव करा. पीठ मिळताना त्याला थोडा तुपाचा हात लावा. आता या पिठापासून छोट्या छोट्या आकाराच्या पोळा बनवा आणि तूप लावून त्या भाजून घ्या. या पोळ्या गरमागरम सर्व्हे करा.

2. गुळाचा मालपुआ – एका भांड्यात 1 कप गरम पाणी घ्यात त्यात ½ कप गूळ मिक्स करा. या केशर आणि वेलायची पूड घाला. आता यात एक कप गव्हाचे पीठ मिक्स करा. आणि हे मिश्रण साधारण दोन तास असंच ठेवून द्या. आता कढईत तूप गरम करा आणि त्यात छोट्या चमच्याने हे मिश्रण टाका. दोन्ही बाजूने छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. हिवाळ्यात खाण्यासाठी गरमागरम गुळाचे मालपुआ तयार.

3. गूळ बदाम खीर – ही खीर तयार करण्यासाठी एका भांड्यात दूध उकळा. त्यात बारीक केलेला तांदुळाचा पेस्ट घाला आणि तांदूळ शिजेपर्यंत चांगले मिक्स करा. यात आता केसर, वेलायची पावडर आणि गुलाबपाणी घाला. आता हे भांड गॅसवरुन काढा आणि त्यात किसलेला गूळ आणि चिरलेले बदाम घाला. ही खीर काहींना गरम तर काहींना फ्रीजमध्ये थंड करु खायला आवडते. तुम्हाला जशी तसा या गुळ बदाम खीरचा आस्वाद घ्या.

4. आमचूर, गूळची चटणी – वाळलेल्या कैऱ्या, गूळ आणि काही मसाल्यापासून ही चटकदार चटणी हिवाळ्यात जेवण्यासोबत मस्त लागते. ही चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आमचूर पाण्यात उकळा. एका भांड्यात तेल गरम करा त्यात जिरे, बडीशेप, हळद, तिखट, धणे पावडर घाला आणि आता यात वाळलेली कैरी घाला. आता या मिश्रणात किसलेला गूळ घाला. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. काही वेळात गरमा गरम पोळी किंवा पुरीसोबत ही चटणी खाण्यासाठी तयार. ही चटणी प्रवासातही घेऊन जाऊ शकता.

5. तीळगुळाची पोळी – हा एक महाराष्ट्रीय पदार्थ आहे. हिवाळ्यात अनेक घरात हा बनविला जातो. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तीळ भाजून घ्या. मग तीळ थंड झाल्यावर मिक्सरमध्ये तीळ आणि किसलेला गूळ बारीक करून घ्या. आता गव्हाचे पीठ तयार करा. आता आपण बटाटा पराठा जसा बनवतो तसे ही पोळी बनवा. गरमागरम तुपासोबत ही पोळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.

Nagpur Health | थंडीमुळे वातरोग वाढलेत; काळजी कशी घ्यालं, डॉक्टर काय म्हणतात…

Vidarbha cold | विदर्भाला थंडीने घेरले, आजचा दिवस थंड; नागपूर, गोंदियात निच्चांकी तापमान

तुम्हाला वारंवार विसरण्याची सवय आहे काय? ही अल्झायमरची लक्षणे तर नाही…

Non Stop LIVE Update
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
सगळ्यात जास्त बुद्धीची गरज कुणाला? नितेश राणे यांनी थेटच सांगितलं...
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
फडणवीसांनी घेतलं टीव्ही ९ च्या बाप्पाचे दर्शन, काय मागितलं मागणं?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
अजित दादा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार? कुणी केलं सूचक वक्तव्य?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
OBC आंदोलनासंदर्भात वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी फोनवर काय चर्चा ?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
चौपाट्यांवर आलेत स्ट्रिंग रे अन् जेलीफिश; महापालिकेचं आवाहन काय?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
लालपरी, बस स्थानक अस्वच्छ दिसल्यास आगारप्रमुखांवरच कारवाई, किती दंड?
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
'त्या' फोटोवरून प्रफुल्ल पटेल यांना शरद पवार यांचा सवाल, म्हणाले...
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
ऑनलाईन गेमच्या नादात गमावले तब्बल ५८ कोटी, बघा नेमकं काय घडलं?
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
बावनकुळे यांचा भाजपच्या नव्या कार्यकारिणी थेट इशारा, 'तर राजीनामा घेऊ'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'
रामदास कदमांचा नाव न घेता इशारा, 'राजकीयदृष्ट्या स्मशानात जावं लागणार'