Vidarbha cold | विदर्भाला थंडीने घेरले, आजचा दिवस थंड; नागपूर, गोंदियात निच्चांकी तापमान

Vidarbha cold | विदर्भाला थंडीने घेरले, आजचा दिवस थंड; नागपूर, गोंदियात निच्चांकी तापमान
प्रातिनिधीक फोटो

गेल्या दोन दिवसात यवतमाळ येथील तापमान अंशाने खाली आले आहे तर अशीच परिस्थिती नागपुरात सुद्धा बघायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ येथील तापमान 5 तर नागपूरचे तापमान 4 अंशाने खाली आले आहे.

सुनील ढगे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 27, 2022 | 9:10 AM

नागपूर : विदर्भात (Vidarbha) मागील काही दिवसांपासून तापमानात चढउतार सुरू आहे. त्यामुळे किमान तापमानात घट झाली आहे. यामुळं पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला आहे. थंडीची लाट येणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा अवकाळी पाऊस व गारपिटीने अवघे वातावरण ढवळून काढले. पावसामुळे थंडीचा जोर वाढतानाच बदलत्या वातावरणामुळे घराघरांत सर्दी, खोकला व तापाचे रुग्ण निघत आहेत. यामुळे आता पाऊस व या थंडीपासून एकदाची सुटका व्हावी अशीच इच्छा आहे. मध्यंतरी पावसाने पाठ फिरविल्याने थंडीचा जोर कमी झाला होता. पारा चढताना दिसत होता. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून पुन्हा थंडीचा पारा (low temperature) घसरताना दिसत आहे. ग्रामीण भागातील लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत. तर शहरी भागात उनी कपडे घातलेले लोक रस्त्यावर दिसत आहेत.

नागपूरचे तापमान 9.8 अंश सेल्सिअस

बुधवारी सर्वाधिक कमी तापमान बुलडाण्यात नोंदविण्यात आले. 9,2 हे विदर्भातील निच्चांकी तापमान होते. त्याखालोखाल नागपुरात 9.8 अंश सेल्सियसपर्यंत तापमान खाली आले. यवतमाळमध्ये 10.5, गोंदियात 10, अकोल्यात 10.6, तर अमरावतीत 10.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद बुधवारी झाली. नागपूर, गोंदिया, अकोला आणि अमरावती आज सर्वाधिक थंड राहणार आहे. त्यामुळं थंडीची लाट अनुभवायची असेल, तर आजचा यंदाचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. असह्य गारठा व बोचऱ्या वाऱ्यांमुळे नागपूरकर कमालीचे त्रस्त आहेत. दिवसभर स्वेटर, जर्किन्स, कानटोप्या व शॉल पांघरून फिरावे लागले. सायंकाळ होताच गारठा आणखी वाढतो. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

पाऱ्यात लक्षणीय घट

उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे पुढील काही दिवस नागपूरसह विदर्भात शीतलहरीचा प्रभाव जाणवेल अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग नागपूरचे संचालक एम.एल साहू यांनी दिली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन ते चार दिवस विदर्भात थंडीची लाट येणार आहे. अनेक जिल्ह्यातील तापमान दोन ते तीन अंशाने खाली येईल. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नागपूर सोबतच संपूर्ण विदर्भाच्या तापमानात घट झालेली आहे. पश्चिम विदर्भातील यवतमाळ आणि वाशीममध्ये सर्वाधिक तापमान खाली आले आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ येथील तापमान अंशाने खाली आले आहे तर अशीच परिस्थिती नागपुरात सुद्धा बघायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात यवतमाळ येथील तापमान 5 तर नागपूरचे तापमान 4 अंशाने खाली आले आहे.

Nagpur ZP | नागपूर झेडपी अध्यक्षांचा कार्यकाळ लवकरच संपणार; सोडतीबाबत उत्सुकता शिगेला

VIDEO : पत्नीचा गळा दाबला, सासूची झोपडी जाळली, मेव्हणीच्या लग्नात धिंगाणा, पटोलेंनी सांगितलेल्या गावगुंड मोदीच्या ‘नाना’ करामती!

नागपुरातील न्यूड डान्स प्रकरण, उमरेडच्या ठाणेदाराची बदली; आणखी कुणाकुणावर कारवाईचा बडगा?

 

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें