रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टींचे सेवन टाळा; अन्यथा करावा लागेल लठ्ठपणाचा सामना

| Updated on: Feb 19, 2022 | 12:32 AM

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी (Wrong eating habits) आजकाल लोकांच्या जीवनाचा एक भाग झाल्या आहेत. वेळेवर न जेवने, व्यायामचा (exercise) अभाव, रात्री उशिरा झोपने अशा अनेक सवयींमुळे तुम्हाला लठ्ठपणाच्या (Obesity) समस्येचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा हे अनेक आजारांचे माहेरघर असते.

रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टींचे सेवन टाळा; अन्यथा करावा लागेल लठ्ठपणाचा सामना
लठ्ठपणा वाढवणारे पदार्थ
Follow us on

चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी (Wrong eating habits) आजकाल लोकांच्या जीवनाचा एक भाग झाल्या आहेत. वेळेवर न जेवने, व्यायामचा (exercise) अभाव, रात्री उशिरा झोपने अशा अनेक सवयींमुळे तुम्हाला लठ्ठपणाच्या (Obesity) समस्येचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा हे अनेक आजारांचे माहेरघर असते. लठ्ठपणामुळे तुम्हाला मधुमेह, रक्तदाबाशी संबंधित आजार, ह्रदयरोग, चालताना धाप लागणे तसेच थकवा जाणवणे अशा विविध आजारांचा सामना करावा लागू शकतो. लठ्ठपणाचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे लोक झोपताना अशा काही पदार्थांचे सेवन करतात की, त्यामुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो. तज्ज्ञाकडून अशा गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही जर वेळीच अशा गोष्टी टाळल्या नाहीत तर तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.

हेवी फूड : तज्ज्ञांच्या मते तुम्ही जर तुमच्या डीनरमध्ये हेवी फूडचा समावेश केला तर तुम्हाला लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे रात्री जेवताना शक्यतो शरीराला पचेल असं हलक्या फुलक्या पदार्थांचा समावेश करा. तसेच रात्री झोपताना चुकूनही फास्ट फूडचे सेवन करू नका. रात्री जेवल्यानंतर लगेच न झोपता थोडावेळ तरी चालण्याचा व्यायाम करा.

मैदा : मैद्यापासून बनवलेले पदार्थ शरीरासाठी घातक मानले जातात. मैद्याच्या नियमित सेवनामुळे अनेक आजारांचा धोका असतो. विशेत: रात्री झोपताना मैदा न खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. रात्रीच्या जेवनामध्ये मैदयाचा समावेश केल्यास त्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.

कोल्ड ड्रिंग्स : शरिरातील उष्णता कमी व्हावी यासाठी अनेक जण कोल्ड ड्रिंग्स पितात. अनेक जण रात्री झोपताना देखील कोल्ड ड्रिंग्स पितात. मात्र रात्रीच्या वेळी कोल्ड ड्रिंग्सचे सेवन करणे चुकीचे आहे. यामुळे तुमच्या शरीरातील फॅट वाढतात. शरीरात फॅट वाढल्यामुळे तुमचे वजन वाढते.

अति मद्यपान टाळा : अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी दारू पिण्याची सवय असते. मात्र ही सवय शरीरासाठी हानीकारक आहे. यामुळे मधुमेह रक्तदाब यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच सोबतच लठ्ठपणा देखील वाढतो. त्यामुळे तज्ज्ञांकडून मद्यपान टाळण्याचा सल्ला दिला जातो.

संबंधित बातम्या

सिगरेट आणि दारुचे व्यसन पुरुषांपेक्षा महिलांसाठी जास्त घातक; गर्भाशयाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता

हाडांमध्ये दुखणे Blood cancer तर नाही? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष नको…

बदलत्या ऋतूत पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळवायची असेल तर या पदार्थांचे नक्की सेवन करा!