पाणी आरोग्यासाठी चांगलेच, मात्र दिवसभरात किती ग्लास पाणी प्यायचे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

यूएस नॅशनल अ‍ॅकेडमिक्स ऑफ सायन्स, इंजीनियरिंग आणि मेडीसिननुसार, एका महिलेच्या शरिरात दररोज 11.5 कप पाणी जाणे आवश्यक आहे. 11.5 कप म्हणजेच साधारण 2.7 लिटर पाणी. (Know how many glasses of water to drink in a day, expert advice)

पाणी आरोग्यासाठी चांगलेच, मात्र दिवसभरात किती ग्लास पाणी प्यायचे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
पाणी आरोग्यासाठी चांगलेच, मात्र दिवसभरात किती ग्लास पाणी प्यायचे?

मुंबई : उन्हाळ्यात आपल्या वारंवार तहान लागते. मग आपण अधूनमधून सारखे पाणी पित असतो. मुळात पाणी अधिक पिणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. भरपूर पाणी पिण्यामुळे अनेक रोग दूर पळून जातात, असे म्हटले जाते. मात्र त्यालाही काही मर्यादा आहे. अर्थात दिवसभरात किती प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे, याबाबत डॉक्टरांनी, तज्ज्ञ मंडळींनी मर्यादा आखून दिलेली आहे. विशिष्ट मर्यादेच्या पुढे जाऊन आपण पाणी पित राहिलो तर ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. म्हणजे पाणी हे उपायकारी ठरण्याऐवजी ते अपायकारी ठरू शकेल. म्हणूनच पाणी पितानाही पुरेसी काळजी घ्या. (Know how many glasses of water to drink in a day, expert advice)

आपल्या शरीरासाठी पाण्याची किती गरज आहे?

यूएस नॅशनल अ‍ॅकेडमिक्स ऑफ सायन्स, इंजीनियरिंग आणि मेडीसिननुसार, एका महिलेच्या शरिरात दररोज 11.5 कप पाणी जाणे आवश्यक आहे. 11.5 कप म्हणजेच साधारण 2.7 लिटर पाणी. तर एखाद्या पुरुषाला 15.5 कप पाण्याची आवश्यकता असते. याचा अर्थ दिवसभरात पुरुषाच्या शरीरासाठी जवळपास 3.7 लिटर पाण्याची आवश्यकता असते. म्हणजेच काय, तर याच मर्यादेनुसार महिला वा पुरुषाने पाणी प्यायला हवे. ही मर्यादा ओलांडली तर पाणी आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जे पाणी आपल्या शरिरातील व्याधी दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते, ते पाणी मर्यादेपेक्षा अधिक प्यायला मिळाल्यामुळे नको त्या व्याधींना निमंत्रण देऊ शकते. आपल्या शरीरात पाण्याची काही प्रमाणात मात्रा ही ज्यूस आणि जेवणातून पूर्ण होते. आपण पाण्याची 20 टक्के आवश्यकता ही आपल्या नियमित जेवणातूनच पूर्ण करतो.

पाण्याची आवश्यकता या गोष्टींवर अवलंबून असते

वर नमूद केलेली पाण्याची आवश्यकता ही प्रत्येक माणसाच्या शरिरासाठी सारखीच असेल, असे सांगता येणार नाही. प्रत्येकाचे शरिर वेगळे असते, त्यानुसार प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असते की त्या व्यक्तीला पाण्याची किती आवश्यकता आहे. व्यक्तीचे खाणेपिण्याचे पदार्थ, त्याची जीवनशैली, वातावरणीय गोष्टी यावरदेखील पाण्याची आवश्यकता अवलंबून असते. एका अहवालानुसार, तुम्ही कुठे राहता, तुम्ही किती तापमानात राहता, तुमच्या भोवतालचे वातावरण कसे आहे, तुम्ही किती अ‍ॅक्टिव्ह आहात, तुमचे आरोग्य, प्रेग्नन्सी आदी गोष्टींवरही पाण्याची गरज अवलंबून असते. या सर्व गोष्टींवरच पाण्याची कमी-अधिक गरज ठरते.

जास्त पाणी पिणे नुकसानकारक

गरजेपेक्षा अधिक पाणी पिण्याने आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारचे परिणाम होतात. एका अहवालांनुसार, जास्त पाणी पिण्याने शरीरातील सोडियमच्या प्रमाणावर परिणाम होतो. इलेक्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. पाण्याच्या जास्त प्रमाणामुळे डायबिटीज, ह्रदयाशी संबंधित विकार तसेच हार्मोन्सवर परिणाम होण्याची भिती असते. त्यामुळे शरिराच्या गरजेनुसारच पाणी प्या, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Know how many glasses of water to drink in a day, expert advice)

इतर बातम्या

श्रेयवादावरुन पुन्ह चुरस, दुर्गाडी खाडी पूलाच्या नव्या दोन लेनच्या लोकार्पणाच्या आधीच भाजपची बॅनरबाजी

Mahindra 9 शानदार SUV आणि MPV लाँच करणार, Scorpio, Bolero सह XUV 700 चा समावेश

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI