नाचोगे तो फायदे मे रहोगे… फक्त 30 मिनिटांचा डान्स अन् टेन्शन, डिप्रेशन होईल गायब

नृत्य अथवा डान्स केल्याने फॅट्स कमी होतात तसेच मानसिक ताणही कमी होण्यास मदत होते.

नाचोगे तो फायदे मे रहोगे... फक्त  30 मिनिटांचा डान्स अन् टेन्शन, डिप्रेशन होईल गायब
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 11:40 AM

नवी दिल्ली : डान्स करणं (dancing) आपल्यापैकी बऱ्याच जणांना आवडतं. लग्न असो वा वाढदिवस, पार्टीमध्ये गाणं लागलं अनेकांचे पाय थिरकायला लागतात. डान्स केल्याने केवळ रिलॅक्स (relax) वाटत नाही तर त्याचे अनेक फायदेही आहेत. जर तुम्ही दररोज फक्त 30 मिनिटे डान्स केलात तर असंख्य फायदे मिळू शकतात. डान्स केल्यामुळे तुमचे फॅट्स कमी होतात आणि तणावही (stress) तुमच्यावर हावी होऊ देत नाही. डान्स करण्याचे आणखी काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.

वजन कमी होते

लोकं नृत्याचा जितका आनंद घेतात, तितकाच त्याचा फायदा होतो. विशेषत: ज्यांना त्यांचे वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी डान्स करणे फायदेशीर ठरते. डान्स केल्याने शरीरातील फॅट्स कमी होतात. विविध गाण्यांवर अथवा म्युझिकवर जर तुम्ही डान्स केला तर तुमच्या कॅलरी बर्न होतात. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

हे सुद्धा वाचा

हृदयाचे आरोग्य सुधारते

नृत्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तुम्ही जितक्या वेगाने नाचता तितक्या वेगाने तुमचे हृदय धडधडते. यामुळे हृदय मजबूत आणि निरोगी होते. हृदय चांगले कार्य करते. म्हणूनच नृत्य हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. एका संशोधनात असे आढळून आले की ज्या लोकांचे हृदय निकामी होते आणि त्यांनी वॉल्टझिंगचा सराव केला त्यांच्या हृदयाचे आरोग्य, श्वासोच्छ्वास आणि जीवनाची गुणवत्ता सायकल चालवणाऱ्या किंवा ट्रेडमिलवर चालणाऱ्या लोकांपेक्षा चांगली होती.

स्मरणशक्ती वाढते

द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनच्या एका रिपोर्टनुसार, नृत्यामुळे तुमची स्मरणशक्ती मजबूत होते. हे डिमेंशियापासून तुमचे रक्षण करते. एरोबिक नृत्य मेंदूचा तो भाग सुधारतो, जो स्मरणशक्ती नियंत्रित करतो. नृत्यातील डान्स स्टेप्स आणि वेगवेगळ्या हालचाली लक्षात ठेवल्याने मन व मेंदू तीक्ष्ण होतो. प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना याचा फायदा होतो.

शरीराचे संतुलन सुधारते

जर्नल ऑफ एजिंग अँड फिजिकल ॲक्टिव्हिटी मधील एका संशोधनात असे म्हटले आहे की टँगो नृत्य वृद्ध प्रौढांमध्ये संतुलन सुधारण्यास मदत करते. जर एखाद्या व्यक्तीला वाढत्या वयामुळे तोल जाण्याची किंवा पडण्याची भीती वाटत असेल तर ते डान्सची मदत घेऊ शकतात. डान्स स्टेप वेगवान आणि लवचिक असल्याने शरीरावर चांगले नियंत्रण ठेवता येते.

हॅपी हार्मोन्स वाढतात

नृत्य केल्यामुळे तणाव कमी होतो आणि हॅपी हार्मोन्स बाहेर पडतात. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना नृत्य करण्याचा सल्ला दिला जातो. डान्स ग्रुपमध्ये सामील झालेल्या लोकांमध्ये एकत्र नृत्य केल्याने तणाव कमी झाल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. ते खूप उत्साही आणि उत्साही राहतात.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.