उन्हाळ्यात नाकातून रक्त का येतं ? अशावेळी काय करावं ?

Nose Bleeding Treatment : उन्हाळ्यात अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या असते. हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. तुम्हाला किंवा आजूबाजूला कोणालाही असा त्रास झाला, तर काय उपाय करावेत ते जाणून घ्या.

उन्हाळ्यात नाकातून रक्त का येतं ? अशावेळी काय करावं ?
उन्हाळ्यात नाकातून रक्तस्त्राव झाल्यास काय करावे ? Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 5:11 PM

नवी दिल्ली : जसजसा उन्हाळा (summer) वाढू लागला आहे, त्याचा दाहही (heat in summer) वाढतोय. उन्हाळ्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात. उन्हामुळे गरगरणे, डोके दुखी अशा त्रासासह काही वेळेस नाकातून रक्तस्त्रावही (Nose Bleeding) होतो. उन्हाळ्यात तापमान वाढले की हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नाकात कोरडेपणा येतो. नाकात कोरडेपणा आल्याने शिरा कोरड्या होतात किंवा त्या फुटून जखमा होतात. त्यामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो. कोरडेपणामुळेही रक्तस्त्राव होण्याची समस्या असू शकते.

नाकातून रक्तस्त्राव होण्याची ही समस्या 3 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये जास्त आढळते. पण वृद्ध लोकही या समस्येने त्रस्त होऊ शकतात. नाकातील ॲलर्जी, अंतर्गत शिरा किंवा रक्तवाहिन्या खराब होणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, रक्तदाब, अति उष्णता, जास्त शिंका येणे, सर्दी किंवा नाक वेगाने घासणे यामुळेही हा त्रास उद्भवू शकतो.

करून पहा हे उपाय, होणार नाही रक्तस्त्राव

शरीर हायड्रेटेड ठेवावे

कडक उन्हामुळे शरीराला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात शरीर जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा. शक्य तितके पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातून जास्त घाम येत असल्याने पाण्याची कमतरता भासते. म्हणून, द्रव पदार्थांचे अधिक सेवन करावे. साधे पाणी पिण्याव्यतिरिक्त नारळ पाणी, फळांचे ज्यूस , सरबत वगैरे पिऊ शकता.

हे पदार्थ चुकूनही खाऊ नका

उन्हाळ्यात गरम अर्थात उष्ण पदार्थ खाऊ नयेत. गरम पदार्थ खाल्ल्याने नाकातील रक्तवाहिन्यांवर दाब पडतो. त्यामुळे नाकातून रक्त येऊ लागते. त्यामुळे उन्हाळ्यात उष्ण प्रकृतीचे,  गरम, तसेच मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत. जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

गार अथवा गरम पॅकचा करा वापर

जेव्हाही नाकातून रक्तस्त्राव होत असेल तेव्हा थंड किंवा गरम पॅक वापरा. थंड पॅक नाकाच्या वर ठेवावा, तर गरम पॅक नाकाच्या खाली ठेवावा. यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब कमी होतो आणि रक्तस्त्राव थांबतो.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.