Cold Weather and Heart Attacks: हिवाळ्यात का वाढते हार्ट ॲटॅकची शक्यता ? थंडी आणि हृदयविकाराचा संबध जाणून घ्या

इतर ऋतूंपेक्षा थंडीच्या दिवसात हृदयाशी संबंधित आजारांची शक्यता जास्त वाढते. कारण थंडीच्या दिवसात शरीर गरम ठेवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते.

Cold Weather and Heart Attacks: हिवाळ्यात का वाढते हार्ट ॲटॅकची शक्यता ? थंडी आणि हृदयविकाराचा संबध जाणून घ्या
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 12:11 PM

नवी दिल्ली – देशभरात थंडीचा (cold wave) कडाका वाढला आहे. उत्तर भारतासह दिल्लीमध्ये थंडीचा प्रकोप वाढला आहे. राजधानीच्या शहरामध्ये काही ठिकाणी तापमान 1.8 अंशापर्यंत घसरले होते. कडाक्याच्या थंडीमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला असून उत्तर भारतामध्ये थंडीच्या तीव्र लाटेमुळे 25 जणांचा मृत्यू (deaths)झाल्याची घटना घडली. थंडीमुळे पक्षाघात आणि हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याने 25 जणांचा मृत्यू झाला.

हार्ट ॲटॅक म्हणजेच हृदयविकाराचा झटका तेव्हाच येतो, जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या पेशींमध्ये चरबी वाढू लागते. जास्त प्रमाणात चरबी किंवा प्लाक जमा झाल्यामुळे रक्तपेशी ब्लॉक होतात आणि हृदयापर्यंत पुरेशा प्रमाणात रक्त पोहोचत नाही, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका कोणत्याही ऋतूत येऊ शकतो, पण हिवाळ्यात हा त्रास जास्त होतो असे मानले जाते.थंड वातावरणात हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो, त्यामुळे हृदयावरील ताण वाढू लागतो. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (कार्डिओव्हॅस्क्यपलर) स्थिती असलेल्या लोकांना थंड हवामानात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. हृदयविकाराचा झटका आणि थंडीचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया.

थंड हवामान आणि हृदयाचे आरोग्य

हे सुद्धा वाचा

स्वीडनमध्ये 2017 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासात विविध ऋतू आणि हार्ट ॲटॅक यांच्यातील संबंध आढळून आला. या अभ्यासात असे आढळून आले की, इतर ऋतूंच्या तुलनेत थंडीच्या दिवसात हृदयविकाराचे प्रमाण अधिक असते. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे थंड वातावरणात मनुष्याचे शरीर उबदार ठेवण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते.आणि रक्त पंप करताना रक्तपेशी आकसतात आणि त्यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होतो, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात.

– उच्च हृदय गती

– रक्तदाब वाढणे

– ऑक्सिजनची गरज वाढणे

– रक्त घट्ट होणे

– रक्त गोठणे किंवा रक्ताची गुठळी होणे

– रक्तवाहिन्या / धमन्या कडक होणे

वरील सर्व कारणांमुळे थंडीच्या दिवसात हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे हृदयविकाराचा त्रास असलेल्या लोकांनी या ऋतूत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. स्ट्रोक, हार्ट फेल्युअर, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या, एरिथमिया यांसारख्या समस्या हिवाळ्यात झपाट्याने वाढू लागतात.

जोखीम : थंड हवामान आणि अचानक व्यायाम केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. म्हणूनच थंडीच्या दिवसांत अचानक कठोर परिश्रम टाळणे महत्वाचे असते. हृदयविकार आणि हार्ट ॲटॅक यांच्या जोखमीच्या घटकांमध्ये खाली नमूद केलेल्या कारणांचा समावेश असू शकतो.

– उच्च रक्तदाब

– हाय कोलेस्ट्रॉल

– धूम्रपान करणे

– वय

– कौटुमबिक इतिहास

– मधुमेह

– लठ्ठपणा

– नियमितपणे व्यायाम न करणे

– अती मद्यपान करणे

– चरबीयुक्त व हाय कोलेस्ट्रॉल युक्त आहाराचे सेवन करणे

कमी तापमानात धूम्रपान आणि मद्यपानामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची जोखीम अधिक असते.

कसा करावा बचाव

– थंड वातावरणात हृदयविकाराचा झटका येण्याची संभावना कमी करण्यासाठी काही पावले उचलली जाऊ शकतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे थंड वातावरणात कमी बाहेर जाणे आणि जास्त श्रम करावे लागतील अशी कामे कमी करण्याचा प्रयत्न करणे.

– शरीराचे तापमान राखण्यासाठी उबदार कपडे वापरा.

– थंड हवामान असलेल्या भागात शक्य तितका कमी वेळ रहावे.

– थंड ठिकाणी वेळ घालवताना मद्यपान कमी करावे.

– शरीर उबदार ठेवण्यासाठी, थंड हवामानात गरम अन्न आणि गरम पेय सेवन करण्याचा प्रयत्न करा.

(डिस्क्लेमर- संबंधित विकारांची प्राथमिक माहिती, लक्षणे, तसेच काय करता येईल, याची माहिती देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.