Health : पिगमेंटेशनची कारणे त्यावरील योग्य उपचार जाणून घ्या

प्रत्येकजण आपला चेहरा स्वच्छा रहावा यासाठी अनेक उपाय करत असतो. पिगमेंटेशनमुळे अनेकजण Skin Care : मानसिकदृष्ट्या खचले जातात त्यावेळी नेमके कोणते उपचार घ्यायचे ते येण्यामागची कारणे कोणती आहेत जाणून घ्या.

Health : पिगमेंटेशनची कारणे त्यावरील योग्य उपचार जाणून घ्या
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 4:32 PM

मुंबई : बऱ्याचदा पुरळ येऊन गेल्यानंतर आपल्या त्वचेवर काळे डाग दिसतात. यालाच पिग्मेंटेशन असे म्हणतात. जेव्हा त्वचेच्या पेशी मेलेनिनचे जास्त उत्पादन करतात तेव्हा हायपरपिग्मेंटेशन होते. मेलॅनिन हा पदार्थ आपल्या त्वचेला रंग देतो. सामान्य स्थितीत, मेलॅनिनचे उत्पादन अगदी संपूर्ण त्वचेवर होते. परंतु काही प्रकरणांमध्ये, त्वचेखालील मेलेनोसोम्सचे प्रमाण, आकार आणि कार्य यामुळे त्वचेखाली असमान रंगद्रव्य निर्माण होऊ शकते. यासाठी कोणते उपचार असतात ते कसे घ्यायचे याबाबत डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलीये.

पिगमेंटेशनची अनेक कारणे

· मुरुम, फोड आणि दुखापतींमुळे त्वचेचे नुकसान

· सूर्यप्रकाश

· अनुवांशिकता हे देखील यामागचे कारण ठरु शकते. पिगमेंटेशनसाठी 125 हून अधिक जीन्स जबाबदार आहेत.

· स्वयंप्रतिकार स्थिती (ऑटोइम्युन)

· हार्मोनल समतोल ज्यामुळे मेलेनिन उत्पादनात अडथळा येतो.

रंगद्रव्याचा प्रकार

पिगमेंटेशन वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्याचे कारण आणि स्वरूपाच्या या आधारावर त्याचे वर्गीकरण केले जाते.

· वरच्या थरामध्ये दिसणारे रंगद्रव्य जे सूर्यामुळे हणारे नुकसान आणि असुरक्षित सन टॅनमुळे होते. · अनेकजा कपड्यांच्या घर्षणामुळे होते. · डीप पिग्मेंटेशन जसे की मेलाझ्मा, डीप सन टॅन, हायपरपिग्मेंटेशन इ. या प्रकारावर उपचार करणे सर्वात कठीण आहे.

हायपरपिग्मेंटेशन: हा त्वचेच्या पिगमेंटेशन विकाराचा सर्वात सामान्य प्रकार आहे. हे त्वचेमधील असामान्यपणे आणि जास्त प्रमाणात आढळून येणाऱ्या मेलेनिन किंवा रंगद्रव्यांमुळे आढळून येते. हायपरपिग्मेंटेशनमुळे त्वचेवर गडद डाग दिसून येतात.

सनस्पॉट्स / एज स्पॉट्स

ज्याला लिव्हर स्पॉट्स देखील म्हणतात, ते ठराविक कालावधीत सूर्याच्या संपर्कात आल्याने असतात. ते चेहरा, हात आणि पाय यासारख्या सूर्यप्रकाशाच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या भागांवर परिणाम करतात. गर्भधारणेदरम्यान होणारे हार्मोनल बदल किंवा मेलास्मा ज्यामुळे कपाळावर, चेहऱ्यावर आणि पोटावरील त्वचेवर काळ्या रंगाचे मोठे ठिपके दिसतात.

प्रतिजैविकांचे सेवन तसेच गर्भ निरोधक गोळ्यांचा वापर

सूर्यप्रकाश हे हायपरपिग्मेंटेशनचे सर्वात सामान्य कारण आहे. अतिनील किरण मेलेनिनचे अतिउत्पादन सुरू करू शकतात. हायपोपिग्मेंटेशन ज्यामुळे मेलेनिनचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे त्वचेवर पांढरे किंवा निस्तेज असे ठिपके दिसतात. जखम, फोड, अल्सर, संक्रमण, बर्न्स किंवा सोरायसिस आणि एक्झिमा ज्यामुळे त्वचेवर जळजळ होते. या प्रकारात त्वचेचे रंगद्रव्य कमी होते आणि ते पांढरे होते. याचे सर्वात सामान्य कारण त्वचारोग आहे.

त्वचेच्या रंगद्रव्यावर उपचार करता येतात का?

होय, एस्थेटिक क्लिनिक्समध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन रंगद्रव्यावर यशस्वीरित्या उपचार केले जाऊ शकतात. त्वचेच्या रंगद्रव्यावर उपचार करताना दोन गोष्टी मुख्य आहेत, पहिली म्हणजे रंगद्रव्याचे कारण ओळखणे आणि दुसरी योग्य उपचार करणे. एस्थेटिक

हायपरपिग्मेंटेशनसाठी उपचार

तोंडावाटे घेण्यात येणारी औषधे : यामध्ये अँटिऑक्सिडंट टेबल्सचा समावेश आहे जे त्वचेला रंग उजळ करण्यास आणि गडद ठिपके कमी करण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार याचे सेवन केले पाहिजे. दुसरा पर्याय म्हणजे चेहऱ्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा जे त्वचेला सूर्यप्रकाशापासून, विशेषतः उघड्या भागांचे संरक्षण करण्यास मदत करते. ओरल ग्लुटाथिओन आणि व्हिटॅमिन सी ही हायपरपिग्मेंटेशनसाठी इतर काही प्रभावी औषधे आहेत.

क्रीमचा वापर : हे वापरण्यास सोपे आहेत आणि तज्ज्ञांच्या सुचनेनुसार त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. याचा दैनंदिन करता येऊ शकतो आणि तो सुरक्षित ठरतो.

त्वचा उजळ करणारे क्रीम्स ज्यामध्ये हायड्रोक्विनोन, लिकोरिस एक्स्ट्रॅक्ट, व्हिटॅमिन बी3, व्हिटॅमिन सी, मॅंडेलिक अॅसिड, ग्लायकोलिक अॅसिड, फेरुलिक अॅसिड, कोजिक अॅसिड आणि अॅझेलेक अॅसिड यांसारखे घटक असतात जे काळे डाग कमी करण्यास मदत करतात. हे क्रीम दिवसातून दोनदा लावता येऊ शकतात आणि त्याचे परिणाम हळूहळू दिसून येतात.

रेटिनॉइड्स जे व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह आहे आणि त्वचेच्या आतील रंगद्रव्यांवर उपचार करते. ते गडद त्वचेवर सर्वात प्रभावी आहेत. सनस्क्रीन: हे तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग असावा. सनस्क्रीनमध्ये सक्रिय घटक असतात जे त्वचेला सूर्यापासून होणारे नुकसान आणि पिगमेंटेशन पासून संरक्षण करण्यास मदत करतात. बाहेर जाण्यापूर्वी २० मिनिटे आधी सनस्क्रीनचा वापर करा आणि दर 3-4 तासांनी पुन्हा लावा.

एक्सफोलिएटिंग पॉलिश: हे त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्याचे आणि रंगद्रव्याचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. आधुनिक एक्सफोलिएटर्स त्वचेला चिकटत नाहीत किंवा कोरडे करत नाहीत आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा सुरक्षितपणे वापरले जाऊ शकतात.

एस्थेटिक क्लिनिकमध्ये उपचार

केमिकल पील्समुळे पिगमेंटेशन कमी होते आणि त्वचेचे सौंदर्य खुलण्यास मदत होते. यामध्ये एक रासायनिक द्रावण त्वचेवर लावले जाते आणि जे त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते यामध्ये सामान्यपणे वापरली जाणारी रसायने म्हणजे अल्फा-हायड्रॉक्सी ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड आणि ट्रायक्लोरोएसेटिक ऍसिड इत्यादी.

मेडी फेशियल:– त्वचा उजळणारे याचा वापर केला जातो. यामध्ये ऑक्सी आणि हायड्रा फेशियल, लेसर पील्स, अँटी-एजिंग फेशियल आणि व्हिटॅमिन सी फेशियल हे हायपरपिग्मेंटेशन उपचारांसाठी वापरले जाणारे मेडी फेशियल आहेत.

मेसोथेरपी :- जी त्वचेखाली अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि एन्झाईम्स, पोषक घटक, संप्रेरक इ. पिगमेंटेशनवर उपचार करण्यासाठी आणि त्यांचे स्वरूप कमी करण्यासाठी इंजेक्शन स्वरुपात दिले जाते.

मायक्रोनिडलिंग:– त्वचेच्या रंगद्रव्यावर उपचार करण्यासाठी ही दुसरी कोलेजन-प्रेरित नॉन-सर्जिकल प्रक्रिया आहे. यामध्ये बारीक सुईचा वापर केल जातो. द एस्थेटिक क्लिनिक्समधील कॉस्मेटिक सर्जन अधिक परिणामकारकतेसाठी त्वचेखाली व्हिटॅमिन सी, ग्लूटाथिओन, रेटिनॉल इत्यादी आवश्यक सीरम पुरविण्यासाठी मायक्रोनेडलिंगचा वापर करतात.

लेसर स्किन रिसर्फेसिंग:- या प्रक्रियेचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि हे सर्व उपचारांमध्ये सर्वात दीर्घकाळ टिकणारे परिणाम देते. लेझर वरवरच्या थराबरोबरच आणि खोलवर जाऊन रंगद्रव्यावर काम करतात. क्यू-स्विच्ड लेसर सर्वात लोकप्रिय ठरत आहे. लेझर उपचार अनेक सत्रांमध्ये केले जातात आणि प्रत्येक सत्रानंतर तुम्हाला फरक जाणवतो.

पल्स लाईट ट्रिटमेंट:- हा लेसर उपचारांचा आणखी एक प्रकार आहे ज्यामध्ये लेसर त्वचेवरील गडद डागांना टार्गेट केले जाते आणि कोलेजनचे उत्पादन सुधारतात जे नैसर्गिकरित्या त्वचेवर उपचार करतात.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.