‘कोरोना संसर्गां’ तून लवकर बाहेर पडण्यासाठी करा ‘या’ अन्नपदार्थांचे सेवन; जाणून घ्या, कोरोनातून बरे होण्यासाठी काय खावे आणि काय खावू नये!

तुम्ही देखील कोरोना संसर्गाच्या संपर्कात आला असाल आणि लवकर बरे होऊ इच्छित असाल तर, तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करा. जाणून घ्या, कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी, काय खावे आणि काय खाऊ नये.

‘कोरोना संसर्गां’ तून लवकर बाहेर पडण्यासाठी करा ‘या’ अन्नपदार्थांचे सेवन; जाणून घ्या, कोरोनातून बरे होण्यासाठी काय खावे आणि काय खावू नये!
Image Credit source: potatorolls.com
सिद्धेश सावंत

|

Jun 27, 2022 | 9:46 PM

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या लाटेचा शिरकाव होवुन संक्रमीत रुग्ण (Infected patients) झपाट्याने वाढू लागले आहेत. आता भारतात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या 91,779 झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही कोरोनाची लागण झालीच, तर तुम्ही स्वत:ला वेगळे ठेवण्यासोबतच तुमच्या आहाराचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत (Immunity) असणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असेल तर तुम्ही कोणत्याही संसर्गाशी लढू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करावा लागेल जेणेकरून तुम्ही लवकर बरे व्हाल. जर तुम्हाला, कोविड 19 चा संसर्ग झाला तर, त्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी आहाराची विशेष काळजी (Special dietary care) घेणे तितकेच गरजेचे आहे. या काळात काय खावे आणि काय खाऊ नये यासाबाबत तुम्हाला माहिती असनेही तितकेच महत्वाचे आहे.

कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी काय खावे

 • कोरोना रुग्णांनी रोज सुका मेवा खावा. नाश्त्यामध्ये फायबरयुक्त पदार्थ खा, जसे की दलिया, नाचणीपासून बनवलेल्या गोष्टी. यामुळे तुमचे पोट स्वच्छ राहील.
 •  कोरोनातून, लवकर बरे होण्यासाठी, दिवसभर भरपूर पाणी प्या आणि तुम्ही नारळाचे पाणी देखील घेऊ शकता.
 •  अन्नामध्ये अंडी, चिकन, मासे, सोयाबीन आणि चीज यांसारख्या प्रथिनेयुक्त गोष्टींचा समावेश करावा.
 •  रोज हंगामी फळे आणि भाज्या खा. त्यांच्यापासून शरीराला जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
 •  रोज दुधात हळद मिसळून प्या. हळदीमध्ये प्रतिजैविक घटक आढळतात जे तुम्हाला लवकर बरे होण्यास मदत करतात.
 • जर तुम्हाला कोरोनामुळे तणाव आणि चिंतेचा सामना करावा लागत असेल तर, तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. पण ते कमी प्रमाणातच खा.

याचे सेवन अजिबात करू नका

 • कोरोनातून लवकर बरे होण्यासाठी जास्त चरबीयुक्त आणि तेलकट पदार्थ अजिबात खाऊ नका.
 • अशा परिस्थितीत लाल मांस, लोणी किंवा मलई यासारख्या गोष्टी टाळा.
 • प्रक्रिया केलेल्या अन्नाचे सेवन टाळावे.
 • कोरोना संसर्गादरम्यान, हाय फॅट दुधाऐवजी कमी फॅट दुधाचे सेवन करा जेणेकरून तुमचे शरीर दुधाचे योग्य पचन करू शकेल.
 • अन्नामध्ये जास्त सोडियमयुक्त पदार्थ अजिबात घेऊ नका.
 • या दरम्यान, खूप गोड, थंड आणि मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नका.
 • आपण इच्छित असल्यास, आपण लिंबूपाणी पिऊ शकता. यामुळे तुमचे पोट साफ राहते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

 राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय, सोमवारी 2369 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात सोमवारी 2 हजार 369 नव्या कोरोना रुग्णांची (Corona Patient) नोंद झालीय. तर दिवसभरात 1 हजार 402 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. नव्या कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत (Mumbai) आढळून आलेत. आज मुंबईत एकूण 1 हजार 62 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पाच कोरोनाबाधित रुग्णांनी आज आपला जीव गमावलाय. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.85 टक्क्यांवर गेला आहे.

राज्यात सोमवारपर्यंत एकूण 25 हजार 570 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यात एकट्या मुंबईत 12 हजार 479 तर ठाण्यात 5 हजार 871 रुग्ण आहेत. एकूण आकडेवारी पाहिली राज्यात आतापर्यंत 77,91,555 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण 97.83 इतकं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें