हृदयविकारानं ग्रासलंय? चिंताजनक परिस्थिती उद्भवण्याची भीती? जाणून घ्या आधुनिक उपचार पद्धती!

हृदयविकार झाल्यावर अनेकांना पुढील उपचारा बद्दल चिंता सतावत असते अनेकदा आपल्या याबद्दल माहिती नसल्याने दिशाभूल होण्याची शक्यता देखील असते.

हृदयविकारानं ग्रासलंय? चिंताजनक परिस्थिती उद्भवण्याची भीती? जाणून घ्या आधुनिक उपचार पद्धती!
हृदय आणि हृदयविकाराशी संबंधित महत्त्वाचं माहिती..
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 1:29 AM

सध्याच्या घडीला देशात 30 टक्के भारतीय हाय ब्लड प्रेशरने (Blood Pressure) त्रस्त आहेत. मात्र त्यापैकी अनेकांना आपल्याला ही समस्या असल्याची जरा सुद्धा जाणीव नाही. अनेकांना तर डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर निदान (heart diagnosis) होते. फक्त देशातच नव्हे तर जगभरात केलेल्या सर्व्हेमध्ये हेच समोर आलं आहे की, केवळ 25 ते 30 टक्के लोक जे ब्लड प्रेशरचे औषधोचार करतात ते यावर नियंत्रण मिळवताना दिसतात. तर उर्वरीत 70 ते 75 टक्के लोक आपले ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवू शकत नाहीत. ही खरंच चिंतेची बाब आहे. याचे प्रमाण भारताच्या दृष्टीने खरंच धोकादायक आहे. आशियातील काही देशांचा विचार केला असता जपान, चीनच्या तुलनेत भारतीयांना ही समस्या 10 ते 15 वर्ष आधीच भेडसावते. तरुण रुग्णांमध्ये 1..2 नव्हे तर 3..3 ब्लोकेज (heart blockage) असल्याचे सुद्धा निदर्शनास आले आहे. याकरणामुळे मृत्यूचे प्रमाण देखील आपल्याकडे जास्त पाहायला मिळते. याबाबत डॉ अजित मेहता यांनी मोलाची माहिती सांगितली आहे.

डॉ अजित मेहता हे जहांगीर हॉस्पिटलचे ज्येष्ठ आणि अनुभवी कार्डिओलॉजिस्ट विभागाचे प्रमुख आहेत. डॉक्टर गेल्या 15 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. डॉ. अजित मेहता यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत करताना महत्वपूर्ण माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया, हृदय विकार आणि आधुनिक उपचार पद्धती याबद्दल..

1) हार्ट अटॅकमुळे जीव का जातो?

याप्रकारच्या केसेस सडन कार्डीॲक डेथ म्हणून ओळखल्या जातात. शक्यतो या प्रकारच्या केसेस मध्ये चेस्ट पेन, अनईझीनेस यांसारखी लक्षणे तर महिलांमध्ये चालताना दम लागणे व अनईझीनेस यांसारखी लक्षणे पाहायला मिळाली. अनेकदा लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि या आजारांमुळे बळी पडतात.

आपल्यापैकी अनेकांना कधीही न येणारी लक्षणे जाणवली तर तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन ईसीजी करणे आवश्यक आहे. याबाबत आपण अधिक चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. दरवर्षी साधारणतः 7 ते 8 लाख लोक यामुळे मृत्युमुखी पडतात हि आकडेवारी खूप धक्कादायक आहे.

2) हृदयरोग टाळण्यासाठी किंवा त्यापासून बचाव करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

यामध्ये आपण दोन प्रकारच्या चाचण्या करू शकतो. यामध्ये इको कार्डियोग्राफीमध्ये आपल्याला हृदयाचे पंपिंग कसे होते, हृदयाच्या हालचाली कश्या सुरू आहेत यांचा अंदाज घेता येतो. याशिवाय ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्यांना रिस्क फॅक्टर, फॅमिली हिस्ट्री असेल तर डॉक्टरांना ठरवू द्या की तुमच्यासाठी कोणत्या टेस्ट करणे योग्य असेल.. या लोकांसाठी खास करून स्ट्रेस टेस्ट, स्ट्रेस थालीयम, सिटी कोरोनरी अँजीओग्राफी यांचा वापर करून आपण हृदयाचे आरोग्य तपासू शकतो.

3) हृदय विकारावर कशा पद्धतीने उपचार केले जातात? उपचाराचे कोणते पर्याय उपलब्ध?

जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला तर त्यावेळी तात्काळ एखाद्या चांगल्या रुग्णालयात जावून कार्डीओक्युलेटेड ट्रिटमेंट मिळेल अशा ठिकाणी दाखल करणे आवश्यक आहे त्यामुळे तुमच्यापैकी कोणालाही हृदयाशी संबंधित समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता आपण तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. साधारपणे हार्ट अटॅक आलेल्या रूग्णाला दोन प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या जातात.

त्यामध्ये एक मेडिकल ट्रिटमेंट आणि दुसरी अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी यांसारख्या ट्रिटमेंट दिल्या जातात. मेडिकल ट्रिटमेंट मध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये झालेल्या गाठी काढल्या जातात…पण रुग्णाला छातीत दुखण्याचा त्रास झाल्याच्या 3 ते 6 तासात त्याचा उपयोग होतो. बऱ्याचदा ही वेळ मर्यादा पाळली जात नसल्यामुळे रुग्णांना त्याचा फारसा उपयोग होत नाही.

पाहा व्हिडीओ :

टीप : या लेखामध्ये सांगितलेली माहिती सामान्य स्वरूपामध्ये तज्ज्ञांची मते सांगण्यात आलेली आहे तसेच टीव्ही 9 मराठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा उपचार व सल्ला देत नाहीये. या लेखातील माहितीचा वापर करण्याआधी तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवत असेल तर घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या

संबंधित बातम्या :

हार्टअटॅक येऊ नये, असं वाटत असेल, तर मग ही माहिती जाणून घेणं फार फार महत्त्वाचंय!

न्यूमोनिया झाल्यावर व्हेंटिलेटरवर ठेवलंय! अशा वेळी आयुर्वेदिक उपचार पद्धती गुणकारी ठरते?

न्यूमोनियावर आयुर्वेदिक उपचार खरंच शक्य आहेत? हो! इतके की ऑक्सिजन लेव्हलही नॉर्मल होईल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.