AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आला हिवाळा पण हीटर टाळा, रात्रभर हिटर लावल्यास ‘या’ आजारांचा धोका

जेव्हा तुम्ही रात्रभर रुम हीटर सुरू ठेवता तेव्हा हवेत कार्बन मोनोऑक्साइडची पातळी वाढू लागते, जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

आला हिवाळा पण हीटर टाळा, रात्रभर हिटर लावल्यास 'या' आजारांचा धोका
| Updated on: Dec 01, 2022 | 4:25 PM
Share

नवी दिल्ली – सध्या थंडीचा कडाका (winter) चांगलाच वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकं गरम कपड्यांचा तर वापर करतातच त्यासह रुम हीटरही (room heater) वापरतात. विशेषत: ज्यांच्या घरी लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी रुम हीटर खूप उपयुक्त ठरत आहे. मात्र त्याचा वापर करतानाच हीटरबद्दल काही महत्वाच्या गोष्टी माहित असणेही गरजेचे आहे. जर तुम्ही रात्रभर रुम हीटर सुरू ठेवत असाल तर ते सुरक्षिततेच्या दृषटीने धोकादायक तर ठरतेच मात्र आरोग्यासाठीही हानिकारक (bad for health) असते.

रुम हीटर का ठरतो धोकादायक ?

हेल्थशॉटनुसार, जेव्हा तुम्ही रात्रभर रुम हीटर सुरू ठेवता तेव्हा हवेत कार्बन मोनोऑक्साइडची पातळी वाढू लागते, जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्याशिवाय इतर कारणांमुळेही रात्रभर रूम हीटरचा वापर करणे टाळले पाहिजे. रात्रीच्या वेळी रूम हीटर धोकादायक का ठरतो, ते जाणून घेऊया.

हवेची विषारी गुणवत्ता

जर खोलीत पुरेसे व्हेंटिलेशन नसेल आणि आपण बराच काळ रूम हीटर सुरू असेल हीटरमुळे हवेतील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढू लागते. ज्यामुळे खोलीतील हवेची गुणवत्ता विषारी होऊ लागते. हे कधीकधी दम्यासारखे आजार ट्रिगर होतात.

रोग प्रतिकारक शक्तीवर होतो परिणाम

जर तुम्ही खोलीच्या आतील हवा गरम केली असेल आणि वारंवार खोलीतून बाहेर पडत असाल तर त्यामुळे शरीराच्या तापमानात चढ-उतार होतो, ज्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे तापही येऊ शकतो.

डोळे येणे

वास्तविक, जेव्हा रुम हीटर बराच काळ सुरू असेल तर त्यामुळे खोलीतील ओलावा कमी होतो आणि हवा कोरडी होते. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ सुरू होते आणि डोळ्यांमध्ये इन्फेक्शन होऊन त्रास होऊ शकतो.

त्वचेची होते जळजळ

हवेतील ओलावा नाहीसा झाल्यामुळे त्वचा कोरडी पडू लागते. ज्यामुळे खाज सुटणे, चिडचिड होणे, जंतुसंसर्ग होणे अशा समस्या उद्भवू शकते. इतकंच नाही तर हीटरमुळे त्वचेला अनेक प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.