AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ भाज्या कच्च्या खाण्याची चूक कधीही करू नका, शिजवून खाल्ल्यानेच मिळते पूर्ण पोषण; जाणून घ्या, कोणत्या आहेत आरोग्यासाठी फायदेशीर भाज्या!

वजन कमी करण्यासाठी अनेकजण कच्च्या भाज्या खाण्यास प्राधान्य देतात परंतु, काही भाज्या कच्च्या नव्हे तर शिजवून खाल्ल्यानेच त्यातून पूर्ण पोषण मिळते. जाणून घ्या, कोणत्या भाज्या कच्या खावू नयेत.

‘या’ भाज्या कच्च्या खाण्याची चूक कधीही करू नका, शिजवून खाल्ल्यानेच मिळते पूर्ण पोषण; जाणून घ्या, कोणत्या आहेत आरोग्यासाठी फायदेशीर भाज्या!
कच्च्या भाज्या Image Credit source: tv9
| Updated on: Jun 24, 2022 | 5:30 PM
Share

भाज्यांना आहारातील फायबर (Dietary fiber) आणि विविध पोषक तत्वांचे भांडार मानले जाते, म्हणून लोकांना वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी चयापचय करण्यासाठी कच्च्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की कच्च्या भाज्यांचे सेवन केल्याने त्यांना पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात (Adequate supply of nutrients) मिळतात आणि पोटही भरते. भारतीय खाद्यपदार्थांबद्दल बोलायचे झाले तर इथे कोशिंबीर, चटणी आणि सलाद सोबत कच्च्या भाज्या खाल्ल्या जातात. त्याच वेळी लोक भाज्यांचा रस बनवतात आणि पितात. पण तज्ज्ञांच्या मते काही भाज्या कच्च्या खाऊ नयेत. काही भाज्या शिजवून खाल्ल्याने (By cooking and eating) आरोग्यास अधिक फायदे मिळतात, तर त्या कच्च्या खाल्ल्याने भाज्यांचे पौष्टिक फायदे पूर्णपणे मिळत नाहीत. यामध्ये भारतात पिकवल्या जाणाऱ्या स्थानिक भाज्या तसेच इतर देशांतून येणाऱ्या विदेशी आणि महागड्या भाज्यांचा समावेश आहे.

गाजर

कच्च्या गाजरांपेक्षा शिजवलेल्या गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीनचे प्रमाण जास्त असते. बीटा-कॅरोटीन हे एक प्रकारचे जीवनसत्व आहे जे चरबीमध्ये विरघळणारे असते. हे दृष्टी वाढवण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि हाडे मजबूत करते.

पालक

भारतीय स्वयंपाकात पालकाला खूप महत्त्व दिले जाते कारण, ती शक्ती वाढवणारी भाजी मानली जाते. पालक ही लोहाच्या सर्वोत्तम शाकाहारी अन्न स्रोतांमध्ये गणली जात असल्याने त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक देखील असतात. तथापि, पालक शिजवून खाल्ल्यास हे घटक शरीराद्वारे चांगले शोषले जातात.

कच्चा पालक का खाऊ नये

वास्तविक, पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड नावाचे तत्व असते जे लोह आणि कॅल्शियम शोषण्याची प्रक्रिया थांबवते. मात्र, पालक शिजवल्यावर हा घटक कमकुवत होतो आणि शरीराला कॅल्शियम आणि लोहाचा योग्य वापर करता येतो. त्याचप्रमाणे, काही अभ्यासात असे आढळून आले आहे की, पालक उकळवून किंवा शिजवल्याने त्यामध्ये फोलेटचे प्रमाण कायम राहते. गरोदर महिला, लहान मुले आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत लोकांसाठी फोलेट अतिशय फायदेशीर मानले जाते.

मशरूम

अँटिऑक्सिडंट-समृद्ध मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि झिंक सारख्या घटकांचा समावेश असतो. यामध्ये आढळणारा एर्गोथिओनिन नावाचा घटक मशरूम उकळल्यानंतर सक्रिय होतो. हा घटक शरीराला फ्री-रॅडिकल नुकसान होण्यापासून वाचवतो आणि आजारी पडण्याची शक्यता देखील कमी करतो. यासोबतच म्हातारपणाची शक्यताही कमी होते.

टोमॅटो

लाइकोपीन नावाच्या अँटिऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या टोमॅटोचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी यासह विविध पोषक घटक मिळतात. लाइकोपीनमुळे कर्करोग आणि हृदयविकार यांसारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका कमी होतो. पण, कच्चा टोमॅटो खाल्ल्यास लाइकोपीन कमी प्रमाणात मिळते, तर शिजवलेले टोमॅटो खाल्ल्यास लाइकोपीन जास्त प्रमाणात मिळते.

शिमला मिर्ची

रंगीबेरंगी शिमला मिर्ची मध्ये, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक जसे की व्हिटॅमिन सी, बीटा-कोरेटिन आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. या भाज्या शिजवून ही सर्व पोषक तत्त्वे सक्रिय होतात.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.