AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Healthy Food | भाजी शिजवावी की कच्ची खावी? कुठल्याही कृतीपूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या!

बऱ्याचदा सगळ्याच भाज्या शिजवून अथवा उकडून खाल्या जातात. काही भाज्या अति प्रमाणात शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे निघून जातात.

Healthy Food | भाजी शिजवावी की कच्ची खावी? कुठल्याही कृतीपूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या!
एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण
| Edited By: | Updated on: Dec 07, 2020 | 12:27 PM
Share

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी, आहारात भरपूर फळे आणि भाज्यांचा वापर करणे महत्त्वाचे असते. तथापि, त्यांना खाण्याचा आणि शिजवण्याचा आरोग्यदायी मार्ग फारच कमी लोकांना माहिती आहे (Healthy Cooking Methods). काही फळे आणि भाज्या या कच्च्याच खाल्ल्याने त्यातून पोषण मिळते. तर, काही भाज्या शिजवून खाणेच अधिक फायदेशीर असते (Healthy Cooking Methods for vegetables).

बऱ्याचदा सगळ्याच भाज्या शिजवून अथवा उकडून खाल्या जातात. काही भाज्या अति प्रमाणात शिजवल्याने त्यातील पोषक तत्वे निघून जातात. अशावेळी काही भाज्या या स्वच्छ धुवून सलाडप्रमाणे कच्च्याच खाणे अधिक फायदेशीर ठरते. चला तर आपण जाणून घेऊया कुठल्या भाज्या कच्च्या खाव्या आणि कुठल्या शिजवून किंवा उकडून खाव्या…

ब्रोकली स्टीम करा.

जर तुम्हाला ब्रोकोली खाताना ती कडक किंवा बेचव वाटत असेल, तर ती वाफेवर शिजवून मगच खा. उकड्ल्याने किंवा तळल्याने ब्रोकोलीची पोषकद्रव्ये निघून जातात. हलक्या वाफेवर अर्थात केवळ स्टीम केल्याने ब्रोकोलीमध्ये उपस्थित ग्लूकोसिनोलेट सारख्या निरोगी संयुगे टिकून राहतात. ग्लूकोसिनोलेट कर्करोगासारख्या अनेक गंभीर आजारांपासून शरीराचे रक्षण करते.

लसूण कच्चा खावा.

लसूणमध्ये आढळणारा सेलेनियम अँटीऑक्सिडेंट रक्तदाब नियंत्रित करून, शरीराला अनेक धोकादायक आजारांपासून दूर ठेवतो. बरेच लोक भाज्यांमध्ये लसूण घालतात, ती शिजवून खातात. जर आपल्याला लसणीतले जास्त पोषक घटक मिळवायचे असतील, तर लसूण कच्चीच खावी. कच्ची लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे (Healthy Cooking Methods for vegetables).

मशरूम प्रेशर कुकरमध्ये शिजवा.

मशरूममध्ये कमी कॅलरी असतात. मात्र फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने प्रमाण मशरूममध्ये अधिक असते. मशरूम सलाडप्रमाणे कच्चे देखील खाल्ले जाते. मात्र, जर आपल्याला मशरूमचे अधिक पौष्टिघटकर्थ मिळवायचे असतील तर ते स्टीम करून किंवा प्रेशर कुकरमध्ये शिजवून खा. मशरूम शिजवल्यामुळे त्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडेंट्सचे प्रमाण वाढते.

टोमॅटो शिजवून खा.

बरेच लोक पास्ता आणि इतर अनेक गोष्टींसाठी टोमॅटो सॉस बनवतात. विकतच्या तयार टोमॅटो सॉसपेक्षा घरगुती टोमॅटो सॉस अधिक आरोग्यदायी असतो. ताजे टोमॅटो शिजवून खाल्ल्याने, त्यामध्ये उपस्थित लाइकोपीन संपूर्ण शरीरात पोहोचते. टोमॅटोमध्ये असलेले नैसर्गिक लाइकोपीन हृदयरोग आणि कर्करोग सारख्या गंभीर आजारांपासून आपले संरक्षण करते.

गाजर शिजवून खा.

गाजरमध्ये नैसर्गिक कॅरोटीनोईड आढळते. जे आपले डोळे मजबूत बनवते आणि शरीरास गंभीर आजारांपासून दूर ठेवते. गाजरचे अधिक पौष्टिक गुणधर्म टिकवून ठेण्यासाठी, ते स्टीममध्ये शिजवा किंवा हलके तळून खा.

ताजी फळे कच्ची खा.

ताज्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते. ब्लूबेरी, द्राक्षे आणि सफरचंद यासारख्या विशिष्ट फळांमुळे टाइप 2 मधुमेहाची शक्यता कमी होते. ताजी फळे कच्ची खाणेच शरीरासाठी लाभदायी ठरते (Healthy Cooking Methods for vegetables).

रताळे बेक्ड करा.

रताळ्यात फायबर, व्हिटामिन ए, सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत आणि निरोगी बनतात. रताळ्यातील पोषक घटक टिकवून ठेवण्यासाठी त्याला ओव्हनमध्ये बेक्ड करून अथवा भाजून खाणे फायदेशीर ठरते.

भाज्या शिजवण्याचा योग्य मार्ग

जेव्हा आपण भाज्या उकडता तेव्हा पाणी आणि उच्च तापमान यामुळे काही प्रमाणात त्यांची पोषक तत्वे कमी होतात. मंद आचेवर हलक्या फ्राय केल्याने त्यांच्यातील पोषक तत्वे टिकून राहतात. तर, मायक्रोवेव्हमध्ये शिजवताना त्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे देखील टिकून राहतात.

भाज्या वाफेवर शिजवल्याने त्यामध्ये तेल आणि बटर वापरण्याची गरज भासत नाही. त्यामुळे भाज्यांमधील  पोषक घटक टिकून राहतात. शिजवल्यामुळे शिमला मिरची आणि कोबी अशा काही भाज्यांची पौष्टिक मूल्य कमी होतात. त्यामुळे या भाज्या शिजवण्याऐवजी सलाडप्रमाणे खाणे अधिक फायदेशीर ठरते.

(Healthy Cooking Methods for vegetables)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.