AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लठ्ठपणामुळे मुलांना होऊ शकतो हायबीपीचा त्रास; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!

मुलांमधील लठ्ठपणामुळे केवळ त्यांच्या शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत नाही तर त्यांना नैराश्य येण्याचा धोकाही असतो.

लठ्ठपणामुळे मुलांना होऊ शकतो हायबीपीचा त्रास; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!
लठ्ठपणामुळे मुलांना होऊ शकतो हायबीपीचा त्रास; जाणून घ्या लक्षणे आणि कारणे!Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 24, 2022 | 12:50 PM
Share

नवी दिल्ली: खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी (food habits), अनियमित दिनचर्या (bad lifestyle) यामुळे तरूणांसोबतच लहान मुलांमध्येही लठ्ठपणाची (obesity) समस्या दिसू लागली आहे. मुलं लहान वयातच लठ्ठपणाची शिकार झाल्यास ती चिंतेची बाब आहे. मधुमेह, हृदय विकार आणि अस्थमा यामुळे मुलं लठ्ठ होऊ शकतात. मात्र खाण्या-पिण्याच्या सवयी सुधारून, नियमितपणे व्यायाम (exercise) करून मुलांचा लठ्ठपणा कमी करता येऊ शकते व हा त्रास दूर करता येऊ शकतो. मुलांमधील लठ्ठपणामुळे केवळ त्यांच्या शारीरिक आरोग्यावर (health problem) नकारात्मक परिणाम होत नाही तर त्यांना नैराश्य येण्याचा धोकाही असतो. मुलांना तंदुरुस्त कसे ठेवावे, याच्या काही टिप्स जाणून घेऊया.

पौष्टिक व सकस अन्न खाण्याची सवय लावा

बहुतांश मुलं ही , त्यांचे पालक बाजारातून जे विकत घेतात ते खातात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, बाजारातून खरेदी केलेल्या बहुतेक पदार्थांमध्ये फॅट्स (चरबी) आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे लठ्ठपणा वाढतो. त्याशिवाय सॉफ्ट ड्रिंक्स, फास्ट फूड आणि कँडीज यामुळेही लठ्ठपणा वाढतो. मुलांना फास्ट फूड, फ्रोझन फूड, खारट स्नॅक्स आणि पॅकबंद पदार्थ खायला देण्याऐवजी ताजी फळं किंवा भाज्या खायला द्या. त्यांना सकस आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय लावा.

फॅमिली ॲक्टिव्हिटीज वाढवा

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात कौटुंबिक ॲक्टिव्हिटीजना प्रोत्साहन देणे. यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र आनंद घेऊ शकते. तसेच यामुळे कौटुंबिक बॉंडिंगही चांगले राहते. याव्यतिरिक्त, मुलांना शारीरिक ॲक्टिव्हिटीजसाठीही प्रेरित केले जाऊ शकते. पोहणे किंवा सायकल चालविणे, यासारख्या क्रिया मुलांना ॲक्टिव्ह ठेवण्यास मदत करू शकते.

मुलांचा स्क्रीन टाइम कमी करा

जी मुलं स्क्रीन (मोबाईल, लॅपटॉ, टीव्ही) पाहण्यात जास्त वेळ घालवतात, त्यांना लठ्ठपणाचा धोका अधिक असतो. जी मुलं खूप जास्त वेळ टीव्ही पाहतात किवा कॉम्प्युटरवर गेम खेळतात, ती मुलं लठ्ठ होण्याचा धोका अधिक असतो. स्क्रीन पाहण्यात जास्त वेळ घालवल्याने मुलांना शारिरीक हालचालींसाठी (Physical activity) जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम कमी करणे, हे अत्यंत महत्वाचे ठरते. जास्त वेळ मोबाईल अथवा टीव्ही पाहिल्यास डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

(टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.