AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय? चमचमीत, मसालेदार पाणीपुरी आरोग्यासाठी असते फायदेशीर? अनेक आजारांवर ठरते पाणीपुरी गुणकारी ! जाणून घ्या फायदे

वजन कमी करणारे, डाएट करणारे अनेक लोकं चमचमीत चाट सारखे पदार्थ खाणं टाळतात. ते आरोग्यासाठीही फायदेशीर नसते असे मानतात. पण चविष्ट, नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटेल अशी पाणीपुरी खूप हेल्दी असते असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का ?

काय? चमचमीत, मसालेदार पाणीपुरी आरोग्यासाठी असते फायदेशीर? अनेक आजारांवर ठरते पाणीपुरी गुणकारी ! जाणून घ्या फायदे
पाणीपुरी खाण्यास नकार दिला म्हणून महिलेला मारलेImage Credit source: Freepik
| Updated on: Mar 15, 2023 | 7:50 AM
Share

नवी दिल्ली : रस्त्यावरचे काही पदार्थ इतके चविष्ट असतात की ते रोज खाल्ले तरी मन तृप्त होत नाही. चाट, वडापाव, पाणीपुरी (panipuri) असे चटपटीत पदार्थ खायला कोणाला आवडत नाही ? असेच एक स्ट्रीट फूड म्हणजे पाणीपुरी, ज्याचा भारतातील लोक मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतात. पोट जरी भरले तरी पाणीपुरीसाठी प्रत्येकाच्या पोटात थोडी तरी जागा असतेच. उकडलेले चणे (रगडा), बटाटे (potato) आणि मसालेदार पाण्याने भरलेली पुरी तोंडात जाताच, मन तृप्त होतं. ती केवळ तरुणांनाच नव्हे तर लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानांच खायला (likes eating) आवडते.

पण आरोग्याच्या दृष्टीने ते फारसे फायदेशीर मानले जात नाही. वजन कमी करणारे, डाएट करणारे अनेक लोकं तर त्याकडे बघतही नाहीत. पण हीच पाणीपुरी अतिशय हेल्दी असते असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल का ? ती तयार करण्यासाठी अशा घटकांचा वापर केला जातो, ज्याची गणना पोषण-समृद्ध पदार्थांमध्ये केली जाते. पाणी पुरीची पुरी गव्हाचे पीठ किंवा मैदा, रवा यापासून बनते. तसेच त्यामध्ये उकडलेले बटाटे, , उकडलेले हरभरे याचा रगडा तर पाणी हे पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, मीठ, मिरची पावडर, आमचूर, धणे, गूळ आणि चिंच यापासून तयार केले जाते.

पाणीपुरी खाण्याचे आरोग्याला कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊया

1) निरोगी पचन : पाणीपुरी ही गहू, रवा, चणे आणि बटाटे इत्यादीपासून बनवले जातात, जे कार्ब आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. याच कारणामुळे पाणीपुरी खाल्ल्याने तुम्हाला भरपूर फायबर मिळू शकते, जे पचनक्रिया सुधारण्यास आणि ती स्वच्छ ठेवण्यास मदत करू शकते.

2) वजन कमी करणे : हे वाचूनतुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की पाणीपुरी खाऊन वजन कमी कसे होऊ शकते ? पण ते सहजपणे शक्य आहे. पाणीपुरीमध्ये भरलेल्या बहुतेक गोष्टी उकडलेल्या असतात आणि त्यात पाणीही असते. यामुळेच त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3) ॲसिडिटीवर उपचार : ॲसिडिटीच्या समस्येवर मात करण्यासाठी डॉक्टर सामान्यतः जलजिरासारखे थंड पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणीपुरी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जलजिरा, कारण त्याशिवाय त्याची चव अपूर्ण मानली जाते. आले, जिरे, पुदिना, काळे मीठ, धणे आणि कधीकधी काळी मिरी जलजीराच्या पाण्यात टाकतात. या सर्व गोष्टींमुळे खराब पोट बरं होण्यास मदत होते आणि ॲसिडिटीची समस्या दूर होते.

4) तोंडाच्या अल्सरवर उपचार : पाणीपुरीमध्ये वापरल्या जाणार्‍या जलजीराच्या पाण्याने तोंडात आलेले अल्सर किंवा फोड बरे होतात.

5) रक्तातील साखर नियंत्रित करते : कमी कार्बयुक्त सामग्रीमुळे, पाणीपुरी ही मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली सिद्ध होऊ शकते. मात्र त्यांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?