दातांच्या समस्येने हैराण? पतंजलीचे हे आयुर्वेदिक दंतमंजन ठरेल फायदेशीर
Patanjali : चुकीचा आहार, जास्त गोड खाणे, तंबाखूचे सेवन, नीट ब्रश न करणे आणि मानसिक ताण यांसारख्या सवयींमुळे दात आणि हिरड्यांचे नुकसान होते. यावर उपाय म्हणून पतंजलीने एक दिव्य दंतमंजन बनवले आहे.

आजच्या काळात दातांशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. चुकीचा आहार, जास्त गोड खाणे, तंबाखूचे सेवन, नीट ब्रश न करणे आणि मानसिक ताण यांसारख्या सवयींमुळे दात आणि हिरड्यांचे नुकसान होते. लहानांपासून वृद्धांपर्यंत दातदुखी, हिरड्यांमधून रक्त येणे, पायरिया आणि तोंडाची दुर्गंधी यांसारख्या समस्या वाढल्या आहेत. तुम्हीही अशा समस्यांचा सामना करत असाल तर आयुर्वेदिक दंतमंजन हा तुमच्यासाठी खास पर्याय ठरू शकतो. तुम्ही पतंजलीचे दिव्य दंतमंजन वापरून दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारू शकता. कारण हे एक नैसर्गिक आयुर्वेदिक उत्पादन आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आयुर्वेदानुसार दातांचे आरोग्य संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी जोडलेले आहे. पतंजलीचे दिव्य दंतमंजन नैसर्गिक जडीबुटींपासून तयार करण्यात आले आहे. हे दंतमंजन दातांच्या स्वच्छतेसोबतच हिरड्या मजबूत करण्यासाठीही फायदेशीर आहे. दिव्य दंतमंजन हे दातदुखी, सूज, हिरड्यांमधून रक्त येण्याच्या समस्येत आराम देते. पायरियाचा त्रास होत असेल तर याच्या नियमित वापराने हिरड्यांना मजबूती मिळते.
पतंजलीचे दिव्य दंतमंजन हे तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास आणि दातांवरील घाण काढण्यास हे मदत करते. तसेच कमकुवत दात मजबूत करण्यासाठी आणि कॅव्हिटी (कीड) रोखण्यासाठी याचा वापर केला जातो. पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे हे दंतमंजन दीर्घकाळ वापरासाठी हे सुरक्षित मानले जाते.
दिव्य दंतमंजनमध्ये कोणते घटक आहेत?
पतंजलीच्या दिव्य दंतमंजनमध्ये असणारे कडुनिंब आणि बाभूळ हे घटक जंतूंशी लढण्यास मदत करतात. तसेच लवंगामुळे दातदुखीपासून आराम मिळतो. वज्रदंतीमुळे हिरड्या मजबूत होतात. यातील पुदिना तोंडाला ताजेपणा देतो आणि दुर्गंधी दूर करतो.
दिव्य दंतमंजनचा वापर कसा करावा?
पतंजलीच्या दिव्य दंतमंजनाचा वापर रोज सकाळी आणि रात्री करू शकता. ब्रशवर किंवा बोटावर थोडे दंतमंजन घेऊन दात आणि हिरड्यांवर हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने गुळण्या करून तोंड स्वच्छ धुवा. चांगल्या परिणामांसाठी याचा नियमित वापर करा. मात्र या दंतमंजनचा अतिवापर करू नका. दातांची किंवा हिरड्यांची समस्या गंभीर असेल, तर दंतवैद्याचा (डेंटिस्ट) सल्ला घेणे आवश्यक आहे.
डिस्क्लेमर : ही एक जाहिरात आहे. यात दिलेली माहिती आणि दावे पूर्णपणे जाहिरातदार कंपनीचे आहेत. TV9 मराठी याची पुष्टी करत नाही. कोणतीही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
