Health Tips : PCOS रुग्णांनी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करावा, वजनही नियंत्रणात येईल; वाचा याबद्दल!

PCOS आजारादरम्यान आपले वजन कमी करणे सोप्पे काम नाहीये. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे, चयापचय, इन्सुलिन प्रतिरोध आणि बीएमआय प्रभावित होतात. या आजारात तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवावे लागते अन्यथा समस्या अधिक वाढू शकतात. निरोगी जीवनशैलीसह आपण वजन कसे कमी करू शकता ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

Health Tips : PCOS रुग्णांनी आहारात 'या' गोष्टींचा समावेश करावा, वजनही नियंत्रणात येईल; वाचा याबद्दल!
आरोग्य
Follow us
| Updated on: Sep 19, 2021 | 10:49 AM

मुंबई : पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम (PCOS) हा हार्मोनल विकार आहे. जो सामान्यतः स्त्रियांमध्ये आढळतो. देशातील प्रत्येक 5 पैकी 1 महिलेला हा रोग होतो. याचा परिणाम स्त्रीच्या प्रजननक्षमतेवरही होतो. मात्र, या रोगावर कोणताही उपचार नाहीये. निरोगी जीवनशैली आणि वजन नियंत्रित करून तुम्ही हा आजार दूर ठेवू शकता. (People with PCOS should include these in their diet)

PCOS आजारादरम्यान आपले वजन कमी करणे सोप्पे काम नाहीये. शरीरातील हार्मोनल बदलांमुळे, चयापचय, इन्सुलिन प्रतिरोध आणि बीएमआय प्रभावित होतात. या आजारात तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवावे लागते अन्यथा समस्या अधिक वाढू शकतात. निरोगी जीवनशैलीसह आपण वजन कसे कमी करू शकता ते आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. या व्यतिरिक्त, आपल्या आहारात कोणते पोषक घटक समाविष्ट केले पाहिजेत जेणेकरून आपले वजन नियंत्रणात राहिल हे देखील आपण बघणार आहोत.

अधिक फायबर खा

PCOS ने ग्रस्त महिला अनेकदा त्यांच्या आहारात फायबरचा समावेश करत नाहीत. फायबर असलेले पदार्थ पाचन तंत्र सुधारण्यास मदत करतात. त्याचे सेवन केल्याने हार्मोन्स चांगले कार्य करतात. आपल्या आहारात फायबर युक्त फळे, भाज्या, कडधान्यांचा समावेश करा.

आहारात प्रथिने समाविष्ट करा

सर्व पोषक घटकांमध्ये प्रथिने सर्वात महत्वाची असतात. हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. प्रथिने वजन कमी करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, भूक बराच काळ शांत ठेवतात आणि स्नायू बनवण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त, यामुळे साखरेची लालसा देखील कमी होते. आहारात कार्बोहायड्रेट आणि फायबरचे प्रमाण चांगले असावे.

खाण्यावर नियंत्रण ठेवा

वाढते वजन कमी करण्यासाठी PCOSच्या रूग्णाने त्याचा आहार कमी करून कमी कॅलरीयुक्त अन्न खाल्ल्ये पाहिजेत. नेहमी नियमित प्रमाणात खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त आपल्या आहारात पोषक घटकांचा समावेश करा.

साखर

आपले वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे साखर असते. PCOS रूग्णांमध्ये टाइप 2 मधुमेह आणि इन्सुलिन प्रतिरोधक लक्षणांना प्रोत्साहन देते. यामुळेच आपल्या आहारात साखरचे प्रमाण कमी करा. त्याऐवजी तुम्ही मध, गूळ, स्टीव्हिया आणि नैसर्गिक गोडवा असलेले इतर फळ समाविष्ट करू शकता.

व्यायाम करा

शारीरिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. काही वर्कआउट केल्याने PCOSच्या रुग्णांना फायदा मिळतो आणि वजनही कमी होते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर चालणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. PCOS असलेल्या रूग्णांनी ग्लूटेन असलेल्या गोष्टी कमी प्रमाणात खाव्यात.

धुम्रपान सोडणे 

धुम्रपान सोडणे आरोग्यासाठी अत्यंत चांगलं आहे. धुम्रपान सोडण्याच्या प्रक्रियेने वजन वाढतं. पण, हे अत्यंत सामान्य आहे. धुम्रपान सोडल्याच्या अनेक आठवड्यांनंतर तुम्हाला कमी भूक लागेल आणि वाढलेलं वजन कमी होईल.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(People with PCOS should include these in their diet)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.