AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CANCER TEST : फुफ्फुसाचा कॅन्सर शोधायचाय ? तर अशी पडताळणी करा, कॅन्सर रिसर्च संस्थेचा दावा

कॅन्सरचे निदान करण्यासाठी एका संस्थेने क्लबिंग फिंगर टेस्टचा पर्याय शोधून काढला आहे. या संस्थेने दावा केला आहे की आपल्या बोटांच्या आकारावरुन आपल्या शरीरात कोणता आजार आहे हे ओळखता येऊ शकते. पाहा काय आहे नेमका या संस्थेचा दावा..

CANCER TEST : फुफ्फुसाचा  कॅन्सर शोधायचाय ? तर अशी पडताळणी करा, कॅन्सर रिसर्च संस्थेचा दावा
Clubbing Test For Lung CancerImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: May 21, 2024 | 10:46 PM
Share

मुंबई : आता आपल्या बोटांच्या नखांद्वारे कर्करोगाचे प्राथमिक निदान करता येणार आहे. कॅन्सर रिसर्च नावाच्या एका संस्थेने दावा केला आहे की, या गंभीर आजाराचे प्राथमिक निदान साध्या फिंगर क्लबिंग टेस्टने केले जाऊ शकते असे म्हटले आहे. या टेस्टला स्कॅम्रोथची विंडो टेस्ट ( schamroth’s window test ) असे म्हटले जात आहे. या चाचणीमुळे आता शरीरातील इतर जुने आजार आणि कर्करोगाचे प्राथमिक निदान करणे शक्य होणार असल्याचे म्हटले जाते.

फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी क्लबिंग चाचणीचा पर्याय पुढे आला आहे. त्यामुळे कर्करोगाचे प्राथमिक निदान करणे आता सोपे झाले आहे. कॅन्सर रिसर्च नावाच्या एका संस्थेने संशोधन केले आहे. त्यामुळे कॅन्सरसारख्या दुर्धर गंभीर आजाराचे प्राथमिक निदान साध्या फिंगर क्लबिंग टेस्टने केले जाऊ शकणार आहे. फिंगर क्लबिंग ही चाचणी फुफ्फुसाच्या कर्करोगाची प्रारंभिक चिन्हे ओळखू शकते असे कॅन्सर रिसर्च नावाच्या एका संस्थेने म्हटले आहे.

तुमच्या शरीरात फुफ्फुसाचा कर्करोग किंवा फुफ्फुसाच्या इतर गंभीर आजाराची पूर्वलक्षणे शोधायची असतील तर ही ‘क्लबिंग चाचणी’ हा एक सोपा आणि प्रभावी उपाय असू शकतो. काही कारणांनी आपल्या बोटांच्या किंवा पायाच्या नखा खालील पेशी घट्ट होतात आणि नखं वरच्या दिशेने वळू लागतात अशा परिस्थितीत फिंगर क्लबिंग किंवा डिजिट क्लबिंग दिसून येते. हा बदल सहसा शरीरातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे किंवा जुनाट आजाराचे लक्षण असते. त्यामुळे तुमच्या नखांच्या खालील त्वचेच्या पेशींमध्ये वाढ झाली असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांची भेट घ्यायला हवी.

Clubbing Test For Lung Cancer

Clubbing Test For Lung Cancer

क्लबिंग टेस्ट कशी करावी

क्लबिंग टेस्ट करताना दोन्ही हातांची तर्जनी जोडावी. तुमच्या दोन्ही हातांची तर्जनी एकमेकांसमोर आणावी. त्यावेळी आपल्या तर्जनीच्या नखांच्या दरम्यान हिऱ्याच्या ( डायमंड ) आकाराची जागा दिसते का ते पाहावी. नखांच्या अगदी खाली एक लहान हिऱ्याच्या आकाराची जागा दिसल्यास, क्लबिंग नाही असे समजावे. जर नखांमधील ही जागा दिसत नसेल आणि बोटे पूर्णपणे एकमेकांच्या जवळ असतील तर ते क्लबिंगचे लक्षण असू शकते.

Follow Us
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गाव...
जीव गेला तरी जमीन देणार नाही! शक्तीपीठ महामार्गाविरोधात 22 गावांतील शेतकरी आक्रमक
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर तटकरे...
श्रीवर्धन आमचा अभेद्य बालेकिल्ला! महेंद्र दळवींच्या टीकेवर सुनील तटकरेंचं सूचक उत्तर