जर तुम्हाला ‘हे’ आजार असतील दूध पिण्याची करू नका चूक, आरोग्याचं होईल सर्वात मोठं नुकसान!

एक गोष्ट लक्षात ठेवे की प्रत्येकाच्या शरीराला दुधापासून फायदा होईल असं होत नाही. कारण काही आजार हे दूध पिल्यामुळे निर्माण होतात. त्यामुळे आता आपण अशा 5 आजारांबद्दल जाणून घेणार आहोत जे झाल्यावर दुध पिऊ नये कारण ते शरीराला हानिकारक ठरू शकतं.

जर तुम्हाला 'हे' आजार असतील दूध पिण्याची करू नका चूक, आरोग्याचं होईल सर्वात मोठं नुकसान!
drinking milkImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 24, 2023 | 11:48 PM

Health News : दूध हे शरीरासाठी हेल्थी मानलं जातं, पालक लहान मुलांच्या आहारात नेहमी दुधाचा समावेश करत असतात. लहान मुलांसोबतच ज्येष्ठ लोकं, तरूणाई त्यांच्या आहारात, डाएटमध्ये दुधाचा समावेश मोठ्या प्रमाणात करत असतात. तसंच डॉक्टर कॅल्शियम कमी झाल्यावर दूध पिण्याचा सल्ला देतातच. पण एक गोष्ट लक्षात ठेवे की प्रत्येकाच्या शरीराला दुधापासून फायदा होईल असं होत नाही. कारण काही आजार हे दूध पिल्यामुळे निर्माण होतात. त्यामुळे आता आपण अशा 5 आजारांबद्दल जाणून घेणार आहोत जे झाल्यावर दुध पिऊ नये कारण ते शरीराला हानिकारक ठरू शकतं.

इन्फ्लेमेशनची समस्या

जर कोणाला शरीराला सूज येण्याशी संबंधित काही आजार असतील तर त्यांनी दूध पिऊ नये. कारण दुधात असलेले सैचुरेटेड फॅट हे शरीरातील इन्फेमेशन वाढवतात. तसंच काही संशोधनात शरीरात सूज निर्माण करण्याचं आणि वाढवण्याचं कारण दूध ठरलं आहे.

लिवरशी संबंधित समस्या असलेल्यांनी दुधापासून लांब राहावं

ज्या लोकांना लिवरशी संबंधित काही समस्या असतील त्यांनी दुधापासून लांब राहावं. लीवरशी संबंधित समस्या असतील तर दूध नीट पचत नाही, त्यामुळे लिवरला सूज येण्याची शक्यता असते. त्यासोबतच शरीरात फॅट जमा होण्यास सुरुवात होते.

पीसीओएस

बर्‍याच स्त्रियांना मासिक पाळी उशीरा येणे किंवा पीसीओएस सारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा स्त्रियांनी दुधापासून लांब राहीलं पाहीजे. कारण पीसीओएसमध्ये स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल इंबैलेंस होत असतो. त्यामुळे अशावेळी दुधाचे सेवन करू नये.

पचनसंस्था खराब असणे

भरपूर लोकांना अपचन, गॅस, कफ सारख्या समस्या होत असतात. अशा लोकांनी दूध पिऊ नये. कारण कमजोर पचनसंस्था असली तर दूध ती समस्या आणखी वाढवते.

दुधाची ॲलर्जी

काही लोकांना दुधाची ॲलर्जी असते. अशा लोकांनी जर दूध पिलं तर त्यांना गॅस, झळझळ, सूज निर्माण होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे ॲलर्जी असलेल्या लोकांनी दुधापासून लांबच राहावे.

Non Stop LIVE Update
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.