AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपतानाची एक चूक सकाळी वाढवेल साखरेची पातळी, वाचा नेमकं कारण

काही लोकांना रात्री झोपताना अंधारात झोपणे आवडते, तर काही लोकांना खोलीत कृत्रिम प्रकाशात झोपणे आवडते. जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे रात्री खोलीत लाईट लावून झोपतात, तर असे केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

रात्री झोपतानाची एक चूक सकाळी वाढवेल साखरेची पातळी, वाचा नेमकं कारण
SleepImage Credit source: file
| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 11:49 AM
Share

रात्री अनेक लोक आपल्या खोलीत वेगवेगळ्या रंगाचे लाईटस्‌ (Lights) लावून झोपतात. या आकर्षक लाईटस्‌ना मोठी मागणीदेखील असते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल जे खोलीत लाईट (Bright room) लावण्याला प्राधान्य देतात, तर हे तुमच्या आरोग्याला खूप धोकेदायक ठरु शकते. अभ्यासानुसार, रात्री कृत्रिम प्रकाशात झोपल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. त्यांनी झोपताना (sleeping) वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशाच्या संपर्कात येण्यावर संशोधन केले आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की एक रात्र कृत्रिम प्रकाशात झोपल्याने ग्लुकोजची पातळी वाढते. चयापचय बिघडण्यास सुरुवात होते आणि हृदयविकार, मधुमेह, मेटाबॉलिक सिंड्रोम होऊ शकते.

इन्सुलिनचं प्रमाण वाढण्याची शक्यता

रात्रीच्या झोपेच्या वेळी कृत्रिम प्रकाशामुळे इन्सुलिनवर त्याचा परिणाम होत असतो. मज्जासंस्था अधिक सक्रिय होऊ शकते. शास्त्रज्ञांनी संशोधनात कृत्रिम प्रकाश आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर यांच्यात परस्पर संबंध सांगितला आहे. झोपेच्या पद्धतींमुळे चयापचय समस्या देखील होऊ शकतात. या अभ्यासात 20 जणांचा समावेश करण्यात आला होता. एका खोलीत कृत्रिम प्रकाश आणि एका खोलीत संथ प्रकाश ठेवण्यात आला होता. दोन्ही खोल्यांमध्ये 10-10 लोकांना 1-1 दिवस झोपवले गेले आणि नंतर त्यांचे मूल्यांकन केले गेले. जे लोक कृत्रिम लाईट असलेल्या खोलीत झोपतात त्यांची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता 15 टक्के कमी होते, तर, जे लोक कमी प्रकाशाच्या खोलीत झोपतात त्यांची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता 4 टक्के कमी होती. दुसरीकडे, इन्सुलिनच्या संवेदनशीलतेच्या बाबतीत, प्रकाशमय खोलीत झोपणाऱ्या आणि कमी प्रकाशात झोपणाऱ्या लोकांमध्ये 16 टक्के घट असणा-या लोकांमध्ये इन्सुलिन संवेदनशीलतेत 3 टक्के वाढ दिसून आली त्याच वेळी, जास्त प्रकाश आणि कमी प्रकाश असलेल्या खोलीत झोपलेल्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण फरक आढळला नाही. दुसरीकडे प्रकाशमय खोलीत झोपलेल्या लोकांमध्ये इन्सुलिनचे प्रमाण वाढलेले दिसले.

झोपेवर परिणाम

या संशोधनाच्या 1 आठवड्यानंतर झोपेच्या गुणवत्तेच्या विश्लेषणात असे दिसून आले, की दोन्ही गटांच्या झोपेच्या वेळेत फरक आहे. प्रयोगादरम्यान केलेल्या स्लीप मॅक्रोस्ट्रक्चर विश्लेषणातून झोपेची गुणवत्ता दिसून आली, प्रकाशित खोलीतील लोकांच्या तुलनेत कमी प्रकाश असलेल्या खोल्यांमध्ये झोपलेल्या लोकांची झोपेची गुणवत्ता अधिक होती. या संशोधनातून असा निष्कर्ष काढण्यात आला की रात्रीच्या झोपेच्या वेळी कृत्रिम प्रकाश मज्जासंस्था सक्रिय करून ‘कार्डिओमेटाबॉलिक’ कार्यात बदल होतात. पण याचा ‘मेलाटोनिन’च्या पातळीवर फारसा परिणाम होत नाही. रात्री झोपताना प्रकाश कमी केल्यास झोपेची गुणवत्ता वाढून चांगली झोप येऊ शकते.

इतर बातम्या:

IPL 2022 GT vs LSG Live Streaming: गुजरात टायटन्स vs लखनौ सुपर जायंट्स Live सामना कधी आणि कुठे पाहता येईल?

Success Story | रुग्णसेवा करत काळ्या आईचीही मशागत, डॉक्टरांनी पिकवलेले खरबूज आता परदेशात निघाले, वाचा सविस्तर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.