धक्कादायक ! भारतीय पुरुषांची प्रजनन क्षमता घटली?; संशोधनातील नवा निष्कर्ष काय?

गेल्या 46 वर्षात जगभरात स्पर्म काउंटमध्ये 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. परंतु अलिकडच्या वर्षांत त्यात झपाट्याने घट होत आहे. या संशोधनात भारतासह सुमारे 23 देशांचा समावेश करण्यात आला होता.

धक्कादायक ! भारतीय पुरुषांची प्रजनन क्षमता घटली?; संशोधनातील नवा निष्कर्ष काय?
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 5:19 PM

नवी दिल्ली – भारतासह जगभरातील पुरूषांच्या शुक्राणूंची (sperms) संख्या कमी होत चालली आहे. वैज्ञानिकांच्या एका टीमने 7 वर्षांच्या संशोधनानंतर हा दावा केला आहे. 2011 ते 2018 या सालांदरम्यान करण्यात आलेल्या या संशोधनाचा (research) अहवाल ह्युमन रिसर्च रिप्रॉडक्शन जर्नलमध्ये प्रकाशित (published in journal)करण्यात आला आहे. या संशोधनासाठी सुमारे 7 वर्षांचा कालावधी लागला असून त्यातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये शास्त्रज्ञांच्या अनेक गटांनी सहभाग नोंदवला होता. या कालावधीत त्यांनी जगभरातील 53 देशांतील 57 हजारांहून अधिक पुरूषांच्या शुक्राणूंच्या नमुन्यांच्या आधारे 223 अभ्यास केले. त्यामध्ये दक्षिण अमेरिका, एशिया आणि आफ्रिका खंडातील देशांचा सहभाग होता, जेथे यापूर्वी असा अभ्यास कधीच करण्यात आला नव्हता. या भागातील लोकांचा प्रथमच अभ्यास करण्यात आल्याचे, तसेच या भागातील लोकांमधील टोटल स्पर्म काऊंट आणि स्पर्म कॉन्सन्ट्रेशन (sperm concentration) कमी दिसून आल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले होते.  यापूर्वी उत्तर अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकारचे संशोधन करण्यात आले होतो व तेथेही अशीच आकडेवारी होती.

हे सुद्धा वाचा

संशोधन काय म्हणते ?

शुक्राणूंची संख्या केवळ प्रजननक्षमतेशी निगडीत नाही तर त्याचा पुरुषांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. शुक्राणूंची संख्या कमी झाल्यास टेस्टिक्युलर कॅन्सरसह (पुनरुत्पादक भाग) अनेक आजार होऊ शकतात. तसेच यामुळे पुरुषांच्या आयुर्मानावरही परिणाम होतो. 2000 सालापासून यामध्ये ( शूक्राणूंची संख्या) वेगाने घट झाल्याचे या अभ्यासात दिसून आले.

शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

या संशोधनात सहभागी झालेले हिब्रू युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर हेगई लेविन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, भारतात ही घसरण अधिक दिसून आली आहे. येथून आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली आहे. त्यावर संशोधन केले असता आम्हाला असे आढळले आहे की भारतामध्येही पुरूषांमधील शुक्राणूंची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी झाली आहे. मात्र ही स्थिती संपूर्ण जगासारखीच आहे. खराब जीवनशैली आणि वातावरणातील घातक केमिकल्स, हे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होण्याचे एक प्रमुख कारण आहे, असेही लेविन यांनी नमूद केले.

गेल्या 46 वर्षांत जगभरात स्पर्म काउंटमध्ये 50 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. परंतु गेल्या काही वर्षांत त्यामध्ये तीव्र घट झाल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती महामारीसारखी आहे. हे (शूक्राणूंच्या संख्येत घट होणे) घडत असून आपली इच्छा असली तरी आपण त्यातून सुटू शकत नाही, असे लेविन म्हणाले.

मानवाचे अस्तित्व धोक्यात ? 

या जगात राहणाऱ्या सर्वांसाठी स्वच्छ वातावरण उपलब्ध करण्याची बाजू मांडताना त्यांनी सांगितले की, मनुष्यासह सर्व प्रजाती सुरक्षित राहण्यासाठी स्वच्छ तसेच निरोगी वातावरण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच, प्रजननक्षमतेवर परिणाम करणारे (हानिकारक) घटक काढून टाकले पाहिजेत.

1973 ते 2018 या कालावधीतील आकडेवारीनुसार, शूक्राणूंच्या संख्येत दरवर्षी सरासरी 1.2 टक्के घट झाली आहे. तर 2000 सालानंतर यामध्ये दरवर्षी २.६ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

ही आपल्यासमोरील एक गंभीर समस्या असून ती वेळीच सावधपणे हाताळली नही तर मानवाचे अस्तित्वच धोक्यात येईल. याबाबत भारतात स्वतंत्र संशोधन करणे गरजेचे आहे, असेही अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.