AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blood Type Diet: वजन घटवण्यासाठी प्रत्येकाला वेगळ्या आहाराची गरज का ? तुमच्या रक्तगटात लपलंय उत्तर

वजन कमी करण्यासाठी एक ठराविक डाएट उपयोगाचे ठरत नाही. प्रत्येक व्यक्तीनुसार, त्याचे डाएट बदलत राहते. मात्र हे असं का, याचं उत्तर तुमच्या रक्तगटामध्ये लपलं आहे.

Blood Type Diet: वजन घटवण्यासाठी प्रत्येकाला वेगळ्या आहाराची गरज का ? तुमच्या रक्तगटात लपलंय उत्तर
| Updated on: Nov 22, 2022 | 11:13 AM
Share

नवी दिल्ली – आपल्या शरीरात वाहणाऱ्या रक्ताचा (blood), रोग आणि त्यांच्या उपचारांच्या शक्यतांवर परिणाम होतो. ए+, बी+, ओ+, एबी+, ए-, बी-, ओ-, आणि एबी- (A+, B+, O+, AB+, A-, B-, O-, AB-) असे 8 रक्तगट असतात, प्रत्येक व्यक्तीचा या 8 रक्तगटांपैकी एक रक्तगट (blood type) असतो. प्रत्येक रक्तगटाचे स्वत:चे असे विशिष्ट गुण असतात. अनेक अभ्यांसामध्ये, रक्तगटाचा हृदयरोगाच्या (heart disease)जोखमीशी संबंध जोडण्यात आला आहे. ए, बी आणि एबी या (A, B, AB) हे रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना हृदयरोगाचा धोका अधिक असतो, असे म्हटले जाते. तर ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना अधिक डास चावतात, असे काही अभ्यासांत नमूद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर काही तज्ज्ञांनी असा दावा केला आहे की, रक्तगटाच्या आधारे आहार घेतल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत फायदा होई शकतो. म्हणजेच रक्तगटानुसार, प्रत्येक व्यक्तीचा आहार वेगळा ठरतो.

काय आहेत ब्लड टाइप डाएटचे फायदे?

नॅचरोपथी फिजिशिअन पीटर डी’ॲडमो यांनी त्यांच्या संशोधनाच्या आधारावर एक पुस्तक लिहीले आहे. लोकांनी आपल्या रक्तगटानुसार आहार घेतल्यास ते निरोगी राहू शकतात, दीर्घायुषी होऊ शकतात व वजन कमी करण्यातही यशस्वी ठरू शकतात, असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, आपण आपल्या रक्तगटानुसार (योग्य ठरणारे) खाद्यपदार्थ सेवन केल्यास ते अधिक प्रभावीपणे पचतात आणि (त्यामुळे) आपल्या शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळतात. प्रत्येक व्यक्तीचा रक्तगट कोणता, यानुसार त्या व्यक्तीसाठी हर्ब्स, मसाले तसेच व्यायाम यांची निवड करण्यात यावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ब्लड टाइप A

ए (A) रक्तगट असणाऱ्या लोकांनी मांस असलेली उत्पादने खाणे टाळावे. त्यांनी आहारामध्ये फळे आणि भाज्या, बीन्स, शेंगदाणे आणि संपूर्ण धान्य समाविष्ट केले पाहिजे. कारण टाइप ए रक्तगट असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती ही अधिक संवेदनशील असते. तसेच ए रक्तगटातील लोकांना वजन कमी करायचे असेल तर सीफूड, भाज्या, अननस, ऑलिव्ह ऑईल आणि सोया हा त्यांच्यासाठी उत्तम आहार ठरेल. मात्र त्यांनी दुग्धजन्य पदार्थ, गहू, मका, राजमा हे पदार्थ खाणे टाळावे.

ब्लड टाइप B

ज्यांचा रक्तगट बी (B) आहे त्यांनी वैविध्यपूर्ण आहार निवडावा. त्यामध्ये मांस, फळं, दुग्धजन्य पदार्थ, सी फूड आणि धान्य यांचा समावेश असावा. टाइप बी रक्तगट असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या, अंडी, लिव्हर आणि लिकोरिस चहाची निवड केली पाहिजे. मात्र चिकन, मका, शेंगदाणे, गहू या गोष्टी खाणे टाळावे.

ब्लड टाइप AB

एबी (AB) रक्तगट असणाऱ्या लोकांनी दुग्धजन्य पदार्थ, टोफू, मांस, मासे धान्य, फळे आणि भाज्या यांचे सेवन करावे. तसेच टोफू, सी फूड, हिरव्या भाज्या आणि केल्प हे वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय ठरतील. पण चिकन, मका, राजमा हे पदार्थ खाणे टाळायला हवे.

​​ब्लड टाइप O

ओ (O)रक्तगट असणाऱ्यांनी उच्च-प्रथिने असलेले पदार्थ निवडावेत. ओ रक्तगटाच्या लोकांनी मांस, भाज्या, मासे आणि फळे जास्त प्रमाणात खावीत आणि धान्य, बीन्स आणि शेंगांचे मर्यादित प्रमाणात सेवन केले पाहिजे. तसेच वजन कमी करायचे असेल सीफूड, केल्प, लाल मांस, ब्रोकोली, पालक आणि ऑलिव्ह ऑईल हे सर्वोत्तम पर्याय ठरतात. पण त्यांनी गहू,मका आणि दुग्दजन्य पदार्थ खाऊ नयेत.

रक्तगटानुसार आहार किती फायदेशीर ठरतो ?

डी’ॲडमो यांची रक्तगटानुसार आहार घेण्याची ही थिअरी निरोगी व प्रक्रिया न केलेले पदार्थ तसेच व्यक्तीच्या पचनशक्तीवर केंद्रित आहे. तुम्ही चांगल्या आरोग्यासह वजन कमी करण्यासंदर्भात सहकार्य करू शकता. मात्र या प्रकरणी आणखी काही अभ्यास झालेला दिसून आलेला नाही. मात्र 2014 साली झालेल्या एका अभ्यासात असे आढळले आहे की रक्तगटाच्या आधारे आहार करणाऱ्या लोकांचा कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब सुधारला झाला होता.

( टीप- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.