Health | सतत होणारी अॅसिडिटी कॅन्सर होण्याचे कारण बनू शकते, जाणून घ्या संशोधनात नेमते काय म्हटले आहे!
जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर अशा स्थितीत तुम्ही टेस्ट करून घ्यायला हव्यात. याशिवाय खाण्याची काळजी घ्यावी. झोपण्याच्या तीन ते चार तास आधी जेवण करावे आणि दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करू नका.

मुंबई : अॅसिडिटी (Acidity) ही एक सामान्य आरोग्य समस्याच आहे. मात्र, अनेक लोक अॅसिडिटीमुळे कायमच त्रस्त असतात. अॅसिडिटीची समस्या आपल्या चुकीच्या आहारामुळे होते. परंतु काहीवेळा पोट रिकामे असण्यामुळे देखील होऊ शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये हे मसालेदार अन्नामुळे (Spicy food) होते, परंतु अनेक वेळा घरी बनवलेले अन्न खाल्ल्यानंतरही अॅसिडिटी होते. लोक बर्याचदा याकडे दुर्लक्ष करतात. परंतु तज्ञांचे म्हणणे आहे की, जर एखाद्या व्यक्तीवर त्याचा सतत परिणाम होत असेल तर यामुळे गंभीर आरोग्य (Health) समस्या उद्भवू शकतात. या आरोग्य समस्या नेमक्या कोणत्या आहेत, याबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
कर्करोग होण्याचा धोका अधिक
अॅसिडिटीचा त्रास होणे ही एक सामान्य समस्या आहे. परंतु असे मानले जाते की यामुळे एखाद्या व्यक्तीला कर्करोग देखील होऊ शकतो. तज्ञांच्या मते, हे कोणालाही होऊ शकते, परंतु यामुळे अन्ननलिकेमध्ये समस्या उद्भवू शकतात. मोठ्या संख्येने लोकांना ही समस्या असते आणि ही स्थिती गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स डिसीज (GERD) मध्ये विकसित होते.
संशोधन काय सांगते
संशोधनानुसार, ज्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास होतो, त्यांना भविष्यात अन्ननलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता असते. संशोधनात असे म्हटले आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये, अन्ननलिका कर्करोग गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्सशी जोडला जाऊ शकतो. असे म्हणतात की जे लठ्ठ असतात त्यांना अॅसिडिटीमुळे हा आजार जास्त प्रमाणात होतो.
या टिप्स फॉलो करा
जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर अशा स्थितीत तुम्ही टेस्ट करून घ्यायला हव्यात. याशिवाय खाण्याची काळजी घ्यावी. झोपण्याच्या तीन ते चार तास आधी जेवण करावे आणि दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची चूक करू नका. अॅसिडिटीची समस्या कायमची दूर करण्यासाठी घरगुती उपाय करून पहायचे असतील तर त्यात अजवाइन, जिरे आणि काळे मीठ टाकून त्याची मदत घ्या.
