AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tumor : अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर… मग झाले असे काही की…

त्यांचा ट्यूमर शरीरातील अनेक भागांपर्यंत पोहचून गेला होता. आता काय करावे समजत नव्हते... सामान्य सर्जरीने या ट्यूमरला काढून टाकणे शक्य नव्हते. मग तेव्हा डॉक्टरांनी एक विशेष प्रयत्न करुन एक शस्त्रक्रिया केली. सात तासांपर्यंत चाललेल्या या शस्त्रक्रियेने रुग्णाचे प्राण वाचवण्यास अखेर यश आले.

Tumor : अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर... मग झाले असे काही की...
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 8:17 AM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतात कॅन्सरचा (Cancer) विळखा वाढताना दिसून येत आहे. अनेकाना आपल्याला कॅन्सर आहे, हे खूप उशिराने समजते तोपर्यंत हातातील बरीच वेळ निघून गेलेली असते. कोरोना काळात तर कॅन्सरग्रस्त रुग्णांचे प्रचंड हाल बघायला मिळाले होते. आधीच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याने त्यात बाहेरील संधिसाधू आजारांविरुद्ध लढावे लागत असते. कॅन्सर निर्माण करणारा ट्यूमर शरीरातील कुठल्याही अवयवाला हानी पोहचवू शकतो. परंतु जर हा ट्यूमर शरीरातील अन्य भागांमध्ये तसेच नसांमध्ये पसरल्यास हे प्रकरण जिवावर बेतू शकते. असेच एक प्रकरण वैशाली येथील मॅक्स हॉस्पिटलमध्ये समोर आले आहे. या ठिकाणी डॉक्टरांनी कॅन्सच्या उपचारातील सर्वात दुर्मीळ अशी सर्जरी केली. यात, एक ॲप्पलबाय प्रक्रियेव्दारे ५४ वर्षीय शिक्षिकेचे प्राण वाचवण्यास डॉक्टरांना यश आले आहे. महिलेच्या अग्नाशयात (pancreas) एक मोठा ट्यूमर (tumor) होता. जो रक्तनलिकांपर्यंत पोहोचला होता. महिलेवर तब्बल सात तास शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. विवेक मंगला यांच्या नेतृत्वात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

ट्यूमरचं निदान झालं

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिलेला तिच्या पोटाच्या वरील भागात काही तरी गडबड वाटत होती. तसेच त्या भागात वारंवार सूज निर्माण होत होती. महिलेचे वजनदेखील कमी होत होते. काळी काळानंतर तिला अग्नाशयाचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. हा ट्यूमर लीवरला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांपर्यंत पोहचला होता.

काय असतात शक्यता

शरीरातील बऱ्याच भागापर्यंत हा ट्यूमर पोहचला असल्याने संबंधित महिलेची परिस्थिती अधिकच गंभीर होत होती. महिलेची सर्व तपासणी करण्यात आल्यानंतर तिच्यावर केमोथेरपी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याचा परिणाम म्हणून ट्युमरचा आकारदेखील काहीसा कमी झाल्याचे डॉक्टरांना जाणवले. परंतु महिलेची बिकट स्थिती बघता हा ट्यूमर संपूर्णपणे काढणे आवश्यक होते. त्यामुळे डॉ. विवेक मंगला यांच्या नेतृत्वात सर्जिकल ऑन्कोलॉजीच्या टीमने ॲप्पलबाय सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मंगला यांनी सांगितले, की ॲप्पलबाय प्रक्रिया पेनक्रियाटीक बॉडी मोठा ट्यूमर झालेल्या रुग्णांसाठी शेवटचा उपाय म्हणून वापरली जात असते. मोठी सर्जरी असली तरी तिला सुरक्षीत मानले जात असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, निदान करण्यास उशीर झाल्याने साधारणत:कॅन्सर हा शेवटच्या टप्प्यात पोहचत असतो. या वेळी गरजेनुसार केमोथेरपी, रेडियोथेरपीसोबत सर्जरी करण्याचाही सल्ला दिला जात असतो. कॅन्सर पुन्हा होऊ नये, यासाठी ट्यूमरला पूर्णपणे काढले जात असते.

असा असतो अग्नाशयाचा कॅन्सर

डॉक्टरांच्या मते, अग्नाशय आपल्या पचनक्रियेचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे. जेव्हा अन्न पोटात जाते तेव्हा अग्नायश पॅनक्रियाटीक रसायन निर्माण करत असत, ज्याच्या माध्यमातून खाल्लेल अन्न पचन होत असत. अग्नाशयाच्या पेशी अनियंत्रित पध्दतीने वाढल्याने ट्यूमरची निर्मिती होत असते. त्याचे नंतर कॅन्सरमध्ये रुपांतर होऊ शकते.

इतर बातम्या

Hariharan Birthday : दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते, पद्मश्री हरिहरन यांचा जीवनप्रवास…

अग्नाशयापासून थेट नसांपर्यंत पसरला ट्यूमर… मग झाले असे काही की…

IPL 2022, Orange Cap : ऑरेंज कॅपवरील आंद्रे ‘राज’ 24 तासांंत गेलं, ईशानने हिसकावली ऑरेंज कॅप, बटलर दुसऱ्या स्थानी

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.