Herbal Tea | घशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी या चार ‘हर्बल टी’ आहेत प्रभावी…

Herbal Tea | घशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी या चार ‘हर्बल टी’ आहेत प्रभावी...
सांकेतिक फोटो

हिवाळ्यात सर्दी, खोकल्यासह इतर संधीसाधू आजार हे सामान्य आहे. अनेक वेळा यासाठी डॉक्टरांकडे न जाता घरगुती उपाय योजनांना प्राधान्य दिले जात असते. आज आम्ही घशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला अशाच काही ‘हर्बल टी’बाबत माहिती देणार आहोत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jan 19, 2022 | 1:46 PM

मुंबई : घशाच्या संसर्गापासून आराम मिळविण्यासाठी हर्बल चहा (herbal tea) पिण्याचा सल्ला दिला जातो. हिवाळ्याच्या हंगामात, बहुतेक लोक सर्दी आणि खोकल्याशिवाय घशातील संसर्ग किंवा जळजळ या समस्येने त्रस्त असतात. त्यापासून आराम मिळवण्यासाठी ते डॉक्टरांकडून उपचार घेतात, तसेच विविध घरगुती उपाय करून पाहतात. यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे हर्बल टी. हिवाळ्यात (winter) उबदार (Warm) राहण्यासाठी चहा हा उत्तम पर्याय आहे. बहुतेक लोकांना दुधापासून बनवलेला चहा प्यायला आवडत असला तरी, त्यापेक्षा हर्बल चहा आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानला जातो. शरीर आतून निरोगी ठेवण्यासोबतच घशातील खवखव दूर करण्यात हर्बल चहा प्रभावी आहे. घशातील सूज दूर करण्यासाठी हर्बल चहा पिण्याचा सल्ला दिला जातो. हर्बल चहा बनविण्याचे अनेक प्रकार आहेत. हिवाळ्यात अनेक जण प्राधान्याने हर्बल चहा पित असतात. आज आपण अशाच पाच हर्बल चहाबद्दल माहिती घेणार आहोत ज्याचे सेवन केल्याने घशाच्या अनेक समस्या दूर होतील.

1) काळा चहा (Black tea)

दुधापासून बनलेल्या चहापेक्षा काळ्या चहाचे महत्व अधिक आहे. अनेक जण काळा चहा पिण्यास प्राधान्य देत असतात. कॅफिनयुक्त चहाऐवजी काळ्या चहाचे सेवन करू शकतात. यामुळे घसा खवखवण्यासोबतच त्यातील सूजही कमी होऊ शकते.
काळा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

2) पुदिन्याचा चहा (Peppermint tea)

पुदिन्यात असे अनेक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळतात, जे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही महत्त्वाचे आहेत. घश्‍यातील खवखवीपासून पुदन्याच्या चहाने नक्कीच आराम मिळू शकतो, पुदिन्यात अनेक आयुर्वेदीक गुणधर्म आढळतात. घशाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी पुदिन्याचा चहा दिवसातून एकदा घ्यायला हवा, शिवाय यामुळे पचनक्रिया.ही सुधारते.

3) कॅमोमाइल चहा (Chamomile tea)

हा एक उत्तम हर्बल चहा मानला जातो. अँटिऑक्सिडंट्स व्यतिरिक्त, त्यात अँटि-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. यातून घसा खवखवण्याची समस्या कायमची मिटू शकते. हिवाळ्यात श्वसनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी या हर्बल चहाचे सेवन करणे चांगले मानले जाते.

4) ज्येष्ठमधाचा चहा (mulethi tea)

गळ्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मुळेथी म्हणजेच ज्येष्ठमधाचा चहा हा एक उत्तम घरगुती उपाय मानला जातो. यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीवायरल गुणधर्म घशातील खवखव दूर करण्याचे काम करतात. जेष्ठमधाचा चहा बनवला जात असला तरी आपण त्याच्या गरम पाण्यासोबत गुळण्यादेखील करु शकतो. हा उपाय केल्याने घशाला आराम मिळेल.

इतर बातम्या :

तुम्ही गर्भवती आहात…आणि तरीही अकोल्होलचं सेवन करता आहात…मग सावधान

सर्दीपासून बचावासाठी घरीच बनवा स्वादिष्ट बेसनाचा हलवा, जाणून घ्या रेसीपी

Love Relationship: इमोशनल पार्टनरला सांभाळण्यासाठी हे उपाय करुन पाहा, नात्यात परतेल गोडवा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें