Weight Loss Journey : गंभीर दम्याचा आजार, उपचारांसाठी अनंत अंबानी सहन करत राहिला, वाचा वजन-कमी जास्त का झालं?

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी याचा नुकताच राधिक मर्चंट हिच्याशी साखरपुडा झाला. यादरम्यान त्याच्या पुन्हा वाढलेल्या वजनावरून खूप चर्चा सुरू आहे. काही वर्षांपूर्वी अनंत याने नैसर्गिक पद्धतीने 108किलो वजन कमी केले होते, मात्र आता त्याचे वजन पुन्हा वाढल्याचे दिसत आहे.

Weight Loss Journey : गंभीर दम्याचा आजार, उपचारांसाठी अनंत अंबानी सहन करत राहिला, वाचा वजन-कमी जास्त का झालं?
Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 02, 2023 | 10:11 AM

नवी दिल्ली – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सर्वात लहान मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा नुकताच राधिक मर्चंट हिच्याशी साखरपुडा झाला. या समारंभात संपूर्ण अंबानी कुटुंब सहभागी झालं होतं आणि हा कार्यक्रम त्यांच्या मुंबईतील अँटालिया या निवासस्थानी शानदारपणे पार पडला. कुटुंबीय, मित्रमंडळी यांच्याशिवाय अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीही अनंत व राधिका यांना शुभेच्छा देण्यास उपस्थित होते. राधिका ही उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. अनंत आणि राधिका लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा दोन्ही कुटुंबांनी 2019 मध्ये केली होती. दरम्यान,या दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चेशिवाय, अनंतचे पुन्हा वाढलेले वजन (weight gain) ही एक गोष्टही सध्या खूप चर्चेत आहे.

काही वर्षांपूर्वी अनंत याने मेहनतीने 108किलो वजन कमी केले होते, मात्र त्याचे वजन आता पुन्हा वाढलेले दिसत आहे. एवढ्या मेहनतीने घटवलेलं पुन्हा कसं वाढलं, यावरून पुन्हा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 2016 मध्ये 108 किलो वजन घटवल्यानंतर अनंत अंबानी वेटलॉस करणाऱ्यांसाठी एक आदर्श ठरले होते. पण सध्या त्याचं वजन पुन्हा वाढलंय. यामागे नेमकं काय कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी लोक गूगल सर्चदेखील करतायत. अनंत अंबानीच्या या वेटलॉस प्रवासाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात

अनंत अंबानीची तब्येत आणि वाढत्या वजनाचा संघर्ष

हे सुद्धा वाचा

2017 मध्ये नीता अंबानी यांनी एक मुलाखत दिली होती, त्या दरम्यान त्यांनी अनंत अंबानीच्या स्थूलपणाबद्दल मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली होती. अनंत अंबानी याला अस्थमा असल्यामुळेल त्याला भरपूर स्टिरॉइड्स घ्यावे लागतात. त्यामुळे त्याला स्थूलपणाचा आजार जडल्याचं नीता यांनी नमूद केलं. रिपोर्ट्सनुसार, पूर्वी अनंत याचे वजन 208 किलो इतकं होतं.

अनंत अंबानीच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे लोक झाले थक्क

2016 साली जेव्हा अनंत अंबानीचा बदललेला (कमी वजन) लूक समोर आला तेव्हा त्यांच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे लोक थक्क झाले होते. त्याच्या या नव्या लूकबद्दल इंटरनेटवर तूफान चर्चा सुरू होती. यानंतर अनंत अंबानी वेटलॉस करणाऱ्यांसाठी एक आदर्श ठरले होते. रिपोर्ट्सनुसार, त्यांनी 18 महिन्यात नैसर्गिक पद्धतीने 108 किलो वजन घटवलं.

याच मुलाखतीदरम्यान नीता अंबानी यांनी सांगितलं की, आम्ही अजून स्थूलपणाशी लढत आहोत. अशी अनेक मुलं आहेत ज्यांना हा आजार आहे आणि त्यांच्या पालकांना हे मान्य करायला लाज वाटते. पण मला असं वाटतं की, तुम्ही तुमच्या मुलाला वजन कमी करण्यासाठी प्रेरणा दिली पाहिजे. कारण मुलं नेहमी तुमच्याकडे आदर्श म्हणून बघत असतात. त्यांच्यासोबत नियमितपणे काम करण्यासाठी आम्ही दोघेही (अनंत व नीता अंबानी) काही काळ लॉस अँजेलिस येथे ओबेसिटी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, असेही नीता यांनी नमूद केले.

वजन घटवण्यासाठी अनंत घेत होते अशी मेहनत

रिपोर्ट्सनुसार, अनंत अंबानी याने 18 महिन्यात नैसर्गिक पद्धतीने 108 किलो वजन घटवलं. यासाठी तो दररोज 5-6 तास व्यायाम करत होता. त्यामध्ये 21 किमी चालणं, योग, वेट ट्रेनिंग, फिजीकले ट्रेनिंग, कार्डिओ यांचा समावेश होता.

वजन कमी करण्यासाठी स्वस्थ आहार

वजन कमी करण्यासाठी अनंत याने व्यायामासोबतच आहारवरही पुरेसे लक्ष दिले. अनंतने झिरो-शुगर, हाय-प्रोटीन आणि लो-फॅट लो-कार्ब आहार घेतला. ते दररोज 1200-1400 कॅलरी सेवन करत होते. रिपोर्ट्सनुसार, अनंतने आहारात ताज्या हिरव्या भाज्या, कडधान्ये, स्प्राउट्स आणि दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर आणि दूध यांचा समावेश केला होता. तर वजन कमी करण्यासाठी त्यांनी जंक फूड पूर्णपणे बंद केलं होतं.

परत वाढले वजन

राधिका मर्चंटच्या वाढदिवसाच्या 2020 च्या व्हिडिओ फुटेजमध्ये, नेटिझन्सना आलं की अनंतचे वजन पुन्हा वाढले ​​आहे. त्याशिवाय, डिसेंबर 2022 मध्ये अंबानींनी ईशा अंबानीच्या जुळ्या मुलांचे स्वागत करताना काही व्हिडिओमध्येही अनंतचे वजन वाढलेले दिसत होते.

स्टिरॉइडमुळे वजन वाढते ?

अस्थमा अँड लंग्स ऑर्गनायझेशन यूकेच्या मते, एखाद्या रुग्णाला अस्थमा असेल तर व्यायाम करणं किंवा सक्रिय राहणं कठीण जातं. तसेच खूप काळ स्टिरॉइड्स घ्यावे लागतात. त्यामुळे सामान्यांपेक्षा जास्त भूक लागत राहते. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असता. स्टिरॉइडयुक्त औषधांमुळे शरीरात पाणी साठते, त्यामुळे शरीर सूजण्याचा धोका असतो. त्यामुळे वजन वाढण्याची भीती असते.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.