युरिक एसिड वाढलंय, या फूड्स पासून राहा दूर, अन्यथा त्रासात होणार वाढ
शरीरात युरिक एसिडचे प्रमाण वाढणे खूपच धोकादायक असते. हाय युरिक एसिडमुळे दीर्घकाल त्रास देणारे संधीवात आणि सूज येणे अशा संदर्भातील आजार वाढतात. हे आजार जास्त वाढल्याने त्याचे रुपांतर संधिवात, किडनी संदर्भातील आजार होतात.

शरीरात युरिक एसिडचे प्रमाण वाढले तर ते खूपच धोकादायक असते. युरिक एसिड वाढल्यानंतर सांध्यातून दुखायला सुरुवात होते. युरिक एसिड जादा वाढल्याने संधिवात, किडनी विकार, किडनी डॅमेज सारखे विकार होतात. युरिक एसिड एक रसायन असून जे प्युरीन वाढल्याने तयार होते. त्यामुळे शरीरात युरिकची पातळी वाढू न देणेच उत्तम आहे. जीवनशैलीतील बदल,आणि काही घरगुती उपाय या लक्षणांना ठीक करण्यास मदत करु शकतात.
हाय यूरिक एसिडचा त्रास का होतो?
रेड मीट आणि मद्यासारख्या प्युरीन युक्त खाद्यपदार्थांचे प्रमाण वाढविणे, युरीन वाढणारी काही औषधे, लठ्ठपणा, किडनीचे आजार आणि संधीवाताशी संबंधीत फॅमिली हिस्ट्रीवाल्या लोकांना याचा त्रास सर्वाधिक होऊ शकतो.
कसे समजते यूरिक एसिड वाढलेय ?
यूरिक एसिडची रक्त तपासणीद्वारे होते. बहुतांशी पुरुषांमध्ये सामान्य स्तर 3.4 आणि 7.0 mg/dL दरम्यान असतो. आणि महिलांमध्ये हे प्रमाण 2.4 आणि 6.0 mg/dL दरम्यान असते. जर तुमचा युरिक या पेक्षा जास्त असेल तर या स्थितीला युरिक एसिड वाढले असे म्हटले जाते.
हाय यूरिक एसिडवर उपचार
डाएट:
साखर जास्त असलेले ड्रिंक्स आणि प्रॉसेस्ड फूड्सचे सेवन बंद करणेच चांगले असते. फळे, भाज्या, कडधान्य आणि चरबीचे प्रमाण कमी असलेले डेअरी उत्पादनांना प्राथमिकता देणे. ऑर्गन मीट, शेल फिश आणि प्युरिनने भरपूर असलेल्या काही माशांचे सेवन बंद करणेच उत्तम असते.
हायड्रेटेड रहा –
यूरीनद्वारे यूरिक एसिडला बाहर काढण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. डिहायड्रेशन रोखण्यासाठी उन्हाळ्या दरम्यान भरपुर पाणी प्यावे.
वजन कमी करा –
हेल्दी वेट मेन्टेन करून युरिक एसिडच्या पातळीत कमतरता आणता येऊ शकते. नियमित व्यायाम हेल्दी वेट मेन्टेन करण्याचा एक शानदार पद्धती आहे.
फायबरचे सेवन वाढवा –
रोज कमीत कमी 5-10 ग्रॅम फायबरचे सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे इन्सुलिनची पातळी संतुलित करणे आणि यूरिक एसिड ला मॅनेज करण्यास मदत मिळते.