Skin | ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर डाग, पिंपल्स आणि सुरकुत्यांची समस्या निर्माण होते, जाणून घ्या अधिक!

आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 अत्यंत महत्वाचे आहे. जर याची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली तर हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्वचेवर काळे डाग तयार होतात. जर व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण योग्य प्रमाणात घेतले नाही तर चेहऱ्यावर आणि हातावर चट्टे येऊ लागतात. हायपरपिग्मेंटेशन टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता.

Skin | 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे चेहऱ्यावर डाग, पिंपल्स आणि सुरकुत्यांची समस्या निर्माण होते, जाणून घ्या अधिक!
Image Credit source: istockphoto.com
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:24 AM

मुंबई : सध्या आपल्या सर्वांचाच जीवनशैलीमध्ये (Lifestyle) खूप बदल झाले आहेत. अस्वास्थ्यकर आहार आणि खराब जीवनशैलीमुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या दरम्यान त्वचेवर डाग देखील दिसू लागतात. कारण सकाळी एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर धुळ आणि प्रदूषणामुळे (Pollution) त्वचा खराब होते. तसेच आपण बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यावर अधिक भर देतो. यामुळेही त्वचेवर तेल जमा होते. सतत बाहेरील अन्न खाल्यामुळे आपल्या त्वचेचा आवश्यक असलेले व्हिटॅमिन मिळत नाहीत. परिणामी आपली त्वचा अधिक खराब होण्यास सुरूवात होते. जाणून घेऊया कोणत्या व्हिटॅमिनच्या (Vitamins) कमतरतेमुळे आपल्या त्वचेवरी काय परिणाम होते, हे सविस्तरपणे.

व्हिटॅमिन बी 12

आपल्या शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 अत्यंत महत्वाचे आहे. जर याची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली तर हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्वचेवर काळे डाग तयार होतात. जर व्हिटॅमिन बी 12 चे प्रमाण योग्य प्रमाणात घेतले नाही तर चेहऱ्यावर आणि हातावर चट्टे येऊ लागतात. हायपरपिग्मेंटेशन टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेले पदार्थ समाविष्ट करू शकता. यासाठी आपल्या आहारामध्ये दूध, दही, पनीर, ताक आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.

हे सुद्धा वाचा

व्हिटॅमिन सी

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी किती जास्त आवश्यक आहे. व्हिटॅमिन सीमुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळेही चेहऱ्यावर डाग येतात. हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडंट आहे. हे कोलेजनचे उत्पादन सुधारते. त्वचेशी संबंधित समस्या टाळतात. शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही फळे आणि दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक लिंबू पिळून प्या. यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता दूर होण्यास मदत होईल.

व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी आपल्या त्वचेसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे. मेलानोसाइट्स आपल्या त्वचेवर उपस्थित असलेल्या पेशी आहेत. हे पिगमेंटेशन आणि काळे डाग यांसारख्या समस्यांना दूर करते. मेलानोसाइट पेशी हे व्हिटॅमिन डीचे एक प्रकार आहेत. ज्यांच्या कमतरतेमुळे पिगमेंटेशन आणि फ्रिकल्सची समस्या वाढते. यासाठी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये नक्कीच बसला. शिवाय शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ जसेकी, दुध, दही, ताक, पनीर, अंडी यांचे जास्तीत-जास्त सेवन करा.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.