डोकेदुखीपासून आराम हवाय; एसेन्शिअल ऑईल वापरून मिळवा आराम

अनेक घरगुती उपचार नैसर्गिकरित्या डोकेदुखीच्या त्रासाचा सामना करण्यास मदत करू शकता. यातील एक उपाय म्हणून एसेन्शियल ऑईलचा वापर. (Want relief from headaches; Get relief by using essential oils)

डोकेदुखीपासून आराम हवाय; एसेन्शिअल ऑईल वापरून मिळवा आराम
डोकेदुखीपासून आराम हवाय; एसेन्शिअल ऑईल वापरून मिळवा आराम

मुंबई : डोकेदुखी एक समस्या आहे. तणाव, थकवा आणि कम्प्युटरच्या स्क्रीनकडे सतत पाहिल्यामुळे डोकेदुखीसारखा त्रास सुरू होतो. डोकेदुखीवर कुठलेतरी औषधे घेणे हा कायमचा उपाय ठरू शकतो. यामुळे डोकेदुखीपासून तात्पुरता दिलासा मिळू शकतो. मात्र या त्रासापासून कायमची सुटका करून घेण्यासाठी आपल्याला काही प्रभावी उपाय करण्याचीच गरज आहे. या उपायांमध्ये घरगुती उपचारच अधिक परिणामकारक ठरू शकतात. (Want relief from headaches; Get relief by using essential oils)

अनेक घरगुती उपचार नैसर्गिकरित्या डोकेदुखीच्या त्रासाचा सामना करण्यास मदत करू शकता. यातील एक उपाय म्हणून एसेन्शियल ऑईलचा वापर. एसेन्शियल ऑईलचे अनेक उपयोग आहेत. याचे आरोग्यासाठी फायदे आहेत, त्याचबरोबर याचा सौंदर्यासाठीदेखील फायदा होतो.

पेपरमिंट ऑईल

पुदीनाच्या तेलाचा वापर औषधी गुणांसाठी अनेक वर्षांपासून केला जात आहे. पेपरमिंट ऑईलचा वापर करण्यामुळे डोकेदुखी, मांसपेशींमध्ये वेदना, खाज तसेच पचनासंबंधी विविध त्रासांपासून आराम मिळतो. पेपरमिंट ऑईलचा अत्यंत प्रभावी परिणाम दिसून येतो. सामान्यपणे घरात बनवलेल्या माऊथवॉशमध्ये याचा वापर केला जातो.

कॅमोमाईल तेल

कॅमोमाईल तेलाचे अनेक प्रकारचे फायदे आहेत. या तेलाचा आपल्याला त्वचेचे विकार तसेच सूज येण्याच्या त्रासावर उपाय म्हणून वापर करता येऊ शकतो. या तेलाचा वापर केल्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने झोप येते अर्थात आरामदायी झोपेचा अनुभव घेता येतो. या तेलामुळे डोकेदुखी आणि तणाव व चिंतेपासून मुक्तता होऊ शकते. कॅमोमाइल चहा प्यायल्यामुळे आपल्या शरीराला आणि मेंदूलाही पुरेसा आराम मिळतो.

नीलगिरीचे तेल

नीलगिरीचे तेलदेखील अनेकदृष्टीने अनेक फायद्याचे आहे. या तेलाचा मधुमेहाची पातळी नियंत्रित करण्यासाठी वापर होतो. त्याचबरोबर जखम लवकर बरी होण्यासाठीही हे तेल उपयुक्त ठरते. या तेलाचा वापर सायनस आणि सूज कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच या तेलाच्या वापराने डोकेदुखीपासून सुटका होऊ शकते.

लॅवेंडरचे तेल

लॅवेंडरच्या तेलाचा सर्वसाधारणपणे त्वचेच्या आरोग्यासाठी वापर केला जातो. तुम्ही या तेलाचा सौंदर्यासाठी वापर करू शकता. हे तेल डिप्रेशन, तणाव आणि चिंता यांसारखा त्रास कमी करण्यास मदत करू शकते. त्यामुळे डोकेदुखी व ताणतणावातून मुक्त जीवन जगण्यासाठी तुम्ही हे लॅवेंडरचे तेल वापरणे सोईचे ठरेल.

एसेन्शियल ऑईलचा उपयोग कसा करावा?

तुम्ही कधीही एसेन्शियल ऑईलचा थेट आपल्या त्वचेवर वापर करू नये. तुम्ही गरम पाण्यात या तेलाचे काही थेंब टाकून वाफ घेऊ शकता. याशिवाय तुम्ही रुम फ्रेशनर किंवा बाथ ऑईलमध्ये एसेन्शियल तेलाचे काही थेंब मिसळू शकता. (Want relief from headaches; Get relief by using essential oils)

इतर बातम्या

दोन कॅमरे, व्हिडीओ कॉलिंग फीचर्ससह Facebook चं स्मार्टवॉच लाँचिंगसाठी सज्ज, किंमत…

11वी प्रवेशाबाबत शालेय शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कधी होणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI