AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OMAD आहार म्हणजे काय? जाणून घ्या याचे आरोग्यासाठी होणारे फायदे आणि दुष्परिणाम

बदलती जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी ही दोन कारणे आहेत जी लहान वयातच लठ्ठपणा निर्माण करू शकतात. अशातच वाढते वजन जलदपणे कमी करण्यासाठी लोक विविध टिप्स फॉलो करतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे डाएट देखील ट्रेंडमध्ये आहेत ते देखील त्यांच्या आहारात समावेश करतात. यापैकी एक डाएट म्हणजे OMAD आहार जो तुम्हाला जलदपणे वजन कमी करण्यास मदत करू शकतो. मात्र हा डाएट फॉलो करण्यापूर्वी त्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात...

OMAD आहार म्हणजे काय? जाणून घ्या याचे आरोग्यासाठी होणारे फायदे आणि दुष्परिणाम
OMAD आहार म्हणजे काय?Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 29, 2025 | 1:42 PM
Share

आजकाल प्रत्येकजण वाढत्या वजनाने त्रस्त झालेले आहेत. वजन नियंत्रित करण्यासाठी तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देणे खुप महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही ट्रेनर कडे जाता तेव्हा ते तुम्हाला व्यायामासोबत योग्य डाएट फॉलो करायला सांगतात. आजकाल जलदपणे वजन कमी करण्यासाठी कमी कार्ब डाएट, केटो, लिक्विड डाएट, अधूनमधून उपवास यासारख्या अनेक प्रकारच्या डाएटचा ट्रेंड आहे. यापैकी एक म्हणजे OMAD डाएट. हा डाएट तुमचे वजन जलदरित्या कमी करण्यास मदत करतात. परंतु तुमच्या दिनचर्येत हा डाएट फॉलो करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहित असणे आवश्यक आहे.

जेव्हा वजन कमी करण्याचा विचार येतो तेव्हा लोकं कोणत्या प्रकारचा डाएट सुरू करावा या संभ्रमात असतात. तर आजच्या या लेखात आपण OMAD डाएटबद्दल जाणून घेऊ, ज्याचे पालन करून आपण वजन कमी करू शकतो. मात्र प्रथम तुम्हाला OMAD आहार म्हणजे काय आणि तो फॉलो करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे आवश्यक आहे.

OMAD डाएट म्हणजे काय?

OMAD डाएट म्हणजे दिवसभरात तुमच्या आहारात फक्त एक वेळेचे जेवण समाविष्ट करणे. या डाएटमध्ये तुम्ही पूर्ण 24 तासांमध्ये दिवसातून फक्त एकदा एका तासात अन्न सेवन करायचे असते. मग तुम्ही या डाएटचे नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण यादरम्यान केव्हाही करू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्ही दिवसातून फक्त एकदाच अन्न खाऊ शकता. उर्वरित 23 तास ​​तुम्ही काहीही खाऊ नये. अन्यथा या डाएटचे पालन केल्याने तुमच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही.

OMAD डाएट चे फायदे

जलद वजन कमी होणे

OMAD डाएट फॉलो केल्याने तुमचे वजन झपाट्याने कमी होते. कारण जेव्हा तुम्ही हा डाएट पाळता तेव्हा तुम्ही दिवसातून फक्त एकदाच जेवता, ज्यामुळे वजन खूप सहज कमी करता येते. कारण तुमचे कॅलरीजचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

लक्ष केंद्रित करते

OMAD डाएट फॉलो केल्याने तुमचे लक्ष केंद्रित होते कारण या डाएटमध्ये तुम्ही संपूर्ण 23 तास ​​उपवास करता, म्हणजेच तुम्ही 23 तास ​​काहीही खात नाही. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे लक्ष केंद्रित होण्यासही मदत होते. तुम्ही तुमचे काम काळजीपूर्वक पूर्ण करू शकाल.

आहार बाबत कोणतीही चिंता नाही

OMAD डाएट फक्त एकाच वेळी आहार घेतले जाते, त्यामुळे या डाएटचे पालन करणे सोपे आहे, कारण कॅलरीजची आणि प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी वारंवार वेगवेगळे जेवण घेण्याचा त्रास होत नाही.

OMAD आहाराचे दुष्परिणाम

जास्त खाणे होऊ शकते

दिवसातून फक्त एकदाच जेवण करता. त्यामुळे तुम्हाला काही वेळाने भुक लागते. अशातच तुम्ही जेव्हा OMAD डाएट फॉलो करता तेव्हा आहाराच्या वेळी अति खाण्याचे बळी होऊ शकता, कारण दिवसाचे 23 तास ​​काहीही न खाता राहणे हे ऐकायला जितके वेगळे आणि कठीण वाटते तितकेच फॉलो करणे सोपे नाही. तुम्ही २३ तासांच्या दरम्यान काही अस्वास्थ्यकर स्नॅक्स खाता. अशा परिस्थितीत तुम्ही जास्त खाण्यास सुरुवात करता, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकते.

अशक्तपणा जाणवणे

OMAD डाएट तुम्ही जेव्हा फॉलो करता तेव्हा दिवसाचे 22-23 तास ​​उपवास करता ज्यामुळे तुम्हाला अशक्तपणा, थकवा किंवा चक्कर येऊ शकते. जेव्हा तुम्हाला वजन कमी करण्याची तीव्र गरज असेल तेव्हाच हा आहार घ्या.

चिडचिड होऊ शकते

OMAD डाएट फॉलो करताना तुम्हाला 23 तास ​​काहीही न खाल्ल्याने तुमची चिडचिड होऊ शकते, त्यामुळे पुरेसे अन्न न खाल्ल्याने तुमच्या मूडवरही परिणाम होऊ शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.