AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लष्कर प्रमुख ती दक्षिणा देतील का? जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी मागितले तरी काय की पाकिस्तानपर्यंत पोहचली चर्चा

Army Chief Upendra Dwivedi : ऑपरेशन सिंदूर सुरू असतानचा युद्धविरामाची घोषणा झाली. पाकव्याप्त काश्मीर भारतात आणण्याची संधी भारताने गमावल्याचे अनेकांना वाटले. आता जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी लष्कर प्रमुखांकडे दक्षिणेत मोठी मागणी केली आहे.

लष्कर प्रमुख ती दक्षिणा देतील का? जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी मागितले तरी काय की पाकिस्तानपर्यंत पोहचली चर्चा
लष्करप्रमुख ती दक्षिणा देतील का?Image Credit source: गुगल
| Updated on: May 29, 2025 | 11:02 AM
Share

Jagadguru Rambhadracharya : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत न्याय केला. पाकड्यांचे कंबरडे मोडले. पण 10 मे रोजी दोन्ही देशांनी युद्धविरामाची घोषणा केल्याने भारतातील अनेक लोक नाराज झाले. पाकव्याप्त काश्मीर भारतात विलीन करण्याची ही मोठी संधी असल्याचे अनेकांना वाटत होते. आता देशाचे लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी बुधवारी मध्य प्रदेशातील चित्रकूट आश्रमात पोहचले. त्यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांचे दर्शन घेतले. त्यांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली. त्यानंतर आपण लष्करप्रमुखांकडे पाकव्याप्त काश्मीर दक्षिणेत मागितल्याचे जगद्गुरूंनी सांगितले. आता त्यांची ही इच्छा पूर्ण होते का? हा चर्चेचा विषय ठरला आहे.

जगद्गुरूंचे घेतले आशीर्वाद

भारतीय सैन्य दलाचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे बुधवारी चित्रकूट येथे पोहचले. त्यांच्या पत्नीने तुलसीपीठ येथील कांच मंदिरात पूजाविधी केले. तर लष्कर प्रमुखांनी सपत्नी तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरू स्वामी रामभद्राचार्य महाराज यांचे दर्शन घेतले. त्यांचा आशीर्वाद घेतला. लष्कर प्रमुखांनी त्यांच्याकडून गुरू दीक्षा घेतली. लष्कर प्रमुख येणार असल्याने या भागात कडक बंदोबस्त होता. अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. तर मंदिर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. या परिसरात मध्य प्रदेश पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. यावेळी सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागली. द्विवेदी हेलिकॉप्टरने या संस्थानच्या आरोग्यधाम परिसरातील हेलीपॅडवर उतरले होते. आश्रमात पोहचल्यानंतर त्यांनी जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली.

लष्करप्रमुखांना दीक्षा, PoK हवा दक्षिणेत

लष्करप्रमुख उपेन्द्र द्विवेदी यांनी आश्रमात जगद्गुरू रामभद्राचार्य यांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी दीक्षा घेण्याची विनंती केली. जगद्गुरूंनी दिलेल्या माहितीनुसार राम मंत्रासह त्यांना दीक्षा देण्यात आली. त्यावेळी जगद्गुरूंनी पाकव्याप्त काश्मीर त्यांच्याकडे दक्षिणा म्हणून मागितला. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरकडून अनेकांना पीओके हवा होता. त्यात जगद्गुरू पण होते असे दिसते. त्यांनी दक्षिणेत पीओकेची मागणी केली आहे. आता लष्कर प्रमुख हे स्वप्न पूर्ण करतील का याची चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?