Corona Kavach Policy: कोरोना कवच पॉलिसी काय आहे? वाचा प्रीमियम आणि विम्याबाबत सर्व काही…

कोरोना संसर्गानंतर अनेकांना रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडेनासा होताना दिसतोय. त्यामुळेच सध्या पुन्हा एकदा कोरोना कवच पॉलिसीची (Corona Kavach Policy) मागणी वाढलीय.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 1:24 AM, 18 Apr 2021
Corona Kavach Policy: कोरोना कवच पॉलिसी काय आहे? वाचा प्रीमियम आणि विम्याबाबत सर्व काही...

नवी दिल्ली : कोरोना विषाणूने (Corona Virus) सगळीकडेच थैमान घातलंय. कोरोना संसर्गानंतर अनेकांना रुग्णालयातील उपचाराचा खर्च परवडेनासा होताना दिसतोय. त्यामुळेच सध्या पुन्हा एकदा कोरोना कवच पॉलिसीची (Corona Kavach Policy) मागणी वाढलीय. मागील वर्षीच्या कोरोनाच्या प्रकोपाची स्थिती पाहता भारतीय विमा नियंत्रक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) भारतातील अनेक विमा कंपन्यांना ही कोरोना कवच योजना सुरु करण्याची परवानगी दिलीय (What is Corona Kavach Policy of IRDAI what are benefits).

काय आहे कोरोना कवच पॉलिसी

कोरोना कवच पॉलिसी एक शॉर्ट टर्म आरोग्य विमा पॉलिसी आहे. या विम्यात रुग्णांना अनेक प्रकारचे कव्हर मिळतात. ही पॉलिसी कोविड-19 च्या रुग्णांसाठी हॉस्पिटलायझेशन, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन, होम केअर ट्रीटमेंट आणि आयुष ट्रीटमेंटला कव्हर करते. कोरोना संसर्गावर उपचार करण्यासाठी येणारा अवाढव्य खर्च लक्षात घेता या विम्याचे अनेक चांगले फायदे आहेत.

या विम्यात काय काय कव्हर होणार?

कोरोना कवच पॉलिसी धारकाला कोरोना संसर्ग झाल्यास त्याला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसीयू, डॉक्टरांचं शुल्क, हॉस्पिटलायझेशन, प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन, होम केअर ट्रीटमेंट आणि आयुष ट्रीटमेंटला कव्हर करतो.

HDFC ERGO च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, कोरोना कवच पॉलिसी रुग्णालयात दाखल होण्याआधी आणि नंतरच्या खर्चाला संरक्षण देते. कोरोना संसर्ग झालेली व्यक्ती रुग्णालयाद दाखल होण्याआधीचा 15 दिवसांचा आणि डिस्चार्ज झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंतचा खर्च या योजनेत कव्हर होतो.

विमा धारकाने कोरोना संसर्गानंतर घरीच राहून उपचार घेतले तरी या विम्या अंतर्गत 14 दिवसांच्या खर्चावर कव्हर मिळतो. याशिवाय विमाधारकाने आयुष उपचार घेतल्यास त्याचाही खर्च यात कव्हर होतो. कोरोना कवच पॉलिसीत रुग्णवाहिकेचा खर्च, घरातून रुग्णालयात नेण्याचा खर्चही कव्हर होतो.

विमा कसा घ्याल?

कोरोना कवच पॉलिसीत तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाच्या इतर सदस्यांचाही विमा उतरवू शकता. ही विमा योजना 3 कालावधीसाठी उपलब्ध आहे. तुम्ही 3.5, 6.5 आणि 9.5 महिन्यांसाठी हा विमा खरेदी करुन संरक्षण मिळवू शकता. या विमा योजनेच्या हप्त्यानुसार 50 हजार रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंतचा कव्हर मिळतो. कोरोना कवच पॉलिसीसाठी सर्वात कमी हप्ता 447 रुपये आहे. सर्वाधिक हप्ता 5630 रुपये आहे.

हेही वाचा :

Explained : Lancet च्या रिसर्चमुळे घाबरू नका, खुल्या हवेत कोरोनाचा संसर्ग होत नाही; जाणून घ्या चूक काय बरोबर काय ?

Maharashtra Lockdown Update | ‘मुख्यमंत्री काही दिवस परिस्थिती पाहतील, नंतर लॉकडाऊनवर निर्णय’; मंत्र्याचे मोठे वक्तव्य

TV9 Impact : राज्य सरकारचा मोठा निर्णय, अखेर MBBS डॉक्टरांना बाँड सेवा देण्याचे आदेश

व्हिडीओ पाहा :

What is Corona Kavach Policy of IRDAI what are benefits