ब्रशनंतर कोमट पाण्याच्या गुळण्या, दिवसा दोन अंडी खा, कोरोनाकाळात सर्वात महत्त्वाच्या टिप्स

COVID-19 Diet Chart : आहारामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यावर कोमट पाण्याने गुळणी करावी. गरम दुधाचे सेवन करावे.

ब्रशनंतर कोमट पाण्याच्या गुळण्या, दिवसा दोन अंडी खा, कोरोनाकाळात सर्वात महत्त्वाच्या टिप्स
Docotor Aayub Pathan
Follow us
| Updated on: Apr 20, 2021 | 2:12 PM

लातूर : सध्या कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) पसरली आहे. या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. चिंताजनक बाब म्हणजे या लाटेत मृत्यूसंख्याही मोठी आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रात 15 दिवसांची (Maharashtra Sanchar bandi) संचारबंदी लागू आहे. देशभरात अनेक राज्यातही कंटेन्मेंट झोन बनवून आवश्यक तिथे निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्रात दररोज 50 हजारांच्या पुढे रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णालये, बेड, इंजेक्शन कमी पडत आहेत. (what to eat if you have corona symptoms diet during and after covid19 in marathi by MD Aayub Pathan)

आपली फुप्फुसं व्यवस्थित आहेत की नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर 6 मिनिट वॉक टेस्टचा (Six minutes walk test) सल्ला देत आहेत. 6 मिनिटे चालून ऑक्सिजन पातळी तपासून योग्य खबरदारी घेता येते. असं असलं तरी कोरोना काळात म्हणजे कोरोना झाल्यावर किंवा कोरोना होऊन गेल्यावर काय खावं काय खाऊ नये, आहार नेमका कसा असावा, याबाबतची माहमती एमडी डॉ. आयुब पठाण (Dr Aayub Pathan) यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

 ब्रशनंतर कोमट पाण्याच्या गुळण्या

आहारामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यावर कोमट पाण्याने गुळणी करावी. गरम दुधाचे सेवन करावे. नाश्त्यावेळी ताज्या फळांचा ज्यूस घ्या. सफरचंद, संत्री, मोसंबी ज्यूस घ्या. त्यामध्ये बर्फ अजिबात नको. थंड पाणी किंवा फ्रीजमधील ज्यूस घेऊ नये, असं डॉ. आयुब पठाण यांनी सांगितलं. मधुमेह असणाऱ्या नागरिकांनी आंबा ज्यूस टाळावा.

तणावापासून दूर राहावे. सकाळी दहा मिनिटं योगा करावे. सकारात्मकता बाळगा हा उपाय आहे.

दररोज दोन अंडी खा

अंड्यांमध्ये प्रोटीन असते त्यामुळे दररोज दोन अंडी खाल्ली पाहिजेत. अंड्यामधील पिवळा बलक शक्यतो खाऊ नये. शिवाय बदाम, काजू, अक्रोडही खाऊ शकता.

हिरव्या पालेभाज्या खा 

आहारात हिरव्या पालेभाज्या खा. मेथी आहे, पालक हे खूप चांगलं आहे. गाजर, बीट हे सुद्धा खा. लिंबूचं प्रमाण वाढवा.

कोरोना रुग्ण नंतर निगेटिव्ह आल्यावर काय खबरदारी घ्यावी?

कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे. जे प्राथमिक खबरदारी आहे, ती घ्यायलाच हवी. याशिवाय बेड रेस्ट, शारिरिक व्यायाम टाळा. आहारावर लक्ष ठेवावं.

जीम, रनिंग टाळा

पॉझिटिव्ह झालेला रुग्ण, जो नंतर नेगिटिव्ह येतो, त्यांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. या रुग्णांनी जिम, रनिंग टाळावे. बर्गर किंवा तेलकट खाऊ नये. उन्हाळा असल्यामुळे शीत पेय घेऊ नये. ज्यूसमध्ये बर्फ टाळावा.

रेमडेसिव्हीर हा रामबाण नाही

रेमडीसीवीर हा रामबाण नाही. सीटी स्कॅनमध्ये ज्या रुग्णाचा स्कोर 10 च्या वर आहे, रक्तातील ऑक्सिजन 90 ज्या खाली असेल त्याच रुग्णांना रेमडीसीवीर गरजेचं आहे. रेमडीसीवीरमुळे मृत्यू दारात काहीही बदल नाही, असा दावा डॉ. आयुब पठाण यांनी केला.

VIDEO : कोरोना काळातील आहार कसा हवा?

संबंधित बातम्या

लातूरमधील डॉक्टरांनी सांगितली कोरोनाची नवी लक्षणे, तुम्हालाही ‘हा’ त्रास जाणवतो? 

तुम्ही जर कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलात, तर किती वेळात तुम्हाला संसर्ग होऊ शकतो?   

Coronavirus Symptoms तुम्हाला कोरोना होऊन गेलाय हे कसं ओळखायचं?

(what to eat if you have corona symptoms diet during and after covid19 in marathi by MD aayub pathan)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.