AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात रिकाम्या पोटी पाणी पिताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आरोग्यास होईल त्रास

आयुर्वेदानुसार सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी पाणी प्यावे कारण आपण रात्रभर डिहायड्रेटेड राहतो. पण तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कोणत्या पद्धतीने पाणी पीत आहात याची काळजी घेतली पाहिजे. कारण या दिवसांमध्ये रिकाम्या पोटी पाणी पिणे अनेक प्रकारे फायद्याचे असू शकते. पण ते योग्य पद्धतीने करणे महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात...

उन्हाळ्यात रिकाम्या पोटी पाणी पिताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आरोग्यास होईल त्रास
या गोष्टी लक्षात ठेवाImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Apr 22, 2025 | 2:11 PM
Share

पाणी पिणे हे तर रोजचंच काम आहे, उन्हाळ्याच्या दिवसात आपले शरीर हायड्रेट राहावे यासाठी आपल्याला जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. अशातच रिकाम्या पोटी पाणी पिणे हे एकूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. सकाळी कोमट पाणी किंवा साध पाणी पिणे आरोग्यास लाभदायक ठरते. पण जर तुम्ही उन्हाळ्यात रिकाम्या पोटी पाणी पीत असाल तर या गोष्टींची विशेष काळजी घ्या. आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्यानंतर आपण सर्वात आधी पाणी प्यावे कारण आपण रात्रभर डिहायड्रेटेड राहतो. पण तुम्ही कोणत्या प्रकारचे पाणी पीत आहात किंवा ते कोणत्या पद्धतीने पीत आहात याची काळजी घेतली पाहिजे? या दोन गोष्टींची विशेष काळजी घ्या.

रात्रभराच्या झोपेनंतर सकाळी उठल्यावर तुम्ही जर काही न खाता सर्वात आधी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुम्हाला आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण तुम्हाला कधीकधी पचनक्रियेत समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे पोट फुगणे आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. पण पाणी पिण्यापूर्वी त्याच्या तापमानाची विशेष काळजी घ्या. अशातच आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत की रिकाम्या पोटी पाणी पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी…

रिकाम्या पोटी या प्रकारचे पाणी प्या

जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी पाणी प्याल तेव्हा ते खूप थंड किंवा खूप गरम नसावे. साधं नॉर्मल पाणी पिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. कारण पाण्याचा तुमच्या आतड्यांवर थेट परिणाम होतो. पाणी पिण्यामुळे तुमच्या शरीरातील घाण देखील निघून जाते. जास्त थंड पाणी पिल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो.

पचन खराब असू शकते

एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी भरपूर पाणी प्यायलाने तुम्हाला वाटत असेल की त्यामुळे पचनक्रिया सुधारेल, तर तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की असे केल्याने वाईट परिणाम होतात. कारण रिकाम्या पोटी जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, कमी प्रमाणात पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे.

पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही या प्रकारची पेये देखील पिऊ शकता

पाण्याव्यतिरिक्त, तुम्ही रिकाम्या पोटी लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा फळांचा रस देखील पिऊ शकता. हे तुम्हाला दीर्घकाळ हायड्रेट ठेवू शकते. यातून तुम्हाला खूप फायदा होईल. कारण पाणी हे तुमच्या शरीरातील घाण काढून टाकते.

शिरा मोकळ्या होतात

रिकाम्या पोटी कधीही थंड पाणी पिऊ नका कारण यामुळे तुमच्या शिरा आकुंचन पावू शकतात. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही पाणी प्याल तेव्हा फक्त सामान्य किंवा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. तसेच, पाणी प्यायल्याने तुमची त्वचा, शरीर, केस, सर्वकाही निरोगी राहते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?