ऑटिझम पीडित व्यक्ती जाहीर करू शकत नाहीत भावना, संशोधकांनी सांगितला त्यांना मदत करण्याचा उपाय

 ऑटिझमचा त्रास असणाऱ्या बऱ्याचशा व्यक्ती त्यांच्या भावना नीटपणे व्यक्त करू शकत नाहीत. बहुतेक संशोधन हे ऑटिझमच्या जुन्या सिद्धांतावर आधारित आहे. ऑटिझम हा एक वैद्यकीय रोग आहे.

ऑटिझम पीडित व्यक्ती जाहीर करू शकत नाहीत भावना, संशोधकांनी सांगितला त्यांना मदत करण्याचा उपाय
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: google
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 08, 2022 | 3:30 PM

ऑटिजमचा (Autism) त्रास असणाऱ्या बऱ्याचशा व्यक्ती त्यांच्या भावना नीटपणे व्यक्त करू शकत नाहीत. आपल्या विचार अथवा भावना व्यक्त करणे त्यांना कठीण जाते. यामुळे चिंता, नैराश्य, राग आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. ऑटिजम हा एक मानसिक विकार असून त्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना ऑटिस्टिक (Autistic people) म्हटले जाते. ऑटिजम हा मेंदूच्या विकासादरम्यान उद्भवणारा एक विकार असून, त्यामुळे संबंधित व्यक्तीचे सामाजिक व्यवहार आणि संपर्कांवर प्रभाव पडतो. ऑटिस्टिक लोकांना आपल्या भावना (cannot express their feelings) व्यक्त करण्यास त्रास का होतो, याबद्दल स्कॉटलंडमध्ये नुकतेच एक संशोधन करण्यात आले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ दि वेस्ट स्कॉटलंडचे पीएचडी संशोधक आणि सहयोगी व्याख्याते लॉरेन गिलिज-वॉकर आणि प्रोफेसर नईम रमजान यांनी हे संशोधन केले आहे. प्रौढ ऑटिस्टिक व्यक्तींना त्यांच्या समवयस्क व्यक्तींपेक्षा नैराश्य आणि चिंता वाटण्याचा धोका अधिक असतो, असे या अभ्यासातून समोर आले आहे.

ऑटिजम म्हणजे काय ?

ऑटिजम हा एक मानसिक विकार असून, या आजाराने ग्रस्त असलेल्या म्हणजेच ऑटिस्टिक व्यक्तींना बोलणे, संवाद साधणे, लिहीणे, वाचणे आणि इतर व्यक्तींशी संपर्क साधणे, अशा क्रिया करण्यात अडचण येते. ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये ऑटिस्टिक व्यक्तींचं डोक इतर लोकांच्या तुलनेत वेगळ्या पद्धतीने काम करतं. हे लोक इतरांपेक्षा थोडे वेगळे असतात.

34 ऑटिस्टिक व्यक्तींवर संशोधन

एका अशा भविष्याची कल्पना करा, जिथे तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येऊ शकेल. ऑटिस्टिक व्यक्ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतील, असे काही तांत्रिक उपाय विकसित केले जात आहेत. काही ऑटिस्टिक व्यक्ती त्यांच्या तणावाची पातळी मोजण्यासाठी अथवा त्याचे परीक्षण करण्यासाठी डिजीटल हार्ट रेट मॉनिटर सारख्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आहेत. ऑटिस्टिक व्यक्तींना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी स्मार्ट वॉच, व्हर्च्युअल रिॲलिटी किंवा ब्रेन-कॉम्प्युटर इंटरफेस यासारख्या वेअरेबल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शोध अभ्यासातून लागला आहे. नुकतेच एका अभ्यासातून समोर आले आहे की, ऑटिस्टिक व्यक्तींना घालता येतील अशा गोष्टींपैकी केवळ 10 टक्के गोष्टी त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात. भावना आणि विचार नियंत्रित करण्यासाठी ऑटिस्टिक व्यक्तींनी यापूर्वी कोणत्याही तांत्रिक गोष्टीची मदत घेतली होती का, असा प्रश्न अलीकडेच करण्यात आलेल्या एका अभ्यासादरम्यान काहींना विचारण्यात आला होता. त्यामध्ये 34 ऑटिस्टिक व्यक्ती आणि त्यांचे सहकारी ( कुटुंबिय, देखभाल करणारे सहाय्यक) यांनी त्यामध्ये भाग घेतला होता.

कसे असते ऑटिजम सह जीवन ?

या अभ्यासात सहभागी झालेल्या एका व्यक्तीने, तिची मुलगी भावनिक आव्हानांचा सामना कसा करते, याबद्दल माहिती दिली. ती संपूर्णरित्या ठीक दिसते व तिचा व्यवहारही योग्य असतो. ऑटिस्टिक व्यक्तींना नक्की काय वाटते, त्यांच्या भावना काय आहेत, हे जाणून घेणे महत्वपूर्ण असल्याचे मत एका (ऑटिस्टिक व्यक्तीची देखभाल करणाऱ्या) सहाय्यकाने व्यक्त केले. तंत्रज्ञानामुळे त्यामध्ये फरक पडू शकतो, असे त्यांनी नमूद केले. बहुतेक संशोधन हे ऑटिझमच्या जुन्या सिद्धांतावर आधारित आहे, जसे की ऑटिझम हा एक वैद्यकीय रोग आहे. जो बरा होऊ शकतो किंवा त्यावर उपाय करता येतात. एखादी , व्यक्ती ऑटिजम ग्रस्त आहे हे लपवण्यापेक्षा, तंत्रज्ञानाच्या वापराने त्यांना स्वतंत्रपणे कसे जगता येईल याचा शोध घेण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्यांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञानावर आधारित धोरणे विकसित करणे गरजेचे :

नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करण्यात येत असला तरीही ते (तंत्रज्ञान) व्यवहारात कसे लागू करता येईल, याचा विचार करण्यात संशोधक व आरोग्य सेवा संस्था या दोघांनाही अपयश येते. संशोधकांच्या मते, ऑटिजम हा जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. या नव्या दृष्टिकोनामुळे केवळ तंत्रज्ञानावर आधारित उपयोगी धोरणे विकसित करण्यास मदत होणार नाही, तर सर्वांसाठी अधिक सर्वसमावेशक वातावरण बनवण्यासही मदत होईल.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें