हृदयविकाराच्या झटक्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू का होतोय?; वाचा लक्षणे आणि उपचार

कोरोना रुग्णांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगभरात हे प्रमाण वाढलं आहे. (why corona positive patients dying from heart attack know symptoms and treatment)

हृदयविकाराच्या झटक्याने कोरोना रुग्णांचा मृत्यू का होतोय?; वाचा लक्षणे आणि उपचार
heart attack
Follow us
| Updated on: May 05, 2021 | 6:04 PM

नवी दिल्ली: कोरोना रुग्णांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जगभरात हे प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घरीच टेलिकन्सल्टेशनच्या मदतीने रुग्ण बरे होण्याचा प्रयत्न करतात. मात्र इन्फेक्शनचे साईड इफेक्ट शरीरात दीर्घकाळ राहिल्याने हृदय निकामी होत असून त्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचे झटके येत असल्याचं दिसून येत आहे. (why corona positive patients dying from heart attack know symptoms and treatment)

ऑक्सफर्ड जर्नलने नुकताच यावर अभ्यास केला आहे. त्यातून ही माहिती उघड झाली आहे. कोरोनामुळे गंभीर आजारी असलेल्या 50 टक्के रुग्णांचे हृदय बरे झाल्यानंतर महिन्याभरानंतर डॅमेज होते. त्यामुळे बरे झाल्यानंतरही हार्ट रेट चेक करत राहणं गरजेचं झालं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यावरही रुग्णाला धोका निर्माण होऊ शकतो, असं या अभ्यासात म्हटलं आहे.

वेळीच उपचार करा…

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे इन्फेक्शन शरीरात इंफ्लेमेशनला ट्रिगर करत असते. त्यामुळे हृदयाच्या मांसपेशी कमकुवत होतात. त्यामुळे हृदयाचे ठोकेही वाढतात. तसेच ब्लड क्लॉटिंगची समस्या निर्माण होऊ लागते. दुसरा व्हायरस थेट आपल्या रिसेप्टर सेल्सवर हल्ला करतो. एसीईटू रिसेप्टर्स म्हणून ओळखला जातो. मायोकार्डियम टिश्यूच्या ता जाऊनही तो नुकसान करतो. वेळीच देखभाल केली नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.

हार्ट फेल कधी होतो

मांसपेशी रक्ताला कुशलतेने पंप करत नाही, तेव्हा हार्ट फेल होतो. या परिस्थितीत संकुचित धमन्या आणि हाय ब्लड प्रेशर हृदयाला पर्याप्त पम्पिंगसाठी कमकुवत बनवतात. ही एक क्रॉनिक समस्या आहे. त्याचा वेळीच उपचार नाही झाला तर परिस्थिती आणखीच बिघडू शकते. योग्य उपचार आणि थेरपीमुळे रुग्ण दीर्घायू होऊ शकतो.

कोरोना रुग्णांना छातीत दुखण्याचा त्रास होत असेल किंवा कोरोना होण्यापूर्वीच त्यांना हृदयाशी संबंधित आजार असेल तर त्यांनी तात्काळ डॉक्टरांना दाखवावं. इमेजिंग केल्यानंतर व्हायरसने हृदयाच्या मांसपेशीला किती नुकसान पोहोचवलं हे कळून येईल. सौम्य लक्षणे असलेल्यांना याचा फायदाच होईल.

फोर्टिस रुग्णालयाचे चेअरमन डॉ. अशोक सेठ यांच्या माहितीनुसार व्हायरस हृदयालाही नुकसान पोहोचवत आहे. व्हायरसमुळे हृदयाच्या क्लॉटिंगची समस्या वाढत आहे. हृदयात रक्त जमा होते. फुफ्फुस आणि धमन्यांमध्येही रक्त जमा होते. त्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कमी वयाच्या पुरुषांना लागण होण्याचं प्रमाण अधिक असल्याचं दिसून येत आहे. आम्ही सुमारे पंधरा टक्के पोस्ट कोविड रुग्णांमध्ये हार्ट इन्फ्लेशनची समस्या पाहिली आहे. मात्र यावेळी हे इन्फ्लेमेटरी रिअॅक्शन अधिक घातक असल्याचं दिसून येत आहे. यात रुग्णांच्या हृदयाचे ठोके 20-25 टक्क्यांपर्यंत गेलेले दिसून येत आहे, असं मेदांताचे चेअरमन डॉ. नरेश त्रेहन यांनी सांगितलं.

उपचार काय?

सुरुवातीपासूनच उपचार झाल्यास हृदयविकाराचा धोका टाळला जाऊ शकतो. हार्ट फेल्युअरच्या अॅडव्हान्स स्टेजवर गरज पडल्यास लेफ्ट व्हेंट्रीक्युलर असिस्ट डिव्हाईस प्रोसेजर किंवा थेरपीद्वारे हार्ट ट्रान्सप्लांट केलं जाऊ शकतं. LVAD लेफ्ट व्हेंट्रिक्युलरला पोषक असतात. हे हृदयाचं प्रमुख पम्पिंग चेंबर आहे. या परिस्थितीत हा सुरक्षित पर्याय मानला जातो.

लक्षणे काय?

हार्ट फेल होण्यापूर्वी रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो. त्याशिवाय कमजोरी आणि थकवा वाटू लागतो. पंजा, गुडघा आणि पाय सूजतो. हार्ट बीट वेगाने वाढून अनियमित होण्याची शक्यता असते. तुमची एक्सरसाईज करण्याची क्षमता घटू शकते. सतत खोकला आणि फ्लूड रिटेंशनमुळे वजन वाढू शकते. भूख लागत नाही आणि वारंवार लघूशंकेला होतं.

काय कराल?

अशा प्रकारचे कोणतेही लक्षणे दिसल्यास हयगय करू नका. तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा. घरच्या घरी उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. डॉक्टरच तुमच्यावर योग्य उपचार करू शकतात, अन्य कोणी नाही हे लक्षात ठेवा. (why corona positive patients dying from heart attack know symptoms and treatment)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : पंढरपुरात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना अटक, अकलूज पोलिसांची मोठी कारवाई

CCTV | बीडमध्ये लसीकरण केंद्रावर DYSP ना धक्काबुक्की, पोलिसांचा नागरिकांवर लाठीचार्ज

कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना 15 दिवसांमध्ये पुन्हा लागण, Immunity Escape म्हणजे काय ?

(why corona positive patients dying from heart attack know symptoms and treatment)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.