AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV | बीडमध्ये लसीकरण केंद्रावर DYSP ना धक्काबुक्की, पोलिसांचा नागरिकांवर लाठीचार्ज

बीडमध्ये शासकीय रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढत चालल्यामुळे काहीसा गोंधळ झाला (Police Lathi charge Beed Vaccination)

CCTV | बीडमध्ये लसीकरण केंद्रावर DYSP ना धक्काबुक्की, पोलिसांचा नागरिकांवर लाठीचार्ज
बीडमध्ये लसीकरण केंद्रावर लाठीमार
| Updated on: May 05, 2021 | 3:23 PM
Share

बीड : बीडमध्ये शासकीय रुग्णालयात काहीसं गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. लसीकरण केंद्रावर जमलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांवर बेछूट लाठीमार केल्याचं पाहायला मिळालं. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. (Police Lathi charge at Beed Hospital COVID Vaccination Centre CCTV Video)

लसीकरण केंद्रावर डीवायएसपींना धक्काबुक्की

बीडमध्ये शासकीय रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी नागरिक जमले होते. लसीकरण केंद्रावरील गर्दी वाढत चालल्यामुळे काहीसा गोंधळ झाला. डीवायएसपी संतोष वाळके यांना नागरिकांनी धक्काबुक्की केली.

शासकीय रुग्णालयात घुसून लाठीचार्ज

पोलिस उपअधीक्षकांना धक्काबुक्की झाल्यानंतर पोलीस दल आक्रमक झालं. पोलिसांनी नागरिकांवर बेछूट लाठीमार केला. बीडच्या शासकीय रुग्णालयात घुसून पोलिसांनी लाठीचार्ज केला.

पाच ते सहा जण ताब्यात

लाठीचार्ज करतानाची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पाच ते सहा जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ :

(Police Lathi charge at Beed Hospital COVID Vaccination Centre CCTV Video)

परळीत लसीकरण केंद्रांवर गर्दी

याआधी बीडमधील परळीत लसीकरण केंद्रावर नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळाली होती. अवघ्या तीस लसी उपलब्ध असताना केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यामुळे लसीकरण केंद्रच कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीतीही व्यक्त केली जात होती.

संबंधित बातम्या :

Video: जेव्हा कलेक्टरनं लग्नात घुसून वऱ्हाडींची वरात काढली, बघा काय काय घडलं?

Beed मध्ये लसीकरणासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

(Police Lathi charge at Beed Hospital COVID Vaccination Centre CCTV Video)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.